Skip to main content

अध्यात्म विराम ८७

अध्यात्म विराम ८७
 
सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला मुळातच सद्गुरू तत्वाची निर्मिती का करावीशी वाटली किंवा का करावी लागली, यावर जरा विचार करूया. आपल्या अनंत नेत्र, मन, बुद्धी आणि ध्यान या माध्यमातून,चराचरात सर्वत्र नजर ठेवूनही ध्यानस्थ वा समधिस्थ असलेल्या ईश्वराने,आपल्या प्रत्येक कार्य करण्यासाठी आपल्याच अंशातून,अनेक अंश निर्माण करून, एकप्रकारे कार्य विभागणी केली आहे. ज्याला आजच्या भाषेत खाते वाटप म्हणतात त्या प्रमाणे. यातून कार्याची सुसूत्रता येते आणि प्रत्येक कार्याला वाहिलेल्या त्या त्या स्वरूपाना, मर्यादित किंवा अमर्यादित अधिकार दिले की, त्या कार्यात, परम अंश ईश्वराला पुन्हा लक्ष घालायची आवश्यकता नाही.

या, दिलेल्या मर्यादित अधिकारात, त्या त्या इष्ट देवतेने किंवा ईश्वर प्रतिनिधीने, जर काही आपल्या अधिकारा बाहेर अतिरिक्त प्रदान केले व त्यातून काही,गैर किंवा धर्म,जगत वा जनसामान्य यांच्याबाबत काही अहित कारक, अघटीत किंवा जगताला आघात करणारे काही घडताना दिसले तर, त्याचं परम अशाला, त्यात दखल देऊन, सर्व सुरळीत करून, पुन्हा आपल्या मूळ स्थानी जावे लागते. या प्रक्रियेसाठी सर्वसाधारण प्रत्येक युगात एकेक वेळा तरी, ईश्वराला यावेच लागते. 

तरीही साधारण विचार केला तर, इतर वेळी, जेंव्हा जसं संकट, सावट, प्रश्न, समस्या असेल त्यानुसार आपला अंश प्रतिनिधी पाठवून, काही प्रमाणात गाडी रुळावर आणण्याची व्यवस्था, याचं परम ईश्वराने निर्माण केलेली आहे, हे इतिहास, पुराणं यांची पडताळणी केल्यास, लक्षात येत. पण हा झाला काही चुकीचं,धर्मबाह्य घडल्या नंतरचा प्रश्न. पण विधात्याचा,जगत रचनेचा आणि मानव निर्मितीचा मूळ उद्देश, या जगतातून, मानवी देहातील अद्भुत रचनेचा सदुपयोग करून, मानवाने आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गाकडे जावे आणि त्यातून त्या परम ईश्वरी अंशाकडे पुन्हा जाण्याचा मार्ग अनेक जीवांना मिळावा आणि त्यांनी तो योग साधून मज पर्यंत यावे, हा आहे. 

मार्ग मिळणं, त्यासाठी काहीतरी करणं आणि चुकत धडपडत आपल्या लक्षाकडे जाणं, हा या जगतातील आणि अध्यात्मातील मार्गाचा नित्य खेळ आहे. पण त्यासाठीची जाणीव, भूक, जिज्ञासा, उत्सुकता जागृत होणं आणि त्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्याची जिद्द, चिकाटी अंगी येणं किंवा जागृत होणं, यासाठी नक्कीच ज्ञान प्राप्ती होणं महत्वाचं आहे. यातून जाणिवांची जागृतीहोण्यासाठीच, आवश्यक सहाय्य, नित्य प्रत्येकाला मिळावं, नव्हे तर त्यासाठी कोणीतरी कनवाळू, कृपाळू व चिरंतन उपलब्ध असावं, ही जाणीव ईश्वराला झाली असावी आणि त्यातूनच, सद्गुरू या परम कृपाळू तत्वाची निर्मिती, ईश्वराच्या हातून झाली असावी. 

विश्वाच्या नव्हे तर ब्रम्ह व ब्रम्हांडाच्या निर्मितीपासून, विश्व निर्माता एक तत्व, एक नियम व एक निती जपत आलाय, किंवा त्याने तसा नियम स्वतःला घालून घेतलाय की, काही तरी घडायला काहीतरी कारण असावं लागतं. म्हणजे विनाकारण या ब्रम्हांडात सुई सुद्धा निर्मित होऊ शकत नाही. याची अनेक उदाहरणं आहेत. या घडणाऱ्या सर्व कारणांनाच ईश्वराची लीला संबोधलं जातं. 

याच मुद्द्यावर आपला विषय पुढे नेऊया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत विधात्याच्या या अद्भुत कार्याचा आनंद घेत, त्याला स्मरणात धन्यता मानूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...