Skip to main content

अध्यात्म विराम २७

अध्यात्म विराम २७

सत्वयुक्त आणि सत्वहीन श्रवण म्हणजे नक्की काय आणि ते कसं साध्य करायचं, यावर आता विचार करूया. संसारातील किंवा प्रापंचिक गोष्टीसाठी केलं गेलेलं किंवा केलं जाणारं श्रवण हे सत्वहीन श्रवण म्हणता येईल. कारण या सर्व प्रकारच्या श्रवणातून होणारी फलनिष्पत्ती ही सरते शेवटी नाशवान जगतातील आहे किंवा शेवटी त्यातून भोग किंवा उपभोग निर्माण होणार, जे पुन्हा चक्राकार, जीवाला फिरवत राहणार.

सत्व याचा इथे अभिप्रेत अर्थ म्हणजे, ज्यामधे जीवाच खरं भलं करण्याची चेतना व प्रेरणा आहे.पण जगतातील किंवा अखिल ब्रम्हांडातील हरेक ध्वनी लहरी, ज्या जीवाला खेळवून, जगताच्या भवऱ्यात किंवा मृगजळात अडकवून, फक्त जन्म आणि मृत्यू यांच्या जंजाळात फिरवत ठेवतात. म्हणून त्या अंतिमतः अहितकारक आहेत. 

या जगतात प्रत्येक जीवाला, देह प्रदान करताना, सर्वात पहिल्या जन्मात, नक्कीच या उद्देशानेच ईश्वराने धाडलं आहे की, देहप्राप्ती पश्चात, देहातील इंद्रिय व्यवस्थेच्या सहाय्याने, तो जीव या ब्रम्हरूप परिघातून, ब्रम्हांडाबाहेर श्री विष्णू लोकात अर्थात आपल्या माहेरी, पुन्हा परत येईल. तोपर्यंत या जगतात जीवाला रमण्यासाठी, माया रुप व्यवस्था ईश्वरानेच निर्माण केली आहे. 

आता या मायारूप ब्रम्हात, जीव गुंतत जातो आणि कर्माच्या फलरुप प्रवाहात, तो जीव अडकतो आणि त्या कर्माच्या सागरात प्रवाह पतीत होऊन जातो. खरतर हा उद्देश ईश्वराला कधीच अभिप्रेत नव्हता. परंतु, ईश्वर कृपाळू, दयाळू,कनवाळू आणि त्रिकाल ज्ञानी असल्या मुळे, त्याने, या साठी सुद्धा व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. 

या व्यवस्थेत अनेक मार्ग निर्माण करत, ज्याला जो मार्ग सहजसाध्य, सुलभ, सोप्पा वाटेल, त्या मार्गाने, तो जीव, पुन्हा मूळ लोकी जाण्यासाठी, क्षणक्षण प्रयत्न करू शकतो. या मूळ स्थानी परत जाण्याला मोक्ष म्हणतात. पण यासाठी प्रथम त्यासाठीची बुद्धी होणं, ही प्रथम पायरी आहे. आता ही बुद्धी, अनेक कारणांनी, मोहांनी, मायेने, सहा शत्रूंच्या माध्यमातून, ग्रस्त वा कोंदणात वेढलेली असल्याकारणाने, तो विचार मनात येईल, अश्या लहरी सुद्धा निर्माण होऊ शकणार नाही, हे नक्कीच. 

मग यासाठी, त्याचं ईश्वरी व्यवस्थेने, काय काय योजून ठेवले आहे, यावर विचार व त्याचा अवलंब कसा करायचा यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत त्या ईश्वराच्या या ब्रम्हांड व्यवस्थेचा विचार व चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...