Skip to main content

Posts

Showing posts with the label अध्यात्म विराम

अध्यात्म विराम २०२

अध्यात्म विराम २०२   एखादी सेवा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या सेवेचे मूल्य चुकते केले की ती सेवा आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी, त्याचे आवश्यक मूल्य प्रदान करणे क्रमप्राप्त आहे. दुसरी अट त्यासाठी ही आहे की, ती सेवा जिथे उपलब्ध आहे तिथे आपल्याला जावे लागते. या जगतात आल्यानंतर, या जगतातील प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून आपण अनेक गोष्टी गेल्या करोडो वर्षात निर्माण केल्या. ज्याचा लाभ अब्जावधी देहांनी घेतला.  हे सर्व सेवन करून आपण या देहाचा उदरनिर्वाह करतो. उदर म्हणजे पोट. म्हणजे आपण पोटाच्या माध्यमातून, या देहाचा निर्वाह करतो.अर्थातच यामधे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या देहाचं सर्व सूत्रसंचालन उदर अर्थात पोट या माध्यमाने करण्याची सोय,देह निर्माण करताना, ईश्वराने निर्माण केली. मुळात एक लक्षात घ्या की, प्रजोत्पादन करण्याचं मुख्य कार्य, सूत्र व व्यवस्था ही ईश्वर निर्मित असल्यामुळे, या मानवी देहातून, जी जी निर्मिती होते, ती ईश्वरीय देणगीतून घडते.  कारण कार्य देह करत असला तरीही, त्यामागे ऊर्जा शक्ति व चैतन्य हे, संपूर्णपणे ईश्वर निर्...

अध्यात्म विराम २०१

अध्यात्म विराम २०१   संत, महंत, साधू, सज्जन हे ईश्वराच्या समीप असतात, याचा नेमका अर्थ असा की, हृदयस्थ आत्म्याच्या गाभाऱ्यातील ईश्वराला सर्वसाक्षी मानून, प्रत्येक क्षणाचं त्यांचं कर्म ते करत असतात. त्यामुळे प्रत्येक कर्मामागे, त्यांचा भाव हा ईश्वरीय पूजन, अर्चन यासमान असतो. कारण जेंव्हा ते प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या साक्षीने करतात, त्यावेळी प्रत्येक कर्मात त्यांना ईश्वराचं अधिष्ठान असल्याची प्रचिती आणि अनुभूती त्यांना प्राप्त होते आणि त्या प्रत्येक कर्माला शुद्धता प्राप्त होते. याचा परिणाम प्रत्येक क्षण, त्यांना ईश्वराच्या सांनिध्याचा अनुभव येतो.  आपण अनेकवेळा अनुभव घेतला असेल की, आपल्या घरी पाहुणे आल्यावर, आपल सर्व कर्म, कार्य, उद्देश, सर्वकाही आपण त्यांना आराम पडावा, आनंद मिळावा आणि त्यांचं येणं सार्थकी व्हावं, यासाठी आणि याचं उद्देशाने करतो. त्याचप्रमाणे या देहाच्या, सर्वात शुद्ध सात्विक इंद्रिय असलेल्या हृदयात असलेल्या अतिशुद्ध आत्मतत्वात अखंड पाहुणा रूप निवास करणाऱ्या ईश्वराच्या अंशाला आपण कधीच न जाणल्यामुळे आपण, ज्याप्रमाणे पाहुणे आल्याचं लक्षात न येता त्यांच्यासमोर नको नक...

