#श्रीकृष्णनीती #भाग२२ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धृतराष्ट्राकडे वळण्याआधी थोडी पार्श्वभूमी बघू. कृष्णाने कंस, नरकासुर यांसह जरासंध (भीमामार्फत) , कालयवन या व अश्या मायावी शत्रूंचा निःपात करून असुरी व मायावी शक्ती संपवल्या. खरतर असुरी शक्तींचा विनाश झाला की सर्व स्थिरस्थावर होणं क्रमप्राप्त होतं. परंतु असं झालं नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे हा द्वापारयुगाचा अंतकाळ होता. कारण कृष्णावतार द्वापारहुगाच्या अंताला झाला आहे. यातून कलियुगाचा संदेश जो श्रीकृष्णांनी महर्षी व्यास यांच्यामार्फत जगाला कलियुगाच्या अंतापर्यंतच्या काळासाठी दिला आहे, तो म्हणजे इथून पुढे असुरांचं अस्तित्व हे प्रत्यक्षात नसेल, आता त्यांना वा उरलेल्या असुरांना मी नष्ट केलंय . परंतु आता ते अस्तित्व रूप बदलून अहंकार, गर्व, क्रोध, दंभ, द्वेष, मत्सर, काम, मोह, लोभ, अनीती, कुसंस्कार अश्या रिपूंच्या माध्यमातून मनात घर करून असतील. म्हणूनच त्यांचा सामना करणं हे रोजचं नव्हे क्षणाक्षणांचं महाभारत असेल. जे प्रत्येक व्यक्तीला सामान्य वा असामान्य सर्वांनाच लढावं लागेल. यातून आत्मरुपी कृष्ण ...