Skip to main content

अध्यात्म विराम १५

अध्यात्म विराम १५
  
लेख क्रमांक १२ मधे दिलेलं उदाहरण पुढे नेऊ. अभिमन्युने गर्भात असताना, श्रीकृष्ण मुखातून ऐकलेलं, चक्रव्यूह भेदनाचं गुह्यज्ञान, जवळजवळ अठरा वर्षा नंतर, महाभारत युद्धात, ऐन मोक्याच्या दिवशी, उपयोगात आलं. याचा एक अर्थ असाही निघतो की, गर्भाच्या त्या अवस्थेत, देहाच्या कोणत्याही जाणीवा जागृत नसताना, आत्मा स्वतः मध्ये लीन असतो, मग्न असतो. 

या कारणाने, तो आत्मा, त्यावेळी उपलब्ध एकमेव श्रवण इंद्रियाचा पूर्ण उपयोग करून, पूर्ण एकाग्र अवस्थेत, ते ज्ञान ग्रहण करून, मेंदूच्या कप्प्यात साठवू शकतो. याचा अर्थ, ज्या ज्यावेळी माणूस, अशा प्रकारच्या अवस्थेप्रत जाऊ शकतो, त्या त्यावेळी, या देहातील एका ज्ञान इंद्रियाचा सदुपयोग करून, विश्वरूप चैतन्याबद्दल, ज्ञान ग्रहण करू शकतो. 

आता हे साधण्यासाठी, आपल्या देहाच्या, संसाराच्या, प्रपंचाच्या पसाऱ्यातून, बाहेर पडून, पूर्ण क्षमता, एकाच ज्ञानेंद्रियांवर केंद्रित करून, ईश्वरी शक्तीकडून, अखंड प्राप्त लहरी, कंपनं, यांना, मेंदू, मन यामार्फत, आत्म्या पर्यन्त पोचावण्याचा प्रयत्न करावा लागेल. या प्रयत्नाचा सराव करावा लागेल, त्या सरावातून, त्याचा अभ्यास करावा लागेल. 

या अभ्यासातून, ज्ञानेंद्रिय, त्याची प्राप्तीची क्षमता, मेंदूची ते ज्ञान पृथक्करण करण्याची क्षमता, मनातील एकाग्रतेची ऊर्जा व शक्ती, यांना विकसित करत पुढे जावं लागेल. हा अभ्यास आहे. नव्हे हा योगाभ्यास आहे. पण हे इतकं सर्व, सातही टप्प्यातील, मानवी जीवात्मा, देह, त्या देहातील विकसित इंद्रिय व त्यांची क्षमता, या करण्यास सक्षम असतील का. 

कारण प्रत्येक देहाची उत्पत्ती, स्थिती, परिस्थिती, जाणिवांची जागृती, क्षमता, विकास, प्राप्त स्थितीत देह, बुद्धी मन यांचे साद प्रतिसाद, हे सर्व एकच असणार नाहीत. अगदी एका काळातही नाहीत किंवा काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यातही नाहीत. कारण या क्षमता विकसित करण्याचं शास्त्र आहे. जे एकाच आत्म्याला सर्वकाळी किंवा अनेकांना एकाचवेळी जमू शकणार नाही. 

मग पुढे काय, यावर उद्या विचार करूया. तोपर्यंत आपण ईश्वर किती अगाध आहे, ज्याने हे सर्व निर्माण केलेलं आहे, याचं चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...