अध्यात्म विराम २००

अध्यात्म विराम २००   आज या मालिकेचे २०० भाग झाले, त्याबद्दल मी सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांचा व वाचकांचा सदैव ऋणी राहीन.  तारुण्याच्या, उत्साहाच्या, अविवेकाच्या रेट्यात, माणूस कित्येकदा, अगदी देवाचं अस्तित्व सुद्धा नाकारतो. म्हणजे मी जन्माला आलो त्यात माझं स्वतःचं काय कर्तृत्व आहे, त्या अनुषंगाने विचार करावा. अर्थात इतकी जाण असलेला मनुष्य असल्या गोष्टी करणार नाही, हे नक्कीच. पण आपण आपल्याला प्राप्त, बुद्धीची कुवत आणि मनाचं स्वातंत्र्य या जोरावर किती उड्या माराव्यात, याला काही मर्यादा असतात. आपल्याच कर्माच्या दोषाने, ज्यावेळी या मर्यादा पार करून, आपणच संकटं उभी करतो, तेंव्हा सुद्धा आपण त्या अस्तित्वात नसलेल्या देवाला नावं ठेवतो, तेंव्हा हे विसरतो की एकेकाळी, याचं तथाकथित देवाचं अस्तित्व आपणच नाकारलं होतं. असो. आपल्याला, आपल्याही नकळत, सावरण्याचा, थांबवण्याचा व अडवण्याचा प्रयत्न, सद्गुरू व ईश्वर अनेक वेळा गूढ व गहन संकेत देऊन, कित्येकदा करत असतात. आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊन आपण ते नाकारतो. आता सांकेतिक किंवा गूढ संदेश का दिले जातात, याबद्दल ...

अध्यात्म विराम २००

अध्यात्म विराम २००   आज या मालिकेचे २०० भाग झाले, त्याबद्दल मी सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांचा व वाचकांचा सदैव ऋणी राहीन.  तारुण्याच्या, उत्साहाच्या, अविवेकाच्या रेट्यात, माणूस कित्येकदा, अगदी देवाचं अस्तित्व सुद्धा नाकारतो. म्हणजे मी जन्माला आलो त्यात माझं स्वतःचं काय कर्तृत्व आहे, त्या अनुषंगाने विचार करावा. अर्थात इतकी जाण असलेला मनुष्य असल्या गोष्टी करणार नाही, हे नक्कीच. पण आपण आपल्याला प्राप्त, बुद्धीची कुवत आणि मनाचं स्वातंत्र्य या जोरावर किती उड्या माराव्यात, याला काही मर्यादा असतात. आपल्याच कर्माच्या दोषाने, ज्यावेळी या मर्यादा पार करून, आपणच संकटं उभी करतो, तेंव्हा सुद्धा आपण त्या अस्तित्वात नसलेल्या देवाला नावं ठेवतो, तेंव्हा हे विसरतो की एकेकाळी, याचं तथाकथित देवाचं अस्तित्व आपणच नाकारलं होतं. असो. आपल्याला, आपल्याही नकळत, सावरण्याचा, थांबवण्याचा व अडवण्याचा प्रयत्न, सद्गुरू व ईश्वर अनेक वेळा गूढ व गहन संकेत देऊन, कित्येकदा करत असतात. आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊन आपण ते नाकारतो. आता सांकेतिक किंवा गूढ संदेश का दिले जातात, याबद्दल ...

अध्यात्म विराम १९९

अध्यात्म विराम १९९ लहापणाचा आपण जर सूक्ष्म अभ्यास केला तर, हे लक्षात येईल की, ज्या गोष्टी डोळ्यांना आकर्षित करतात, त्या लगेच मनात ओढ निर्माण करतात. कदाचित मायेच्या खेळाचा हा अवगुण असेल की, चित्ताकर्षक वस्तू, चित्र, व्यक्ती इत्यादींची ओढ आणि आकर्षण डोळ्यावाटे मनाला खेचून, तिथे बांधून ठेवतात. जर हे दृश्य काही सेकंदाचं असेल तर, मन त्या स्थानी पुन्हा पुन्हा जायला उत्सुक होतं आणि तिथेच बांधलं जातं. त्यानंतर त्याच्या प्राप्तीची ओढ मनाला नित्य त्या गोष्टीच्या आकर्षणात ठेवते.  ही गोष्ट सर्वात प्रथम अगदी लहान मुलांच्या बाबतीत आपण पाहू शकतो की, आकर्षक रंग, वेगळ्या प्रकारची वस्तू, खेळणं इत्यादी लहान मुलांना आकर्षित करतात आणि मग त्यासाठी ते मूल काहीही करू शकतं. त्यानंतर ती गोष्ट सहज प्राप्त झाली,तर आनंद, नाही मिळाली तर रडण्यापासून ते आकांडतांडव करण्यापर्यंत सर्व हतकंडे ते मूल उपयोगात आणतं. त्याला एकदा कळलं की, हे केल्याने आपला कार्यभाग साधतो आणि आपल्याला हवं आहे ते प्राप्त होतं, हा साधा नियम त्याच्या डोक्यात फिट्ट होतो. नंतर मात्र त्याचे आई वडील या हट्टाने बांधले जातात आणि हा नियम त्यांची अप...

