ज्ञानेश्वरी भावार्थ ८ अध्याय ६ ओवी १३७ देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ॥६-१३७॥ या अध्यायात या टप्प्यावर माऊली अर्जुनाचं गुणगान करण्यात मग्न आहेत. माऊली स्वतः म्हणतात सुद्धा की, मला आता का कुणास ठाऊक पण भगवंतापेक्षा, गीते पेक्षा किंवा त्या युद्ध प्रसंगात भगवंतांनी गीता कथन केलं, यापेक्षाही, भगवंताच्या या परम भक्ताचं कौतुक आणि प्रेम जास्त वाटतं. हे म्हणणारे स्वतः माऊली कृष्णवतार मानले जातात. मला याचं कारण असं वाटतं, की कृष्णवतारात गीता सांगताना, कदाचित अर्जुनाचं वाटणारं कौतुक किंवा अर्जुनाबद्दल वाटणारा जिव्हाळा व प्रेम तो स्नेह, प्रसंगो पात अर्थात प्रसंगाच्या गंभीर्यामुळे, भगवंत व्यक्त करू शकले नसावेत. अर्जुनाबद्दल असलेला हा भाव अव्यक्त राहिला आणि भगवान श्रीकृष्ण यांचं हे अव्यक्त प्रेम, व्यक्त करण्याची आतुर इच्छा, अनावर झाल्यामुळे, माऊली अवतारात, त्याच श्रीकृष्णाने,सहाव्या अवतारात, अनेक श्लोकात, ते प्रेम ते कौतुक, तो अव्यक्त भाव मनसोक्त व्यक्त केलाय. अर्जुनाचं विशेष कौतुक माऊली व्यक्त करताना सांगतात तैसा अर्जुनचि...