Skip to main content

अध्यात्म विराम १८

अध्यात्म विराम १८

म्हणून ते ज्ञान व श्रवण केलेलं सारं, मन आणि आत्मा शुद्ध असेपर्यंत, मनात, आत्म्या जवळ तसच्या तसं टिकून राहतं. जसजशी हि शुद्धता, प्रापंचिक, भौतिक ज्ञानाने गडद होत जाते, तसतशी या शुद्ध ज्ञानावर अशुद्धीची पुटं चढत जातात. यावर उपाय काय किंवा कश्याप्रकारे ही शुद्धता पुन्हा प्राप्त करता येऊ शकते, यावर चर्चा करूया. 

आत्म्याचं शुद्धस्वरुप गर्भात जसच्या तसं मूळ स्वरूपात असतं. याचा प्रत्यय, अनेक उदाहरणं देऊन सांगता येईल. तशी एक दोन उदाहरणं, आपण आधीच्या भागांमधे पाहिली आहेत. ही शुद्धता आणि सात्विकता, तशीच टिकून राहणं, हे खूप कठीण काम आहे. पूर्वीच्या जीवन पद्धतीमधे, ही शुद्धता टिकून राहणारं वातावरण, अस्तित्वात होतं. लोकं संसारी असूनही, धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ पालना बाहेर अन्य हेतू व उद्देश मनात धरून, काहीही करत नसत. 

किंबहुना तशा गोष्टींसाठी पोषक वातावरण, समाज व्यवस्था, कर्म इत्यादी काळाच्या ओघात हळूहळू विरळ होत गेलं आहे. आज अनेक प्रकारची प्रलोभनं, दूषित व कलूषित मनं हे आज सभोवती आहे. गेल्या काही शतकात ही स्थिती उभी राहिली आहे. पण ईश्वराने निर्माण केलेली भक्ती व्यवस्था ही कालातीत आहे.

सर्वसामान्य जनांना सहजी आत्मसात करून, जीवन पद्धतीत कोणताही बदल न करता, प्राप्त करता येते. ही किमया या भक्ती मार्गातील पहिल्या मार्गाची अर्थात श्रवण मार्गाची आहे. ईश्वराच्या नामाच्या मात्र श्रवणाने, हीच शुद्धता, सात्विकता प्राप्त होऊ शकते. अर्थात ती निर्हेतुक असेल तरच. पण ते काळाच्या ओघात साध्य करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत गेल्यास, मानव आपल्या या जन्मात, आत्म्याच्या शुद्धतेसाठी पुढील जन्मांची सोय करून ठेवता येते. 

पण ईश्वराला अपेक्षित असलेली श्रवण प्रक्रिया, खरतर या देहातील नसून, देहाआतील मन आणि आत्मा यांचा मेळ साधून, ईश्वर नाम, मनाच्या श्रुतीनी, ऐकून, चित्त शुद्धता साधण्यासाठी आहे. या देहाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अनेक इंद्रियांची निर्मिती, ईश्वराने खुबीने केलेली आहे. त्यांचा विचार फक्त आणि फक्त देह चालण्यासाठी नसून, देह जिवंत ठेवून,त्याद्वारे, ईश्वराला अपेक्षित, भक्तीचा मार्ग क्रमत जाणं, हे खरं जीवन आहे. 

पण हे आदर्श वाटणारं जीवन, प्रत्येक जीव वा देहधारी जगू शकेल हे शक्य नाही. किंबहुना, ईश्वर सुद्धा हे जाणतोच की, प्रत्येक जीव, स्वतंत्र विचार, मन, देह, देहाचे विकार, उपाधी हे धारण करून, जीवन कंठत असल्यामुळे आणि हे जगाच्या रहाटगाडग्यात असच सुरू राहणार असल्यामुळे, ईश्वर भक्तीचा आणि प्राप्तीचा मार्ग, काळानुरूप अधिक बिकट होत जाणार. 

मग अशी काय व्यवस्था ईश्वराने निर्माण केली आहे, ज्या योगे, जीव ईश्वर निर्मित भक्तीचा मार्ग अवलंबू शकतो, यावर पुढील भागात विचार करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...