गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा भाग २ ©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले पाहिलं कडवं रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या कधी सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा गीत : म पां भावे संगीत : अनिल अरुण स्वर : आशाताई विषयाला सुरुवात करण्याआधी, कालचा पहिल्या भाग पोस्ट केल्यानंतर, एक वाचक श्री बालमुकुंद पतकी, यांनी त्वरित लिहिलं की, त्यांच्याकडे, कविवर्य, खुद्द म पां भावे यांच्या हस्ताक्षरातील हेच गीत आहे आणि माझ्या विनंती नुसार,त्यांनी ते त्वरित मला पाठवलं.तेच गीत या लेखाच्या कमेंट मधे मी पोस्ट केलं आहे. आता पहिल्या कडव्याच विश्लेषण. मुळात अश्या कल्पनेच्या प्रेमातील सागरात आकंठ बुडालेली आणि कल्पनेतील स्वप्न आणि वास्तवातील विरही दाहकता, या अपूर्णतेच्या सीमेवर असणारी, एखादी अल्लड प्रेयसी, त्या प्रकट करता न आलेल्या किंवा प्रकट होऊन अपूर्ण राहिलेल्या वा प्रकट करण्यास पुरेसं अवसान न मिळालेल्या, प्रेमाच्या पतंगाच्या अत्यंत नाजूक दोरीवर बसलेली असते.अर्थातच तिचं मन, आपल्या प्रेमाची, प्रियक...