श्रीकृष्ण नीति १४ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! दुर्योधनाबरोबर असलेलं व त्याचप्रमाणे त्याच्याबरोबरच संपलेलं अजून एक महान व्यक्तित्व. ज्याच्या दुर्दैवाचा फेरा जन्माने सुरू होतो.एक शूरवीर उपेक्षित राहिलेला, क्षत्रिय असुनही सुतपुत्र म्हणून हिणवला गेलेला, अजेय योद्धा असूनही अपात्र ठरलेला,अस्त्र शस्त्र, दिव्यास्त्र असूनही त्याचा वापर न योग्य समयी करता आलेला, जन्माचं रहस्य माहीत नसल्यामुळे भगवान परशुराम यांच्याकडून शिक्षण घेऊनही मिळालेल्या शापामुळे, त्या अस्त्रांचा उपयोग न करू शकलेला असा अलौकिक वीर, पण प्रारब्धाच्या विचित्र चक्रात अडकलेला महावीर, दान वीर कर्ण. जिथे क्षत्रियत्व सांगावं लागलं आणि तिथे ते मान्य झालं नाही, परंतु श्रीपरशुराम यांच्याकडे,क्षत्रिय नाही या समजुतीने, ग्रहण केलेलं अस्त्र शस्त्र ज्ञान, त्यांनी निव्वळ एका प्रसंगवरून क्षत्रियत्व ओळखूलं, म्हणून शाप दिलेला. जन्मतः शरीरावर कवच आणि कानात अजेंयत्वाची कुंडलं मिळालेला, परंतु योग्य वेळीच ही कवचकुंडलं काढून घेण्यात आलेला. सुर्यपूत्र आणि ज्येष्ठ कौंतेय असूनही रिक्त हस्त असलेला, जीवन...