Skip to main content

अध्यात्म विराम ४६

अध्यात्म विराम ४६

श्रवण, कीर्तन आणि स्मरण या सहजसाध्य मार्गांनी, सर्व सामान्य माणसं, आपला अध्यात्मिक विकास साधतील, हा ईश्वर मान्य भक्तिमार्ग असला तरीही, देहाचे भोग, उपभोग, विकार व विखार, माया,हे सर्व देहाच्या माध्यमा तून जीवाशी खेळ खेळतात आणि काळ या सर्वांचा साक्षी असतो. तो क्षण क्षण आपला फास प्रत्येक जीवा भोवती आवळत जातो. हा फास प्रत्येक जीवाला दंभ, अहंकार, मिथ्या अभिमान, अहंगंड या विकृत विवरात फिरवत ठेवतो.

याचे नित्य शिकार होत, प्रत्येक जीव, आपल्याच अहिता कडे, स्वतःला घेऊन जातो. या अहितकारक मार्गाकडून हितकारक, उद्देशिय मार्गाकडे जाण्याची बुद्धी जीवाला, ईश्वर नामाच्या श्रवण, कीर्तन व स्मरण यातून येत जाते. पण क्षण क्षण या बुद्धीवर, प्रापंचिक कर्म, षड विकारी व्यवधान, माया,मोह याची पुटं, त्या शुद्ध मन, बुद्धी, विचार यांवर चढत जातात. ही नित्य साठणारी पुटं, नित्य साफ करून, मनाला नित्य अशुद्धतेकडून, शुद्धतेकडे नेत राहणं, हे प्रत्येक जिवाचं कर्तव्य आहे.

किंबहुना हे शुद्धीकार्य नित्य करत राहण्यासाठी, मन हे निर्गुण निराकार इंद्रिय, जगत पतीने घडवून मानवाच्या देहात, सर्वत्र त्याचा संचार राहील, हे पाहिलं आहे. या मनाचा हा संचार, त्याच्या लवचिकतेमुळे, सहजी शक्य आहे. पण अहं व स्व इतका घट्ट, आग्रही आणि कर्मठ असतो की, तो या मनाला, लवचिकतेकडून, निष्ठुरतेकडे म्हणजेच तरलते कडून जडत्वा कडे नेतो. हे मनाचे जडत्व, माणूस अनेक कारणांनी, मनावर आच्छादन म्हणून लपेटून घेतो. 

या आच्छादनामुळे माणूस, चित्त शुद्धीच्या मार्गांना, क्षणांना मुकतो. या सर्वांचं महत्व अंत समय येताना, प्रत्येक जीवाला जाणवत. कारण त्यावेळी, देहाबाहेर जाणारा आत्मा, पूर्ण जागृत अवस्थेला येतो. तोपर्यंत बुद्धीच्या, देहाच्या, मनाच्या अभिमान, अहं, दंभ या शत्रूंनी, त्या आत्मतत्वाचा ताबा घेतलेला असतो. अंत समय आला की, हे सर्व विकार, शत्रू, यांना तो ताबा सोडवा लागतो आणि प्रत्येक जीवाला काही क्षणांची आत्मजागृती होते. 

म्हणूनच बहुतेक जीव, त्या शेवटच्या क्षणात, आपण आयुष्यभर केलेल्या चुका, घात, अपराध, प्रमाद यांना आठवून विषाद, खेद व दुःख यांचाच अनुभव घेतात. त्यातील काही प्रसंग इतके जिव्हारी असतात, की होणारा पश्चात्ताप, हा आत्मशुद्धी करण्यास असमर्थ असतो. कारण पश्चात्ताप दग्ध जीव, हे घर सोडून जात असतो. त्याला परिमार्जन करण्यासाठी समय मिळतच नाही. 

हे सर्व वेळीच ओळखून, आपण जीवाला, योग्य त्या शुद्धीकरण प्रक्रियेत घेऊन जाणं, हे प्रत्येक जीवाच नीज कर्तव्य आहे. यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...