Skip to main content

Posts

Showing posts with the label करुणाष्टके

करुणाष्टके आणि भावार्थ २

 करुणाष्टके  आणि भावार्थ २.  ।। श्रीगणेशाय नमः ।। ।। श्रीराम जयराम जय जयराम ।। अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥ कल्पना करा आपण  हात जोडून रामापुढे बसलो आहोत. फक्त राम आणि आपण. ध्यान आत म्हणजे अंतर्मनात लावून विचार एकाग्र करण्याचा प्रयत्न करतोय. चित्त स्थिर होत नाही, कारण अनेक विचार वर्षानुवर्षे मनात बाळगण्याचा ध्यास आपण करत आलो आहोत. त्यामुळे स्थिरचित्त म्हणजे काय हे फक्त ध्यान लावलं, योग केला तरच माहीत पडतं. तरीही प्रयत्न केले तर कुठेतरी सुरवात होईल हा दृढनिश्चय करूया. शांत एकाग्र होऊया आणि आता स्वतःला आठवूया, त्रयस्थ होऊन.  अंतर्मनात डोकावून तिथून बाह्यरुपाला शोधण्याचा प्रयत्न करूया. जसं आणि जितकं होईल तितकं करत जाऊया. प्रयत्न केला कि, सध्या होईल. मात्र जोर जबरदस्ती न करता मनाला आत नेण्याचा प्रयत्न करूया. काहींना थोड्या प्रयत्नाने सध्या होईल. काहींना फार वेळ लागेल, काहीच नाही घडलं तरी चित्त शांत होत जाईल, काही काळानंतर. मनाचा वारू इतक्या सहजी हाती येईल असे नाही, पण ...

करुणाष्टके आणि भावार्थ १.

करुणाष्टके  आणि भावार्थ १.  ।। श्रीगणेशाय नमः ।। ।। श्रीराम जयराम जय जयराम ।। श्रीरामरक्षा आणि मारुतीस्तोत्र यांचं विवेचन झाल्यावर मला सूचना आल्या कि पुढील विवेचनाचा विषय करुणाष्टके असावी. म्हणून अभ्यासाला सुरवात करताना सर्वात प्रथम या ३४ श्लोकी करुणाष्टकांना मी खालीलप्रमाणे ५ भागात विभागलं आहे. भाग १- श्लोक १ ते १५  - व्यथा वा विषाद वा खेद भाग २ - श्लोक १६ ते २३  - अजाणतेपणा भाग ३-  श्लोक २४ – आशा भाग ४ - श्लोक २५ ते ३० – उपाय भाग ५ - श्लोक ३१ ते ३४   -  आर्जव. करुणाष्टके हि वास्तविक समर्थांनी आपल्या वतीने रामाजवळ केलेला आर्जव आहे. पण एक सद्भक्त म्हणून अत्यंत लीनतेने प्रत्येक ठिकाणी,  प्रत्येक दुर्गुणात, प्रत्येक विकारात, प्रत्येक वासनेत स्वतःला कल्पून व योजून समर्थ समस्त मानव जातीच्या वतीने रामाजवळ ते दुर्गुण, त्या व्यथा मांडून त्यांचा उपाय देखील सांगतात. खरतर अश्यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउली, तुकोबाराय, नाथमहाराज यांच्या समान विश्वमाऊली भासतात.  कारण ज्यांनी रामरायाचं दर्शन घेतलंय, त्यांना आता मिळवण्यासारखं काहीही उरलेलं नसताना, मी...

करुणाष्टके

करुणाष्टके  भाग १- १ ते १५ अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥ विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥ रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥ तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥ प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥ चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥ घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥ जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥ तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥ तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥ झडकरि झड घालीं धांव पंचानना रे । तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥...