Skip to main content

अध्यात्म विराम २२

अध्यात्म विराम २२

मागील भागात आपण विचार करत असलेली नादमयता, ठराविक स्वर शब्द यांचा संगम असलेले शब्दसमुह, विशिष्ट लयीत कंठातून उच्चारत,त्यांच्या नादाचा, मस्तिष्क, मन, हृदय याद्वारे शरीरातील विशिष्ट पेशींवर, आघात करून, देहात सुप्तावस्थेत असलेले, ईश्वरप्राप्ती साठी योग्य,आवश्यक चैतन्य निर्माण करून, संसारातील ध्यान वा लक्ष विकेंद्रित करून, ते लक्ष, मन वा ध्यान ईश्वराकडे केंद्रित करता येईल. 

याचा सर्वंकष अभ्यास करून, शास्त्रज्ञ असलेल्या पण ऋषिवर म्हणून परिचित असलेल्या, सर्वांनी, अथक परिश्रम करत, ज्ञान अर्जन करून, हे सिद्धांत रूप, शब्द, मंत्र, स्तोत्र, ईश्वरी नामात गुंफून आपल्यापुढे मांडले आहेत. त्याच्या नित्य नियमित, सातत्यपूर्ण पठणाने, अनेक भौतिक व अध्यात्मिक उपाधी प्राप्त होऊ शकतात. 

कारण त्या नादाच्या, स्वरांच्या, शब्दांच्या लहरी, नाद, कंपनं, कंठातून, विशिष्ट स्वरूपात म्हणून,त्या श्वसनाच्या मार्गाने, प्राण व अपान वायू यांचा योग्य समन्वय साधत, आवर्तन, पूनरावर्तन स्वरूपात करत गेल्याने, ईश्वराने या देहात निर्माण केलेली, शास्त्रीय अर्थात वैज्ञानिक योजना वा बैठक किंवा system कार्यरत होऊन, मनुष्य, या देहाच्या यंत्रातून अर्थात machinery मधून, स्वतः स्वतःचा विकास, शुद्धता, ध्यान, धारणा, समाधी ते निर्विकल्प समाधी या पायऱ्यांपर्यंत पोहचू शकतो. 

हा मार्ग झाला योगी, तपस्वी इत्यादींचा व ज्यांना संसार सोडून, वैराग्य साधत परमार्थ प्राप्त करायचा आहे. थोडक्यात ज्ञानी जनांसाठी हा सर्वात उपयुक्त मार्ग आहे. पण सामान्य जनांचं काय, हा प्रश्न मनात उद्भवतो. साहजिक आहे. कारण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी याचसाठी लिहून ठेवले आहे की, 

राजहंसाचे चालणे ll जगी झालिया शहाणे ll 
म्हणोनी काय कवणे ll चालुची नये. 

या ओवीनुसार, भगवंताने नक्कीच प्रत्येकाच्या उध्दाराचा मार्ग, प्रशस्त करून ठेवला आहे. कारण ईश्वराच्या लेखी, भेद नाही.भेद भासलाच तर तो,आपल्या कर्मदोषांचा असू शकतो. म्हणजे जो मार्ग जन्मोजन्मी योग्य कर्म केल्याने, साध्य होत जातो किंवा साधला जाऊ शकतो, तो मार्ग आपल्याला प्राप्त झाला नाही तर, समजावे की, आपण कर्म दोषांमुळे मार्ग भ्रष्ट किंवा मार्ग पतीत झालो आहोत. या जाणीवा आपल्याला प्रवाह पतीत असल्याची जाणीव करून देतात.

यावर अजून सखोल चिंतन केल्यास, अनेक गोष्टी वा खुलासे समोर येऊ शकतात. म्हणून हाच विषय उद्या पुढे सुरू ठेवू. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...