नाम अवतार कलियुगी - ५ ©® संकल्पना, शीर्षक आणि लेखन : प्रसन्न आठवले मन आणि बुद्धी हे, या अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी, काय काय साध्य करू शकतात ते बघण्या आधी यांच कार्य आणि शक्ती स्थान पाहुया. - सर्वसामन्यपणे बुद्धीची आकलन शक्ती, झेप , स्मरण शक्ती, तार्किकता या सर्व गोष्टी प्रचंड प्रमाणात असतात. - अस पाहणीत आढळलय की सर्वसामान्यपणे बहुतांश लोक आपल्या उजव्या मेंदूच्या क्षमतेच्या काही टक्के अथवा नगण्य वापर देखील करत नाहीत, पूर्ण आयुष्य भर सुद्धा. अस म्हटल जातं की, आइन्स्टाइन सारख्या अणुवैज्ञानिकाने सुद्धा पूर्ण आयुष्यात जास्तीत जास्त ३% उजव्या मेंदुचा वापर केला होता. म्हणजे सामान्य माणसाची बातच सोडा. - अजुन एक मुद्दा जो आता कुठे उजवा मेंदू यावर विश्वास आणि संशोधन सुरु झालय. आइन्स्टाइनने उजव्या मेंदुचा वापर 3% टक्के पर्यन्त केला होता व अगम्य वाटणाऱ्या गोष्टी व अनुसंशोधन घडवून आणल. इथे एक उदाहरण आठवलं स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणशक्तिबद्दल. एकदा स्वामीजी अमेरिकेत एका पूलाच्या कठड्यावर बसुन पुस्तक वाचत होते. आणि एक पान वाचून ...