अध्यात्म विराम १९८

अध्यात्म विराम १९८ आपण अनेक प्रकारच्या गोष्टींचे, इच्छेचे, घटनांचे, व्यक्तींचे स्मरण नित्यनेमाने करत असतो. यातील काही स्मरण हे चिंतन स्वरूपातील असतं. ते आपण दीर्घकाळ मनात बाळगतो, त्यावर सखोल विचार करतो आणि बहुतेक वेळा त्यावर कार्य करतो.काही आपल्या विचारात येतं आणि फार वेळ तग न धरता, निघूनही जातं. पण काही काही इच्छा घटना वा स्वप्नं या स्मरण प्रकारात येतं हे रुजत ते तण स्वरूपात व मनात त्याची वाढ होते. असं स्मरण हे बहुतेक वेळा,नकारात्मक ऊर्जा, शक्ती असलेलं तण असतं. हे सहसा संशय, शंका कुशंका, वाद विवाद, वांझोटे परामर्ष, अश्या प्रकारच्या विचारांना जन्म देत. हेच तण अनियंत्रित आणि अविचारी वाढ असलेलं स्मरण, अनेक टाकाऊ, निरुपयोगी, वर्ज्य, निरुत्साही आठवणी, प्रसंग, मान अपमान यांची गणना, दान धर्माच्या उपकार स्वरूपातील आठवणी, यश व अपयश यांच्या घटनांच्या नोंदी आणि अनेक उपद्रवी नोंदी यांच्या स्मरणांना मनात साठवून ठेवून, ते अयोग्य व चुकीच्या वेळी आपल्याला स्मरणात आणून देण्याचं कार्य, हे तण करतं. यातील अनेक आठवणी, खरतर माळ्यावर साठवलेल्या टाकून देण्याच्या लायकीच्या वस्तुंसारख्या असतात.  त्यांची आ...

अध्यात्म विराम १९७

अध्यात्म विराम १९७ ईश्वराची आज्ञावली आत्म्याला देऊन, त्याला या जगतात धाडताना, ईश्वर हे नक्कीच जाणत असतो की, ही आज्ञावली, अशुद्ध आणि विकाराने ग्रस्त होऊ शकते. म्हणूनच त्याने अनेक प्रकारची साधनं निर्माण करून, ही अशुद्धता कमी करून, शुद्धता वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक देहाने करावा,अशी योजना निर्माण करून दिली. त्या साठी श्रवण कीर्तन आदी भक्तीची अंग, उप अंग निर्माण केली.  पण प्रत्येक युगात जसजशी, माया, असुरादिक शक्तींची स्वरूपं, त्यांची अस्त्र शस्त्र, काळाचे बदलते रूप, त्यामुळे उद्भवणारी भौतिक व पारमार्थिक संकटं, आपदा, विपदा, कर्मावर येऊ शकणारी बंधनं हे सर्व जाणून, ईश्वराने कर्म कांड रहित शुद्धता वाढवणारा आणि कर्माची शून्यता हळू हळू वाढवत नेणारा सर्वोत्तम उपाय आखून दिला. आता हा उपाय कोणता, जो माणसाला मायादिक भौतिक जगताची आज्ञावली, विसरायला लावून,पारमार्थिक मार्गा वरील ईश्वरी आज्ञावली अर्थात programme कडे घेऊन जातो, यावर आता विचार करूया. ईश्वराने आखून दिलेल्या अज्ञात मार्गाकडे जाण्यासाठी, त्या ईश्वराच्या स्मरणाचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग, आहे. त्याचं कोणत्याही स्वरूपातील, रुपातील नाम यांच...

