Skip to main content

Posts

Showing posts with the label गोग्रासवाडी (डोंबिवली)

गोग्रासवाडी (डोंबिवली) १५

गोग्रासवाडी (डोंबिवली) १५ दिवाळी , आठवणी, साठवणी, उत्साह, आणि मन कायम, कायम , कायम जाताना इतकी हूर हूर लावून जातेस, जितका उत्साह वर्षभर वाट पाहण्यात घालवतो आम्ही. सर्व चारही दिवस आम्ही शोधलेला आनंद , उत्साह, जल्लोष, मजा सर्व पाचव्या दिवशी हिरावून नेतेस. अगदी लहानपणापासून बघत आलोय तुझ हेच रूप. चार दिवस खुप धमाल, नुसता आनंद आणि ...... चौथ्या दिवशी संध्याकाळीच सुरवात होते उजळणी चारही दिवसांची. अगदी पहिल्या दिवसापासून , नव्हे अगदी तयारीला  सुरवात जिथून केली तिथपासून उजळणी करायची, मनातला सर्व साठवलेला आनंद  बाहेर काढून पुन्हा बंद करून पुढील वर्षापर्यंत वापरायला ठेवायचा. किती किती गोष्टी , साध्या साध्याच त्या चार दिवसात केलेल्या, घडलेल्या, अनुभवलेल्या दडवून ठेवायच्या  मनात ,का तर त्या वर्षभर पुरवायच्यात. तू येणार नाहीस पुढल्या वर्षीपर्यन्त. कधीतरी वर्षातून एकदाच आलेले पाहुणे, त्यांच्या येण्याची लागलेली चाहूल, त्यांच्या येण्यामुळे आलेला उत्साह, आणि त्यांच्या सोबत घालवलेले ते चारच दिवस हो फक्त चार दिवस पूर्ण वर्षातले, म्हणजेच ४भागीले ३६५  किती व्यस्त प्रमाण आहे . पण हा...

गोग्रासवाडी (डोंबिवली) १२

गोग्रासवाडी (डोंबिवली) १२   त्या वाडीतल्या, चाळीतल्या आणि त्या चार चाळींच्या मधल्या मैदानात तासचे तास अनेक खेळ खेळणं हे नित्याच झालं  शाळेतून आल्यावर रोज संध्याकाळी अनेक खेळ खेळले जात होते. सर्व मिळून ३५ ते ४० वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अनेक खेळ खेळत एकत्र असायचो. अगदी संध्याकाळी अंधार होई पर्यंत खेळ चालायचे. अर्थात अंधार पडल्यानन्तर परवजा म्हणून मग गप्पा मारायला चाळीत जमायचो. त्यात दिवसभर झालेल्या खेळातील घडलेल्या चुका वा भांडण  यावर चर्चा व्हायची, किंवा इतर गप्पा होत असत. वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अगदी गुण्यागोविंदानं खेळत खेळत वाढलो. भांडलोसुदधा पण ते खेळातल्या खेळात विसरून पण जायचो. कधीही कोणतही भांडण फार ताणल्याचं आठवत नाहीये.  कोणत्याही भांडणाच रूपांतर कधीही मतभेदांमध्ये झाल्याच आठवत नाही. कदाचित त्या वयाचा परिणाम असेल की मन पुरेसं लवचिक असल्यामुळे पटकन विसरुन लगेच पुढे जाणं हा एक सद्गुण त्यावेळी सर्वांच्यात होता. कदाचित ही एक गोष्ट मोठ्या माणसांनी शिकावी अस आज पण वाटतय.  शाळेतल्या त्या जगात वाडी म्हणजे वेगळं जग होत, कसलीही चिंता, काळजी काहीही नसल...