Skip to main content

अध्यात्म विराम ६५

अध्यात्म विराम ६५

दास आणि दास्यत्व म्हणजे स्वामी आणि स्वामीसेवक हे नातं नसतं, तर हा ऋणानुबंध असतो. याचं कारण सुद्धा तसच आहे. दास म्हंटल्यावर काल सांगितलं त्याप्रमाणे, श्रीहनुमंत ज्याप्रमाणे स्मरणात येतो. त्याचप्रमाणे दुसरं नाव स्मरणात येतं ते म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामी. दास्य भक्तीची या दोन अलौकिक आणि अद्वितीय मूर्ती आहेत. श्रीसमर्थ रामदास स्वामी हे हनुमंताचे अंशावतार मानले जातात. 

त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्र यांनी, हनुमंताला कलियुग अंतापर्यंत चिरंजीवीत्व बहाल केलं, तेंव्हा अवतार समाप्तीला प्रभूंनी हनुमंताला कर्तव्य दिलं की, सृष्टीत ज्या ज्यावेळी भगवत भक्तीचा दुष्काळ येईल, धर्मावर आरिष्ट येईल व ज्या ज्यावेळी अधर्माची सावली, धर्माला ग्रासण्यास सिद्ध होईल, त्या त्यावेळी तू त्या भक्तीची पुनर्स्थापना करून, भक्ती मार्गी जनांना अभय प्रदान करून आणि सन्मार्गा वर चालण्यासाठी आदर्श घालून देशील. यासाठीच ज्या ज्यावेळी भुलोकी देहधारणा आवश्यक आहे, त्या त्यावेळी देह धारण करून ते कार्य तू पार पाडशील. म्हणून अधर्म बलवान होताना दिसेल आणि त्यावेळी त्याला नामोहरम करून, धर्मध्वजा स्थापित करणारा येईल, तो हनुमंत अंश जाणावा.

दास आणि स्वामी हे या विश्वातील अलौकिक आणि खरंतर सर्वात प्रथम आणि नैसर्गिक नातं आहे. याचं कारण म्हणजे परम आत्म्यातून अंश रुपात आत्मा या भूलोकी आला, त्याचवेळी भक्त आणि भगवंत हे आणि त्याचबरोबर स्वामी आणि दास हे नातं, विश्वात सर्वप्रथम निर्माण झालं. बाकी सर्व नाती आणि रीती त्यानंतर, पृथ्वीवर, मानवाने निर्माण केल्या. 

स्वामी आणि दास, हे अलौकिक प्रेमाचं आणि स्नेहपूर्ण संबंध असलेलं अद्भुत नातं आहे. खरंतर ऋणानुबंध हा शब्द या नात्याला एकदम चपखल बसतो. याचं कारण म्हणजे, स्वामीची सेवा व भक्ती करून, भक्त भगवंताला आपल्या ऋणात बांधून ठेवतो. त्याबद्दल स्वामी भक्ताला आपल्या हृदयात स्थान देऊन, त्याचं सर्व क्षेमकुशल करण्याचा भार, आपल्यावर घेतो. म्हणजे भक्ताला आपल्या अनन्य कृपेच्या ऋणात बद्ध करून घेतो.

बरं ही बद्धता, एखादी बेडी नसते. तर हा हवीहवीशी वाटणारी आणि या ऋणाचा भार न वाटता, स्नेहपुर्ण अजोड आणि अतूट बंध निर्माण करणारी बद्धता आहे. या बंधात बद्ध होऊ शकणारा भक्त, सर्वात भाग्यवंत समजला जातो. कारण या बद्धतेत मुक्ततेचा मार्ग आपो आप जीवाला, जीवनाच्या अंतिम उद्देशाकडे घेऊन जातो. त्यानंतरच्या प्रत्येक जन्मात, स्वामी आपल्या दासाला, त्या उद्देशाकडे घेऊन जाण्यासाठी, प्राप्त असेल ते सर्व कळत नकळत घडवत जातो. 

दास्यभक्ती बद्दल अजून सविस्तर चिंतन करूया. उद्याच्या भागात. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...