अध्यात्म विराम १९६

अध्यात्म विराम १९६ विधात्याने आत्मारूप तबकडी मधे स्थापित केलेली शुद्ध सत्वयुक्त आत्मज्योत, कालांतराने अशुद्ध होत जाते. त्याला ही अशुद्धी चुकीच्या कर्माने, विचाराने, चिंतनाने, बुद्धीने क्षण क्षण येत जाते. अर्थात चांगल्या कर्माने, धर्माने, शुद्ध पुण्य कर्माने, आचरणाने त्यावरील काजळी थोडीफार दूर होते, तात्पुरती. पण आपली कर्म नित्य सुरूच असतात त्यामुळे, ही काजळी पुन्हा गडद होते. या सर्व काजळीने, ईश्वराची आज्ञावली, धूसर होत जाते आणि त्यावर आपल्या कर्माची, अज्ञानाची, आज्ञावली (programme), आपण लिहितो आणि जन्मोजन्मी तिच आज्ञावली, कर्मफल रुपात, पाठलाग करते.  नुसता पाठलागच करत नाहीत, तर अनेक विघ्न, भोग, दुःख, दैन्य, चिंता, क्रोध, काम या स्वरूपात पुन्हा पुन्हा त्याच कर्मात फिरवत राहतात. आता हे सर्व जसं आणि जितकं सांगायला आणि समजावायला सोप्पं आहे, तितकं ते निस्तरायला आणि सुधारायला सहज आणि सोप्पं नाही. कारण त्या सर्व कर्मरुप आज्ञावलीचा ताबा हा मायारूप ब्रम्हाकडे असतो. त्यामुळे ही आपण लिहिलेली आज्ञावली, माया, आपल्या कडून लिहून तर घेतेच, पण आपल्याकडून लिहिलेल्या या आज्ञावलीवर आपल्याला कार्यरत कर...

अध्यात्म विराम १९५

अध्यात्म विराम १९५ पूर्ण श्रद्धा असा शब्दप्रयोग खरतर चुकीचा आहे असं माझं मत आहे. जर आपल्या मनातील भाव व विश्वास हा पूर्ण नसेल तर,त्याला श्रद्धा म्हणताच येणार नाही. कारण ज्याच्यावर आपल्याला पूर्णतः विसंबून राहता येईल, असा एकमेव परम अंश जगतात आहे आणि तो म्हणजे ईश्वर. हा एकच असा आहे की, जो कधीही आपल्या भक्ताला निरुत्साही करत नाही, कधीही निराश करत नाही किंवा कधीही आपल्या ब्रीदापासून ढळत नाही. याच्यावर ठेवलेला विश्वास कधीही खोटा ठरत नाही. विश्वंभर असलेला हा विश्वात्मक ईश्वर अवघ्या विश्वाची प्राणशक्ती, आपल्या हृदयातून नियंत्रित करतो.  आताच्या परिभाषेत तो या जगताचा महा संगणक आहे. या जगतातील सर्व जडजीव या महासंगणकाला स्थानीय कार्यप्रणालीने (lan किंवा प्रभू लीलेने), जोडलेले छोटे छोटे संगणक आहेत. जे तारारहित तंत्रज्ञानाने, मुख्य असलेल्या महा संगणकाला जोडलेले असतात. म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्यां ज्ञानाचेचं उगम स्थान, हे अनंत काळा पासून अस्तित्वात असलेल्या ज्ञानात आहे. आता हे छोटे छोटे संगणक, जे जे कार्य करतात, त्याची आज्ञावली अर्थात प्रोग्राम नक्की असणारच....

