उदघाटन (फर्मास विनोदी कथा १) आटपाट नगराचा राजा विनोदचक्रम, हा नावाप्रमाणेच खरच एक विनोदवीर होता. त्याचा प्रधानजी,कररमखुरर्म हे त्याच्यापेक्षा जरा बरा होता. राजाच्या बरोबर कुठेही प्रधान जात असे, कारण राजा काय घोळ घालेलं याचा नेम नसायचा. नेहमीप्रमाणे राजा आणि प्रधान नगरातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघणार होते. त्यामुळे महालात सगळी लगबग सुरू होती. महाराज कुठेही निघाले की, त्यांच्या खानसाम्यापासून सर्व लवाजम्यासह, राजा कोणत्याही कार्यक्रमात जात असे. त्यामुळे सर्व गडबड गोंधळ सुरू होता. प्रधानजी महालाबाहेर, महाराजांची वाट पहात, तिष्ठत उभे होते. प्रधानजी महाराजांना, महालाबाहेरूनच, विचारतात. प्रधान : महाराज आपण रेडी आहात काय राजा : अरे काय अजय विजय सुजय काय असतं का नाही तुमच्यात प्रधान: चूक झाली , घाईत विसरलो. महाराजांचा विजय असो. राजा: कोण आहे तिकडे, काय काम आणि डायरेक्ट आतपर्यंत कसे आलात. प्रधान: महाराज मी प्रधानजी. राजा: आम्ही पण जी म्हणायचंय का तुम्हाला. प्रधान: नाही मी नुसताच प्रधान आहे. राजा: खरं आहे, नुसतेच आहात तुम्ही, बोला का आलात एवढ्या आत, काय काम आहे. प्र...