Skip to main content

अध्यात्म विराम ५८

अध्यात्म विराम ५८
  
मन ही गोष्ट मोठी विचित्र आणि अद्भुत गोष्ट आहे. ती शून्यात नेण्यासाठी मोठा प्रयास करावा लागतो. योग याग, ध्यान धारणा इत्यादी राजमार्ग अवलंबावे लागतात, अनेक वर्षांची साधना आणि खडतर परिश्रम करावे लागतात. तरीसुद्धा हजार वर्ष तप करूनदेखील एखाद्या मोहाच्या मेनकेमुळे तपोभंग होऊ शकतो तो वेगळाच. मनोनिश्चय वगैरे गोष्टी मनाला समजत नाहीत.

पण विवेक, विचार आणि संयम या त्रयीने साधना करत गेल्यास, काही यश नक्की मिळू शकेल. ती सवय मनाला जडवायला तेवढे प्रयास घ्यावे लागतात. पण शास्त्रात, वेदात, यावर अभ्यासपूर्ण चिंतनशील विचार करून, विविध मंत्र, स्तोत्र इत्यादी साधन, मानवाला उपचार व आचार या स्वरूपात मांडण्यात आले. यातील सर्व आचार उपचार यांचा अर्थ, भावार्थ व उद्देश, हा ईश्वर भक्तीत मन रममाण करून,नित्य त्या आराधनेत, प्रार्थनेत, मनाला रमवावे.  

त्या नादात मनाला गुंग होण्याची सवय लागून, काही क्षण मनाला शांत व्हावे. या सर्व उपचार आचार यांचा मतितार्थ एकच आणि इतकाच आहे की, मनाला अशी काही क्षण साधनेची सवय जडवून घेतली की, मनाची उच्छृंखलता कमी कमी करत, त्याला विशिष्ट नादाची, नामाची, साधनेची, गोडी लागते. तशी ती लागावी, जेणे करून मनाला एका लयीत बांधता येऊ शकेल. 

याच गोष्टीचा विचार नवविधा भक्तीच्या मार्गात करण्यात आल्याचं जाणवेल. मनाला श्रवणाच्या माध्यमातून सत चित् आणि आनंद स्वरूप चिदाकार, ओंकार रूप ईश्वराच्या नामातून, गुणवर्णन, भाव वर्णन, यातून त्या ईश्वराच्या स्वरूपाची, सगुण रूपातून निर्गुण ब्रम्हाची आवड लागावी. कीर्तन, प्रवचन यातून त्याच्या बद्दल आकर्षण, प्रेम भाव उत्पन्न व्हावेत. 

त्याच्याबद्दल स्नेह भाव जागृत होऊन, मनाला भावलेल्या त्याच्या एखाद्या नामाची आवड, त्याचं नित्य स्मरण करायची सवय लागेल. अशी सवय जडलेलं मन ईश्वर चरणी दृढ होऊन, त्याच्या आराधनेचं मर्म जाणेल. ती जाणीव त्या विधात्याच्या स्मरणातून त्यांचं नित्य अर्चन आणि वंदन करेल. 

आता या सर्व प्रक्रियेतून मनाला काही क्षण आपल्या ईश्वरापुढे नत होऊन, त्याची नित्य प्रार्थना करून, त्याला वंदन करताना, मनाची एकाग्रता साधत मनाला काहीं काळ स्थिर करण्याची सवय जडते. अशी काही क्षण त्या ईश्वरा पुढे वंदन करून, मनाला शून्य करण्यासाठी मनाला स्मरण आणि शरण यांची सवय असावी. कारण वंदन म्हणजे शरण रूप नमन. 

यावर अजून चिंतन आणि मनाला अशी सवय जडण्यात काय अडथळे येतात वा येऊ शकतात किंवा का मन असं एकरूप होऊ शकत नाही, यावर विचार उद्याच्या भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...