अध्यात्म विराम १९५

अध्यात्म विराम १९५ पूर्ण श्रद्धा असा शब्दप्रयोग खरतर चुकीचा आहे असं माझं मत आहे. जर आपल्या मनातील भाव व विश्वास हा पूर्ण नसेल तर,त्याला श्रद्धा म्हणताच येणार नाही. कारण ज्याच्यावर आपल्याला पूर्णतः विसंबून राहता येईल, असा एकमेव परम अंश जगतात आहे आणि तो म्हणजे ईश्वर. हा एकच असा आहे की, जो कधीही आपल्या भक्ताला निरुत्साही करत नाही, कधीही निराश करत नाही किंवा कधीही आपल्या ब्रीदापासून ढळत नाही. याच्यावर ठेवलेला विश्वास कधीही खोटा ठरत नाही. विश्वंभर असलेला हा विश्वात्मक ईश्वर अवघ्या विश्वाची प्राणशक्ती, आपल्या हृदयातून नियंत्रित करतो.  आताच्या परिभाषेत तो या जगताचा महा संगणक आहे. या जगतातील सर्व जडजीव या महासंगणकाला स्थानीय कार्यप्रणालीने (lan किंवा प्रभू लीलेने), जोडलेले छोटे छोटे संगणक आहेत. जे तारारहित तंत्रज्ञानाने, मुख्य असलेल्या महा संगणकाला जोडलेले असतात. म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्यां ज्ञानाचेचं उगम स्थान, हे अनंत काळा पासून अस्तित्वात असलेल्या ज्ञानात आहे. आता हे छोटे छोटे संगणक, जे जे कार्य करतात, त्याची आज्ञावली अर्थात प्रोग्राम नक्की असणारच....

अध्यात्म विराम १९४

अध्यात्म विराम १९४ पूर्ण श्रद्धावान म्हणजे, या जगतात माझं अस्तित्व शून्यवत असून, जगतपालक हा एकमेव श्रेष्ठ आणि पुरुषोत्तम आहे, ही यांची धारणा स्थिर आणि अतुलनीय असते. याचा परिणाम म्हणून त्यांच मन अत्यंत स्थिर, अचल आणि सतत सकारात्मक असते. यांचा विचार, चिंतन व विवेक कायम जागृत असतो. मनात आंदोलनं होत नाहीत असं नाही, फक्त कमी असतात. पण त्यावर विवेकाने नियंत्रण मिळवण्याची हातोटी त्यांना प्राप्त असते. शांतपणे विचार करण्याची पात्रता त्यांच्या अंगी असते.  अशी पात्रता त्यांना अर्थातच, त्यांच्या कर्म ज्ञान व भक्ती यांपैकी एका किंवा बहु मार्गांनी त्यांना प्राप्त झालेली असते. कारण तशी साधनेची बैठक त्यांच्या पाशी मागील जन्मा पासून आलेली असते. मुळात असे जन हे अनेक जन्माच्या त्यांच्या साधनेचा, त्या पुण्याचा परिणाम म्हणून यांना या जन्मात जन्मतः अशी उत्तम मानसिकता, विवेकाचा पाया आणि शांत चित्तवृत्ती, प्राप्त झालेल्या असतात. याना आपल्या पूर्व संचिताने आणि सद्य कर्माने जे जे प्राप्त होते, त्या सर्वामागे ईश्वरी प्रेरणा आणि अधिष्ठान आहे, याची पूर्ण जाणीव यांच्या मनात जागृत असते.  ईश्वराला कायमस्वरू...

