काकांचा खेळ निराळा रे भाई, काकांचा खेळ निराळा !! काकांनी काहीही न करता मीडियाला हाताशी धरून, कंड्या पीकवून, अजित दादांचा सुरू असलेला खेळ संपवून, त्यांच्याकडे असलेल्या आणि जमा होत असलेल्या किंवा जमा होऊ शकणाऱ्या पाठिंब्याची वाताहत केली आहे. भाजपा समर्थक (कुंपणावरचे), शेणके, राऊत गँग, कॉगी सह सर्वांना चार दिवस झुल्यावर झुलवून, दादांची उडती पतंग मस्तपैकी कापली आहे. आता दादांना जायचंय असेल तर, दोन पाच खास समर्थक घेऊन, बाहेर पडून, राजीनामा देऊन, पुन्हा निवडून यावं लागेल, किंवा 2024 पर्यंत थांबावं लागेल यातून दुसरा एक निशाणा साधला तो म्हणजे ताईंच पक्षाध्यक्ष होण्याचं काम सुलभ करून दिलं. शेवटी एक लक्षात घ्या, ते देखील एक वडील आहेत आणि जे बाळासाहेबांनी केलं व करवून घेतलं, त्याप्रमाणे आपली राजकीय वारसदार म्हणून आपली कन्या ताईंची कायम स्वरूपी सोय लावून दिली आहे. अब देखो आगे कूछ दिनोमे, काका स्वतःच बाजूला होऊन, ताईना पक्षाध्यक्ष करतील आणि सर्व आमदार पदाधिकारी मुकाट्याने पाठिंबा देतील. दादांना एकतर, पाठींबा द्यावा लागेल किंवा दुसरा राज ठाकरे व्हावं लागेल. आपलं हे साध्य...