ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ ३ श्रीगणेशाय नमः !! श्रीज्ञानेश्वर माऊली नमोनमः !! श्रीसद्गुरुमाऊली नमोस्तुते !! सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ २.१८ ॥ हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २.२८ ॥ श्रीमद्भागवद्गीतेतील, ज्या मूळ ओवीवरून माऊलींनी वरील ओवी घेतली आहे ती खालीलप्रमाणे क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥२.३॥ श्रीकृष्ण परमात्मा पुरुषोत्तम समस्त जगताचे निर्माते, प्रत्येक प्राणीमात्र हा त्यांचाच जणू पुत्र. अश्या स्थितीत त्यांनी शेवटपर्यंत हे महाभारत युद्ध होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. अगदी पाच गावं घेऊन, पांडवांना शांती प्रस्ताव आपण मान्य करायला लावू, हे वचन, त्यांनी हस्तिनापूरच्या राज्यसभेत, शेवटचा प्रयत्न म्हणून, देऊन पाहिलं. यामागे खरंतर दोन कारणं होती. एक म्हणजे आपण जे करू त्यावर पांडवांचा पूर्ण विश्वास आहे याची श्रीकृष्णांना खात्री होती आणि आपल्यावर त्यांची प्राणापलीकडे श्रद्धा आहे हे भगवंतां...