Skip to main content

अध्यात्म विराम ६०

अध्यात्म विराम ६०

आपण देवाला हात जोडून वंदन करतो, त्या क्षणासाठी आपण आणि या ब्रम्हांडाचा नायक, ईश्वर, यांच्या मधे कोणतीही दुसरी शक्ती येऊ शकत नाही. मन बुध्दी देह यांना क्षणासाठी पूर्ण शांतता, मिळण्याचं ठिकाण आणि क्षण फक्त आणि फक्त तोच असतो. पण यामधे सर्वात अडचण कसली येत असेल तर ती आपल्याच मनाची. मुळात हे मन, त्या वंदन क्षणी, पूर्ण स्थिर होऊन, त्या श्री चरणांवर लीन व शरणागत झालं तरच, वंदन हे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जातं.

मुळात वंदन हा एक उपचार वा आचार नसून, ते भगवंत आणि भक्त यांचं मनोमिलन आहे. ही एकच वेळ व एकच स्थळ असं आहे, जिथे निर्गुण निराकार ब्रम्ह आणि निर्गुण निराकार मन यांचं अद्भुत मिलन होतं किंवा होऊ शकतं. पण त्यासाठी या भक्त व भगवंत मिलनाच्या अलौकिक दिव्य क्षणी, त्या अलौकिक कार्याचं महत्व आपण स्वतः जाणून घेतलं पाहिजे. 

या वंदन क्षणाला निर्गुण निराकार ब्रम्ह स्वरूप ईश्वर व त्याचं अंशात्मक प्रातिनिधिक रूप असलेलं आत्मस्वरूप तत्व, यांनी एकमेकांसमोर येण्याचा हा क्षण आहे. याच क्षणाला साक्षी ठेवून, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की, "देवाचीये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या". 

त्याचा भावार्थ, आज या निमित्ताने जाणून घेऊया. क्षण भर म्हणजे हाच तो क्षण, ज्यावेळी देहातील अंतरात्मा मनाच्या माध्यमातून, चराचरात व्याप्त पण निर्गुण रुपात अप्रकट असलेल्या ईश्वराला शरण जाऊन, लीन भावात वंदन करतो. आत्मतत्त्व निर्गुण, निराकार कारण त्याला आकार, ऊकार काही नाही. विदेही असताना, त्याला व्यक्तता सुद्धा नाही. सारी व्यक्तता ही देहात आल्यानंतरच शक्य आहे. 

मन हे सुद्धा देहातील एक इंद्रिय असूनही, आकार, रूप, नसल्यामुळे देहाशिवाय अव्यक्त आहे. म्हणजे आत्मा आणि मन हे दोन्ही, एखाद्या देहात नसतील तरच व्यक्त , अन्यथा अव्यक्त. म्हणजेच यांच्या व्यक्तते साठी, देहाची साथ आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, यांच्या एकतानते साठी, देहाचं या दोन्हींशी तादात्म्य किंवा एकरूप होणं अत्यंत महत्वाचं आहे. 

हे तादात्म्य साधण्यासाठी, त्या एका क्षणाला,या तिन्हीना, एकरूप होणं आवश्यक आहे. ही एकरूपता किंवा एकात्मता साधल्यानंतर, त्या निर्गुण निराकार परब्रम्ह परम तत्वाला, मन व आत्मा यांना भेटवत आहोत हा विचार मनात दृढ करावा आणि ही भेटीची दिव्य अनुभूती, मन आत्म्याला प्राप्त करून देत आहे, ही कल्पना, मनात रुजवून मगच, त्या क्षणी नमन व वंदन केलं पाहिजे. तरच माऊली म्हणतात त्याप्रमाणे, हा योग, नित्य साधून येईल. 

याच्या इतर अनेक बाजूंचा व भावांचा सर्वंकष विचार उद्याच्या भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...