Skip to main content

अध्यात्म विराम १४

अध्यात्म विराम १४
  
गेल्या शतक दोन शतकात विज्ञानाने वेगात, सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. यातील मानवाची बुद्धी क्षमता अलौकिक आहे, यात दुमत असू शकत नाही. पण हे सर्व करताना माणूस निसर्ग नियमांच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्या आधारानेच माणूस पुढे प्रगती साधू शकतो. कारण ही सृष्टी, हे ब्रम्हांड, तारामंडल, सूर्यमंडल, ग्रहमंडल, तारांगण, सूर्यमाला, आकाशगंगा हे काहीसं ज्ञात असलेलं जग, मानवाने शोधलं ते देखील निसर्ग नियमांचा आधार घेऊनच. 

यातील सर्वात पहिला वेगाचा नियम म्हणजे ध्वनी आणि प्रकाश यांचा वेग. म्हणजे यामधे प्रकाश अधिक गतीने प्रवास करतो. तर ध्वनी हा त्याहून कमी वेगाने प्रवास करतो. हे शास्त्रीय सत्य आहे, यात मानवाने काहीही निर्माण केलेलं नाही. तर विधाता, निसर्ग, ब्रम्हा, परम ईश्वर प्रतिनिधी, यातील ज्या नावाने आपण संबोधू, त्याने हे निर्माण करताना, काही मुख्य नियम घालून दिलेले आहेत. 

त्यांना ओलांडून पुढे जाणं मानवाला शक्य नाही. म्हणजेच एका अज्ञात शक्तीने निर्माण केलेले, घालून दिलेले नियम वापरून, प्रकाश वेग या संज्ञेचा व संकल्पनेचा वापर करून, अनेक अतर्क्य गोष्टी मानव साध्य करत आला आहे. पुढेही साध्य करतच राहील. अर्थात ज्या वेळी या निसर्ग नियमाला डावलून जाण्याचा प्रयत्न मानव करतो, त्यावेळी निसर्ग, ती शक्ती, ते पंच महाभूतरूप ईश्वरी प्रतिनिधी मानवाला नेहमी जागा दाखवतात. 

या सर्वांची माहिती घेतल्यावर, आपल्या ईश्वराच्या समीप जाण्याच्या आणि त्याला प्राप्त करण्याच्या मार्गाबद्दल जाणून घेऊया. श्रवण हे ध्वनीच्या माध्यमातून, श्रुती अर्थात कर्णेंद्रिय यांनी प्राप्त केलेल्या लहरींना मेंदूच्या मार्फत परिवर्तित करून, प्राण्याला, आवाजाचं ज्ञान होतं. हे ज्ञानाचं प्रथम स्वरूप मानव या पूर्ण विकसित देहात, सृष्टिकर्त्याने, जन्माच्या आधीच ज्ञानेंद्रिय स्वरूपात योजून, अनेक प्रकारांनी उपकृत करून ठेवलं आहे. 

म्हणजेच, जन्माच्याही आधी, या जडदेहाला, ज्ञानाच्या जाणिवेची पाहिली जागृती होते आणि बाहेरील जगातून येणाऱ्या लहरींचा मागोवा घ्यायला,तो देह आणि देहातील मन व आत्मा, सुरुवात करतात. त्या ज्ञानाला साठवून पुढे जाण्याचा प्रयत्न देह, नंतर करू शकतो, जर त्या सभोवतीची परिस्थिती, ते ज्ञान विकसित करणारी असेल तर. 

यावर अजून विस्ताराने पुढील भागात चिंतन करूया. तोपर्यंत आपण विश्वरुप परमात्मा किती दिव्य असेल याची कल्पना करत, त्याला जाणण्याचा प्रयत्न करूया. 
 
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...