Skip to main content

अध्यात्म विराम ५६

अध्यात्म विराम ५६

वंदन हे आहेत मात्र तीन शब्द. पण त्यामागे कृती, देह, बुद्धी, मन, प्राण आणि आत्मस्वरूप यां पाचांना आपल्या आराध्यासमोर अर्थात त्या सत् चित् आनंद स्वरूप परम इश्वरासमोर नत होऊन, त्या शक्तीची आराधना, वंदना, अर्चना व प्रार्थना रूप भक्ती करतात,हा भाव व ही स्थिती अपेक्षित आहे. म्हणजे जे श्रवणा तून हृदयात पोचलं, ते स्मरण रुपात हृदयी दृढ धरलं. त्या हृदयस्थ ईश्वराचे पाद सेवन करून,त्या ईश्वराची अर्चना करण्याचा भाव, म्हणजे भक्ती. 

आपण ईश्वराची अर्चना, प्रार्थना करतो, तेंव्हा कळत नकळत आपण, त्या शुद्ध सात्विक स्वरूपाला वंदन करून, आपल्या मनातील सकारात्मक लहरी, त्या शक्ती पर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मुळात अर्चन आणि वंदन ह्या कृती किंवा भक्तीचे हे दोन मार्ग परस्पर पूरक आहेत. दोन्ही हातात हात घालून येतात.

कारण आपण एखाद्याची अर्चना, प्रार्थना, करताना मनात तेच भाव उधृत होतात आणि देह आपोआप नतमस्तक होऊन, नकळत वंदन केले जाते. जरा आठवून बघा, आपण जेंव्हा जेंव्हा एखाद्या मंदिराच्या समोरून जातो किंवा प्रत्यक्ष मंदिरात जातो, त्यावेळी नकळत आपले दोन्ही हात जोडले जाऊन, मनात किंवा वेखरित, आपण त्या देवाला नतमस्तक होऊन वंदन करतो. 

हा त्या स्थितीत मनातील दृढ भाव नकळत देहाला सुद्धा त्याचं स्थितीत घेऊन जातो. त्यावेळी तो निव्वळ उपचार न राहता, त्या मूर्तीत, मनःचक्षूनी, आपलं आराध्य जागृत आहे,हा भाव योजून, त्या आराध्याला केलेलं वंदन असतं. हा सहावा भक्तीमार्ग नित्य अवलंबला जात असतो. किंवा आपणच आपल्या नकळत, एक भक्ती मार्ग अवलंबून, इष्ट देवतेला, ईश्वराला वा सद्गुरूंना नतमस्तक होऊन, आपलं देह, बुद्धी मन, हृदय व आत्मा त्या चरणांवर स्थिर करून, आपल्या इच्छा आकांक्षा वाहून, मनःशांतीची अनुभूती घेतो.

अश्या मनःशांती, अनुभवाची अनुभूती घेता येणं, म्हणजे आपल्या मनातील भक्ती भाव सुदृढ आहे, हे जाणावं. हीच ईश्वराच्या अस्तित्वाची मनातील प्रचिती जाणावी. पण अशी अनुभूती येत नसेल तर एकतर आपण असं वंदन,निव्वळ उपचार म्हणून करत आहोत किंवा आपल्या मनात भौतिक जगतातील व संसारातील काही इच्छा वा आकांक्षा शेष आहे, ज्याच्या अपूर्णतेमुळे आपलं मन स्थिर होऊ शकलं नाही. 

या अपूर्णता भावावर उद्याच्या भागात पुढे चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...