Skip to main content

अध्यात्म विराम ५२

अध्यात्म विराम ५२

एखाद्याला आपलं करून घेण्यासाठी,दोन उपाय असतात. एक म्हणजे आपल्या विपरीत परिस्थिती बद्दल सांगून, समोरच्या व्यक्तीच्या मनात, कणव, करुणा जागृत करून, आपल्याबद्दल त्याच्या मनात स्नेह जागृत करावा. दुसरा उपाय म्हणजे, त्या व्यक्तीची उचित स्तुती, प्रशंसा, अर्चन करून, त्याची कृपा प्राप्त करणं. दोन्हींचे वेगवेगळे लाभ आहेत. 

पण पहिल्या प्रकारात, आपली परिस्थिती पालटली की, त्या व्यक्तीची कृपा दृष्टी किंवा दृष्टी बदलू शकते. अर्थातच ही कृपा व स्नेह प्राप्ती जर, ईश्वर या परम शक्ति कडून करून घ्यायची असेल तर,नक्कीच पाहिला मार्ग, अल्प काळासाठी लाभदायक होऊ शकतो. पण यामधे दीर्घ कालीन हानी देखील संभवते. पहिल्या मार्गाने जर ईश्वराला करुणा उत्पन्न व्हावी, अश्या उद्देशाने प्रयत्न करू गेल्यास, ईश्वरी कृपा प्राप्ती, मात्र परिस्थिती आहे तोपर्यंत होईल. नंतर त्याबाबत मनातच दोष उत्पन्न होऊ शकतो. 

कारण मानवी मनाची ही खासियत आहे की, परिस्थिती सुधारल्या नंतर, मन सुख चैतन्याच्या प्रभावात, आत्म मग्न होते. हा मानवी दोषधर्म आहे. यात कृतघ्न पणाचा धोका मात्र संभवतो. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या ईश्वरी शक्तीच्या वर्णनाची, गुणांची, कैवल्यमय स्वरूपाची, पतीत पावन धर्माची स्तुती व प्रशंसा करून अर्चन अर्थात पूजन केल्यास, ईश्वरी कृपा प्राप्ती, अनंत काळासाठी लाभते. 

पण यामधे सर्वात महत्वाची गोष्ट जी, साधक आणि स्तुती पाठक यांच्यातील भेद दर्शवते, ती गोष्ट किंवा तो भेद म्हणजे साधक ही स्तुती, कोणत्याही सांसारिक, प्रापंचिक उद्देश प्राप्तीसाठी न करता, मात्र आणि मात्र अशी कृपा ही अर्थात मोक्ष, मुक्तीच्या मार्गावर, मन व आत्मा यांच्या जाणिवांची जागृती व्हावी, या मूळ उद्देशाच्या पूर्ततेसाठी म्हणून करतो. 

तर स्तुती पाठक अशी स्तुती फक्त आपल्या सांसारिक व प्रापंचिक उद्देशांसाठी करतो. हा भेद खूप महत्वाचा ठरतो, ज्यावेळी आपण आपल्या आत्म जागृतीच्या मूळ ईश्वरी संकल्पापासून दूर जाऊ इच्छितो की, त्या संकल्पाच्या समीप जाऊ इच्छितो. 

अर्चन अर्थात ईश्वरी गुणांची, कीर्तीची, ब्रीदाची स्तुती व ईश्वराच्या सगुण अथवा निर्गुण भावांचं पूजन करणे. अर्चन भक्ती बाबत सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत त्या दिव्य ईश्वरी अथवा सद्गुरू रुपाला मनात साठवण्याचा प्रयत्न करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...