आज माघी गणेश जन्मोत्सवानिमित्त तीन अक्षरी कवितेतून श्रीगणेशपूजन आणि वंदन श्रीगणेशाय नमः तुज करुनि मोरया तूज आळवितो पुण्यार्था नमितो तुज निजभावा करुनि क्षण स्मरणार्था साधक तुज भजतो गणेश तव वंदनार्था तुज पूजीन आरंभे यश लाभो कार्यार्था शेंदूर गंध भाळी लंबोदर तू शूर्पकर्णा तव नामे चालले जगी तूच सर्वार्था रक्तवर्ण अर्पूनी पुष्पे प्रसन्न हो सिद्धार्था आठवले त्या शब्दांनी वंदितो तुज सेवार्था ©® कवी : प्रसन्न आठवले माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघी गणेशोत्सव २८/०१/२०२० ०६:१२