Skip to main content

अध्यात्म विराम ३७

अध्यात्म विराम ३७

ईश्वराला वैज्ञानिक असं म्हटल, ते कसं याच्याबद्दल आता जाणून घेत, भक्तीमार्गातील तिसऱ्या पायरीकडे वळूया. जीवाच्या जन्मात मानवाला, श्रुतीतून अर्थात कानाने श्रवण या पहिल्या कर्माला सिद्ध करून, ईश्वराने श्रवण हा मंत्र दिला. पण त्या श्रवण लहरी, अनेक पटींनी आणि शुद्ध सात्विक असल्या पाहिजेत. 

तरच त्या लहरी, जीवाला, योग्य त्या मार्गाकडे घेऊन जातील. त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी सोय त्या ईश्वराने निर्माण केली आहे.श्रवण केलेलं सर्व,मनात मेंदूत साठवून, योग्यवेळी व योग्य काळी स्मरण व्हावं, याची व्यवस्था निर्माण केली आहे. 

आपण ऐकलेले पाहिलेलं असं सर्व काही, लक्षात राहून, संसारात, प्रपंचात अनेक गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो. पण ही स्मरणात राहण्याची देणगी देण्यामागे, मुख्य कारण व आवश्यकता हीच आहे की, ईश्वराच्या नामाच्या, संकीर्तन, गान, भजन, नाद, स्वर, ध्वनी यांच्या श्रवणात निर्माण झालेल्या भावात,नादोत्सवात ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग सहज सुलभ होत जातो. 

या जाणिवेतून, ज्ञानातून आणि प्रचीतीतून, माणसाने हा घेतलेला वा प्राप्त केलेला अनुभव, ती अनुभूती पुन्हा पुन्हा घेत घेत, हा मार्ग क्रमत आपल्याला इश्वरासमिप नेत नेत, आत्मशुध्दी, साधावी, म्हणूनच ईश्वराने स्मरण ही एक बहुमूल्य देणगी मानवाला दिली आहे. आता ही स्मरणाची देणगी ईश्वराने अनेक रुपात अनेक प्रकारांनी या जन्मासाठी दिली आहे. 

आता या जन्मासाठी, अस मुद्दाम म्हणण्याचं कारण हे की, या जन्मात श्रवण केलेलं, पाहिलेलं, अनुभवलेले, फक्त याच जन्मात स्मरणात राहील, ही व्यवस्था ईश्वराने अनेक कारणांनी,निर्माण केली. अनेक जन्मात फिरणारा आत्मा, अनेक देहातून फिरतो. त्या प्रत्येक जन्मातील, कर्म,नाती,त्यांचे गुंते हे सर्व जर अनेक जन्म, स्मरणात राहण्याची व्यवस्था ईश्वराने केली असती, तर मोठा गोंधळ निर्माण झाला असता. 

म्हणून त्या सर्व आठवणींच्या विस्मरणाची व्यवस्था, आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवास करत असताना, ईश्वराने मुद्दामहून निर्माण केली आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, या सर्वात स्मरण या गुणाची व्यवस्था आहे की, इतर विस्मरणाप्रमाणे ईश्वर नामाचं स्मरण व्यर्थ जातं का आणि प्रत्येक जन्मात पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागते, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...