Skip to main content

अध्यात्म विराम ३६

अध्यात्म विराम ३६

कालच्या विषयात पुढे जाऊया. 

त्यातच कीर्तनाची ही परंपरा, ईश्वराचे अत्यंत प्रिय भक्त स्वतः देवर्षी श्री नारदमुनी यांनीच सुरू करून दिलेली असल्यामुळे आणि अनेकानेक कीर्तन, प्रवचन, भजन प्रेमी जनांनी, आज करोडो वर्षे ती परंपरा, प्राणपणाने देवकार्य जाणून व सेवा कार्य समजून, अखंड जपलेली आहे, सुरू ठेवलेली आहे. 

त्यामुळे आजही, भक्तीचा हा मार्ग, विनासायास करोडो जनांना आजही उपलब्ध आहे. कोणताही त्रास सहन न करता, कोणतेही विशेष श्रम न घेता, नामाचा, संकीर्तन हा सहज साध्य मार्ग, ईश्वराकडून आलेला आणि त्याच ईश्वरप्रातीसाठी घेऊन जाणारा, राजमार्ग आहे. 

हा उपयुक्त, सदोपायोगी राजमार्ग मुख्यतः आपल्याला सहजच भक्तिच्या प्रांगणातील, तिसऱ्या राजमार्गाकडे नेतो. भक्तीचा हा तिसरा राजमार्ग ईश्वर भक्तीचा मुख्य कणा, उद्देश, साध्य, साधन, असलेला स्मरण हा मार्ग आहे. मुळात माणसाची श्रवणातुन ऐकलेले, दीर्घकाळ मेंदूत टिकून राहते. 

नव्हे तशी व्यवस्थाच ईश्वर या वैज्ञानिकाने देहात करून ठेवली आहे. जे श्रवणी पडेल ते मेंदूत साठवलं जाईल आणि मनातील जागृत, अर्धाजागृत किंवा स्वप्नं आणि सुप्त किंवा सूषुप्ती या अवस्थेत मनात नोंदवून ठेवलं जातं. योग्यवेळी मनाच्या स्थितीनुसार ते मनाच्या जागृत पटलावर किंवा पृष्ठभागावर येतं. अर्थात यामधे मेंदू व मन यातील समतोल साधलेला असणं अत्यंत आवश्यक आहे. 

तसा तो समतोल नसेल, ते मनात एक विचार आणि मेंदूत भलतीच खलबतं किंवा गोंधळ होऊ शकतो. असं सहसा मन, मेंदू, देह हे किंवा यापैकी कोणीही थकलेलं, त्रस्त, भावना रहित किंवा अती भावना वश असेल तर, मनात असलेले विचार मेंदूत येऊ शकत नाहीत, झाकले जातात किंवा पटलावर येऊनही व्यक्त होऊ शकत नाहीत.

मनाचा,देहाचा, बुद्धीचा हा सर्व पसारा आणि कर्म गतीचा फेरा सांभाळत जीवनात,मूळ उद्देशाप्रत जाण्याचा विचार सुद्धा माणूस कित्येकदा करू शकत नाही. म्हणूनच ईश्वरी कृपा मानवाला आपल्या उद्देशाकडे जाण्याबद्दल सुचावं म्हणूनच भक्ती मार्गातील तिसऱ्या पायरीकडे जावा, ईश्वराने म्हणूनच वैज्ञानिक दृष्टीने मानवाची रचना केली आहे. 

त्याबद्दल पुढील भागात विस्ताराने जाणून घेऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...