Skip to main content

अध्यात्म विराम २३

अध्यात्म विराम २३

 काल आपण पाहिलं त्याप्रमाणे, ईश्वराने भेदाभेद ठेवला नाहीये.मार्ग अनेक आणि भिन्न भिन्न घालून दिलेत, अनेक शास्त्र,वेद पुराण इत्यादी मांडून ठेवलं. पण त्यामागे प्रयोजन, उद्देश, उद्दिष्ट हे एक आणि एकच आहे. मानवी देह, या शेवटच्या टप्प्यात आलेला जीव हा, मोक्ष, मुक्ती वा संपूर्ण उद्धार, या शेवटच्या पायरी पर्यंत पोचला पाहिजे. 

म्हणजे ईश्वरी इच्छा तशीच आहे. ईश्वराची सारी लेकरं, मोक्ष आणि मुक्ती या अत्युच्च मार्गाकडे जावीत, हे ईश्वरी प्रयोजन आहे, हाच ईश्वरी संकेत आहे. आपण त्या मार्गाला जाणत नाही, जाणून वळत नाही, वळूनसुद्धा गांभीर्याने ते घेत नाही, हा आपला कर्मदोष आहे. दोष यासाठी की, आपल्या जाणीवा, त्याप्रमाणात आणि त्यासाठी जागृत होत नाहीत, बुद्धी वळत नाही, विचार येत नाहीत, म्हणजेच आपलं कोणततरी कर्म असं काही फल देण्यास बाकी आहे, जे भोगण्यासाठी, आपल्याला त्याप्रमाणे सहाय्यक कर्म करण्याची बुद्धी होते.

म्हणजे बुद्धी त्या मार्गाला, मन वा आत्मा यांना जाऊ देत नाही. काही पडदा किंवा आच्छादन, माया, लोभ, मोह, क्रोध, काम, इत्यादी शटविकार आपल्या मार्गात ठाण मांडून बसतात. त्यातून, चुकीचं वर्तन, गैरमार्गाने जाणं, अनैतिक गोष्टी घडणं हे सर्व होत जातं. या मधे जीव लगेच वाममार्गी होतो असं नाही. कारण ईश्वराच्या सर्व कायद्याप्रमाणे इथेही पद्धती किंवा पायऱ्या आहेत. 

प्रथम जीव मोह, माया यांच्या जाळ्यात, अज्ञानाने अडकतो. लोभ, क्रोध व काम सहजी कोणालाही अडकवत नाहीत. त्यांच्या सुद्धा पद्धती आणि नियम असतात. माणूस आपणहून त्यांच्या जाळ्यात, कर्मधर्म संयोगाने, अनवधानाने अडकतो किंवा ओढला जातो. अर्थात असं चुकून घडण्यात, त्याचंच कोणततरी पूर्वकर्म कारण असतं. 

पण प्रत्येकाला अश्या स्थितीत अडकण्याआधी सावध करणारे संदेश, लहरी, प्राप्त होतात. काहींना त्याचे अर्थ समजतात. तर काहीना ते लक्षात येत नाहीत. या सावध करणाऱ्या लहरींना किंवा त्या संदेशांना ओळखण्यासाठी लागणारी पात्रता, त्याचं व्यक्तीच्या पूर्वकर्माने प्राप्त होते. 
यावर अजून सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया. पण तोपर्यंत, ही ईश्वरी व्यवस्था किती अद्भुत आहे, याचही चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...