अथर्वशीर्ष भावार्थ भाग ९ त्वं चत्वारिवाक्पदानि। श्रीगणपती अथर्वशीर्षातील पाचव्या श्लोकातील हा एक भाग आहे. ज्याचा भावार्थ आज जाणून घेऊया. मुळातच श्रीगणेश हा सर्व भाषा, वाङ्मय, साहित्य, संस्कृती, कला, ज्ञान, विज्ञान या सर्वांचा कर्ता आणि धर्ता असल्यामुळे, सर्वांचाच उगम त्यापासून अर्थातच श्रीगणेशापासून होतो. म्हणजेच आपलं लहानपणापासून बोलायला शिकणं, शब्द, त्यानंतर वाक्य, उच्चारण, त्यांचे अर्थ जाणून संवाद साधणं, प्रश्न समजून उत्तरं देणं, शब्द त्यांचे अर्थ, मतितार्थ, गर्भितार्थ, गुह्यर्थ, गहनार्थ इत्यादी जाणणं, ते जाणून मस्तिष्क मन , हृदय आणि सर्वात शेवटी अंतरात्मा, यामध्ये ते झिरपून, आत्म्याद्वारे, अंततः परम आत्मा त्याचं गुह्य जाणणं आणि ते जाणून त्या परम ज्ञानाचा अर्थ लक्षात येऊन जीवनात संतोष पावणं हे सर्व श्रीगणेशामुळे साध्य होतं. म्हणजेच जर श्रीगणेशाची कृपा लाभली तर, या सर्व गोष्टी साध्य होऊन, जन्माचं सार्थक होतं. हे सर्व श्रीगणेशामुळे साध्य होतं, याचं कारण हे सर्व मूळ श्रीगणेशापासून उत्पन्न झालं. विधात्याने सर्व सृष्टी घडवताना, तर्कसंगत पणे प्रत्येकाला विशिष्ट शक्तींकडून ऊर्जा, चेतन...