Skip to main content

अध्यात्म विराम ३३

अध्यात्म विराम ३३
 
मुळातच लहरींची उच्च नीचता, ही त्या लहरी किती प्रमाणात, कुठून व कश्या प्रकारे निर्माण होतात, यावर अवलंबून असते. त्यामुळे त्या लहरी किती बलवान आहेत हे, त्यांच्या निर्माण होण्याच्या स्त्रोतावर अवलबून आहे. म्हणजेच स्त्रोत किंवा त्या श्रवण लहरी कशा पासून, उत्पन्न होतात, यावर, त्या लहरींमधील शक्ती, ऊर्जा यांची प्रत ठरते. 

प्रत यासाठी की, त्यांच्यामुळे निर्माण होणारी कर्मफलितं, ही त्या प्रतवारी वर अवलंबून असतात. आपण जेंव्हा हीन दर्जाचे वा हीन पातळीचे ध्वनी, संवाद, स्वर ऐकतो, तेंव्हा त्या लहरींचा देह, मस्तिष्क,रक्ताभिसरण, रक्तदाब, मज्जा संस्था, मन इत्यादींवर, त्याच प्रकारचा म्हणजेच त्याचं प्रतीचा वा दर्जाचा परिणाम होतो.जसा तो संगतीने होतो, त्याचं प्रमाणे. 

साधं उदाहरण घेऊ. ज्या जर, एखाद्याच्या विचारत, वर्तणुकीत, योग्य तो परिणाम घडवून आणायचा असेल तर, त्याच्या मेंदूवर, विचारांवर, मनावर, देहावर, तश्याच प्रकारचे विचार, शब्द, ध्वनी, स्वर इत्यादी पडत राहतील, याची व्यवस्था केली जाते. 

किंवा एखाद्या व्यक्तीला काही मानसिक आजार, वा शारीरिक दुखापतीमुळे अशक्तपणा आला असेल तर, डॉ संबंधितांना खास सांगतात की, कोणताही मानसिक त्रास होईल असे आवाज वा ध्वनी असं काहीही कानावर पडेल अस करू नका, त्यामुळे आजार लवकर बरा होणार नाही किंवा बळावेल. 

या बद्दल एक अनुभव मुद्दाम सांगतो. अनेक वर्षांपूर्वी वडिलांची कसली तरी शस्त्रक्रिया झाली होती आणि डॉ नी खास पंधरा दिवस तरी टीव्ही बघायला बंदी घातली होती.पण वडिलांनी ती कसोशीने पाळल नाहीत. त्यामुळे पंधरा दिवसांनी पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉ नी सांगितलं की, त्या टीव्ही बघण्याचा, त्यांच्या हृदयावर परिणाम झाला होता. थोडक्यात निभावलं आणि जास्त हानिकारक परिणाम झाला नव्हता. 

त्यामागचं शारीरिक, बौद्धिक, शास्त्रीय व मानसिक कारण हे, या विषयाला तंतोतंत लागू होतं. ते कारण असं की, ज्यावेळी शरीर शस्त्रक्रियेमुळे अशक्त होतं, त्यावेळी संपूर्ण शरीराचं, विशेषतः शरीरांतर्गत बुद्धी संस्थेचं अर्थात internal intelligence system चं सर्व लक्ष त्या दुखऱ्या भागाला पुर्ववत करण्यात गुंतलेलं असतं. 

अश्यावेळी, त्या संस्थेच्या किंवा system च्या कार्यात, अडथळा येईल किंवा त्यांचं लक्ष विकेंद्रित होईल, अशी कोणतीही गोष्ट, घटना, हे केल्यास, रक्ताभिसरण, मज्जा संस्था, चेतापेशी, मेंदू व मन यांनी मिळून बनलेल्या त्या system च्या कार्यात, बाधा येऊन, सुधारणेला विलंब होतो किंवा दुष्परिणाम होऊ शकतो. 

हेच उदाहरण उद्या पुढे नेऊ आणि श्रवण कीर्तन, याबद्दल विस्ताराने चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...