अध्यात्म विराम १९३

अध्यात्म विराम १९३ आता अश्रद्ध जनांची वृत्ती आणि त्याबद्दल जाणूया. अश्रद्ध लोक दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे आपला म्हणजे सनातन धर्माचे ज्याचे ज्ञान जगाला करून दिले आहे त्या ईश्वराला, न मानता, एका वेगळ्याच प्रणेत्याला ते मानतात. त्यातही त्यांची धारणा इतकी आत्यंतिक असते की, त्यांच्या मानलेल्या धारणेतील प्रणेत्याला सोडून बाकी कोणीही अस्तित्वात नाही, हीच त्यांची वृत्ती करून देण्यात आलेली असते. त्यामुळे यांची श्रद्धा ही संकुचित असते. वास्तविक सनातन धर्माने ईश्वर हा एकमेव आहे आणि तो सर्व निर्मित धर्मांच्या पलीकडे आहे, हे सप्रमाण आणि वारंवार सिद्ध केलेले आहे. पण त्याला खोटं ठरवून, आमचाच आणि आम्ही मानत असलेला प्रणेता हाच खरा ईश्वर आहे आणि त्याला सर्वांनी मानावं. त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. इथे एक मुद्दा स्पष्ट करतो की, या जगताचा आणि जगतात आलेल्या प्रत्येक मानवाचा जन्माने धर्म एकच आहे. तो म्हणजे सनातन धर्म. या व्यतिरिक्त मानव निर्मित कोणतेही इतर धर्म हे वरून पांघरलेली शाल आहेत. त्या आतील माणूस आणि त्यांचा मूळ धर्म हा एकच आहे आणि एकच राहणार.  याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण मानल...

अध्यात्म विराम १९२

अध्यात्म विराम १९२ अनन्यता ही अनेक प्रकारची असते म्हणून आधी तिचा विचार करूया की, यातील भगवंतांना कोणती अपेक्षित आहे. फक्त भौतिक जगताचा आणि त्यातही फक्त देहा चाच विचार करणे, ही प्राणिमात्रांची मूळ प्रवृत्ती आहे. कारण त्यांना बुद्धीचा तितकाच व्यास ईश्वराने प्रदान केला आहे. माझं भक्ष, भोजन,मैथुन या इतक्या चौकडीत आयुष्य जगण्याची एक प्रकारची शिक्षा, त्या देहातील आत्म तत्वाला मिळालेली आहे. एक प्रकारे, भोगांचा उपभोग घेण्यासाठीच हा चौऱ्यांशी लक्ष योनीचा आत्म प्रवास ईश्वराने योजला आहे.  पण माणसाला यापेक्षा जास्त, बरच काही दिलेलं आहे. ज्याचा मुक्त उपयोग करण्याचं स्वातंत्र्य देखील, त्याच विधात्याने प्रदान केलेलं आहे. म्हणजे तू तुला दिलेल्या मन, बुद्धी, देहाची सुसूत्रता, सुविधा यांचा सद् उपयोग कर किंवा दुरुपयोग कर, त्याचं भोग व उपभोग रूप फल तुलाच भोगायच आहे. पण या चक्रात अडकताना माणूस अनेक प्रकारच्या अनन्यतेच्या बेड्या, आपल्या पायात, हातात व विशेषतः मनात घालून घेतो. त्याच अनुषंगाने आयुष्य जगतो आणि त्याची कृतार्थता व धन्यता मनात जपून, अंती समाधान पूर्वक पुढील प्रवासाला जातो.  जगताना बाळगले...

