Skip to main content

अध्यात्म विराम ८८

अध्यात्म विराम ८८
 
कर्मसिद्धांत श्रेष्ठ मानणारा आणि त्यानुसारच आपलं हे विश्व आणि त्यातील प्रत्येक कण आणि क्षण रचणारा ईश्वर, कधीही त्या सुत्राबाहेर आणि तत्वाबाहेर गेला नाही आणि जाणारही नाही. म्हणूनच विश्वातील प्रत्येक क्षणी होणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागें, निश्चित कारण सूत्र आहेच आहे. प्रत्येक जीवाची प्रत्येक क्षणी होणारी प्रत्येक क्रिया व प्रतिक्रिया,या कुठल्या ना कुठल्या कर्माचा फल स्वरूप परिणाम आहेत.आता तुम्ही विचार करत आहात त्या प्रमाणे घडणारी, इष्ट वा अनिष्ट अशी प्रत्येकच गोष्ट ही कर्माचा परिणाम आहे. 

म्हणून याचं कर्मफल स्वरूप म्हणून, सद्गुरू तत्व, तिन्ही देवांच्या संयुक्त शक्तीतून, श्री दत्तगुरू रुपात, या भुवर अवतीर्ण झालं, जे या कलियुगात तारक आहे. त्याचसाठी ऋषिवर अत्री आणि माता अनुसया हा कथाभाग, घडून आला.अन्यथा,देवांच्या अर्धांगी असलेल्या तिन्ही शक्ति रुप देवीना, माता अनुसया यांच्या पासून असूया, असुरक्षितता वाटून त्यांनी त्रीदेवांना, मातेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी धाडलच नसतं. त्यानंतर घडलेली पूर्ण घटना आणि साक्षात त्रिदेवांच्या एकत्रित शक्तितून, श्रीदत्तात्रेय, सद्गुरू उगमस्थान, यांचा जन्म व संपूर्ण जीवनकार्य हे अनेकानेक युगांचा विचार करून, ईश्वराने घडवून आणलेली लीला आहे, असा संपूर्ण गोष्टीकडे पाहिल्यावर अंदाज बांधता येतो.

या एका तत्वाला जन्माला घालून, गुरू आणि शिष्य, भक्त, भाविक व साधक या दोन नात्यांची युगानुयुगांसाठी भक्ती मार्गात निर्मिती करण्याचं महत्वाचं कार्य ईश्वराने केलं आणि ते जगत हितासाठीच घडवून आणलं, हे नक्की. कारण तीन देवी शक्ती या मायेच्या आधीन येऊ शकत नाहीत,हे नक्कीच. म्हणजे तो मायेचा पाश व त्यामागे पुढील सर्व घडलेल्या घटना,ही जगत कल्याणार्थ ईश्वरी प्रेरणेने, मायेने व शक्तीने घडलेली लीला होती हे नक्की. 

आता या व अशा अनेक घटना, कथा व लीला यांमधून हे नक्की दिसतं व सिध्द होतं की, या ईश्वरी व्यवस्थेत विनाकारण व विनाउद्देश काहीही होत नाही. कर्म हा सर्वांचा आधार आहे आणि विश्वहितार्थ घडलेल्या या व घडणाऱ्या अश्याच अनेक घटना, या ईश्वरी लीलाच आहेत. म्हणूनच आपण ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या भक्ती मार्गातील आपला कर्म सहभाग पार पाडावा. कारण लाखो करोडो सर्वसामान्य भक्तांसाठी, सद्गुरू रूप करुणामय, कनवाळू सहाय्यक जास्त, ईश्वराने स्वतःच पुढे केला आहे.

त्या सद्गुरूरूप ईश्वरी अंशावर पूर्णपणे विश्वास, श्रद्धा ठेवून, आपण आपला भक्तीचा महामार्ग बिनधोकपणे चालून, ईश्वराकडून निर्माण करण्यात आलेल्या या व्यवस्थेचा लाभ घ्यावा. भक्ती मार्गातील आपल्या दास्य भक्तीला,आपल्याच सद्गुरू सेवेने आपण सुरुवात करूया. कारण सद्गुरू हे ईश्वराचा अंश स्वरूप असल्या मुळे, आपली गुरुभक्ती व गुरुसेवा, त्या ईश्वरापाशी नक्की पोचणार. 

आपल्या भक्ती .आर्गातील पुढील पायरीकडे आपण पुढील भागात पुन्हा वळूया. तोपर्यंत आपल्या सद्गुरू रूप ईश्वराची भक्ती व सेवा करतच राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...