Skip to main content

अध्यात्म विराम २०

अध्यात्म विराम २०

भौतिक जगतात आच्छादनं, प्रत्यक्ष उचलून काढावी लागतात. पण व्यक्तित्वावरील डाग हा उत्तम कर्म करून, दूर करता येतो. मनावरील किंवा आत्म्याला लागलेली काजळी ही अनेक जन्मांची असते. त्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करणं जरुरीं आहे. कल्पना करा की, मनाला अत्यंत वाईट संगती जडली आहे किंवा वाईट वागायची, बोलायची सवय लागली आहे. 

ठराविक काळानंतर, तो आपल्या नित्याचा भाग होऊन जातो. किंबहुना आपण तश्या प्रकारे न वागता राहू शकत नाही. आपलं मन आपल्याला त्यापासून लांब जाऊ देत नाही. काही सवयी इतक्या खोल रुजलेल्या असतात की, त्यांना काढून टाकणं, खूप कठीण असतं.या अश्या सवयी नित्याचा भाग असल्याकारणाने, अनेकदा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की, आपण असे वागतो आहोत. 

या अशा प्रकारच्या अनेक गोष्टींनी, मनाला एक प्रकारे बोथट किंवा संवेदना हिन बनवलं जातं. किंवा नित्याच्या सवयीने, ते तसं बनतं. उदाहरणार्थ एखाद्या वाईट मार्गी व्यसनी किंवा चुकीच्या पंथाला गेलेल्या माणसाला, एकदा सवय झाली की, ठराविक काळानंतर, त्याला त्याबद्दल काहीही वाटत नाही. म्हणजे सवय माणसाला अनेक चुकीच्या, वाममार्गी गोष्टींची भीती किंवा न्यून वाटू देत नाही. याचं कारण की, त्यास्थितीत मन, इतर कोणत्याही चांगल्या गोष्टी करू इच्छित नाही.

एकप्रकारे, मेंदूवर, विवेकावर, विचारांवर आच्छादन घातलं जातं. विवेक विचार व मेंदू यांवरील हे आच्छादन काढण्याचा किंवा वेगळा विचार रुजविण्याचा, सर्वात सोप्पा उपाय म्हणजे श्रवण. ब्रेनवॉश हा दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून केला जातो. पण त्यामध्ये मुख्य भर दिला जातो तो, कानांवाटे मनाला एक प्रकारचा ठराविक विचार करायला लावलं जातं. त्यानंतर मन, ऐकण्यात आलेल्या, त्या ठराविक गोष्टींनी भारावून जातं. 

तरीही, अश्याप्रकारे, नित्य सवयीने किंवा brain वॉश मुळे असेल, पण ज्यावेळी मन बोथट होतं आणि विवेक व विचार यांना जागा नसते, त्यावेळी मनापर्यंत पोचणारं एकमेव साधन म्हणजे श्रवण. आपण अनेकदा पाहिलं असेल की, एखाद्या क्रोधित झालेल्या व्यक्तीला, शांत करण्यासाठी, बाजूला असलेल्या व्यक्तीला, प्रसंगी त्यापेक्षा जास्त आवाजात ओरडावं लागतं. तरच ते बोलणं, त्यावेळी क्रोधित मनापर्यंत पोचतं. 

श्रवण हे असं माध्यम आहे, जे एखादा विचार, ध्येय, उद्देश यांना, यथोचितपणें हळूहळू मनापर्यंत पोचवू शकतं. मनावर आणि आत्म्यावर अनेक जन्मांची साठलेली पुटं काढणं, हे साध्य करण्यासाठी हळूहळू झिरपत जाणारं औषध, मनावर स्वल्प प्रमाणात सोडत गेल्यास, मनाला त्याचा विचार करावा लागतो. परंतु यामधे सातत्य हवं, ते नित्य व्हावं लागतं. 

श्रवण काय काय साध्य करू शकतं यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...