अध्यात्म विराम १९१

अध्यात्म विराम १९१ ईश्वराला, कलियुगात घडत जाणाऱ्या घटना, दिसल्या असणार. त्या अनुषंगाने ईश्वर भक्तीत होत जाणारी घट आणि भक्तीपेक्षा, देवाची, ईश्वराची हेटाळणी करण्याने संतुष्ट होणारी वाढती प्रजा, या गोष्टी नक्कीच त्रिकाल ज्ञान यामुळे, माहीत असणार,नव्हे दिसलं सुद्धा असणार. त्यामुळे ते घडतं असताना सुद्धा, भक्तांच्या मनोधैर्याची पातळी कमी न होता, निदान आहे ती राखली जाईल, त्यासाठी भक्तांनी काय केलं पाहिजे, याची रूपरेषा, ईश्वराने गीतेतील त्या श्लोकात स्पष्टपणे सांगितली आहे. लक्षात घ्या, ईश्वर जो निर्गुण, निराकार परब्रम्ह आहे, त्याला आपल्या स्तुतीने आणि टीकेने काही फरक पडत नाही किंवा पडणार नाही. पण भुलोकी आलेला प्रत्येक जीव आपली अध्यात्मिक व पारमार्थिक उन्नती करवून घेण्यास पात्र आहे, या एका सद् इच्छेने ईश्वराने, खास कलियुगासाठी भक्ती आणि साधना यांच्या सुलभते साठी, अत्यंत सोपा राजमार्ग, सामान्य जनांसाठी आखून दिलेला आहे. राजमार्ग म्हटल की त्यावर कोणीही चालू शकतो व ईश्वराने सांगितलेल्या धोरणानुसार पावलं टाकली की, ईश्वराकडे आत्मरुप पोचण्याचा शुद्धिमार्ग नक्कीच आपल्याला हाती लागेल. शुद्धीमार्ग यासा...

अध्यात्म विराम १९०

अध्यात्म विराम १९०   ज्ञान, वैराग्य आणि कर्म या मार्गांनी विवेक जागृती कशी होते, हे आपण मागील काही भागात पाहिलं. आता भक्तीचा मार्ग अनुसरून, मनुष्य, विवेकाची प्राप्ती कशी करू शकतो, याचा विस्ताराने विचार करूया. मुळात भक्त हा इश्वरापसून विभक्त नसेल तरच, त्याला भक्त हे संबोधन दिलं गेलेलं आहे. म्हणजे जो इश्वराशी अविभक्त राहून आपलं सांसारिक, पारमार्थिक जीवन व्यतीत करतो, तो भक्त.आता यातील ईश्वराशी अविभक्त म्हणजे काय अपेक्षित आहे, याचा विचार करूया.खऱ्या भक्ताची व्याख्या ईश्वराने स्वतः, गीतेतील ९ व्या अध्यायात २२व्या श्लोकात केलेली आहे. तो श्लोक खाली उधृत् करतो.  अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।। या श्लोकाचा विस्तृत अर्थ आपण लेख क्र ७० ते ८० या दरम्यान विस्ताराने पाहिलेला आहेच. त्यामुळे त्या विस्तारात पुन्हा न जाता, आपल्या विषया संदर्भात अर्थ बोध घेऊन,चिंतन पुढे नेऊया.या श्लोकात भगवंतांनी, त्यांना प्रिय असलेल्या भक्त या व्यक्तीत्वाची व्याख्या स्पष्ट शब्दात सांगितली आहे. जो जो कोणी अनन्यतेने माझं नित्य आणि अभियुक्त होऊन, चिंतन...

अध्यात्म विराम १८९

अध्यात्म विराम १८९   जगतात एकमेव सत्य म्हणजे कर्म. श्रीमद् भगवत गीते मध्ये भगवंतांनी म्हंटल्याप्रमाणे, कोणताही प्राणी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजेच काहीही न करणं हे देखील एक कर्मच आहे, हे नक्कीच.पण कर्म करणारा, आपल्या प्रत्येक कर्मात, नवनवीन फलांची बीजं पेरत पुढे जात असतो. त्याचवेळी तो मागील कर्मांची फल भोगत भोगत पुढे जातो. हा वास्तविक एक सलग, सरळ आणि नित्य नैसर्गिकरीत्या चालू असलेला चक्राकार मार्ग आहे. म्हणजे आज केलेलं कर्म कधी फल देईल, हे ईश्वर जाणे. पण मागील कर्माचा हिशोब मी आज चुकता करतो.  पण गफलत कुठे होते तर, आज मी सत्कर्म करताना, मागील गैर कर्माच फल समोर येतं आणि आपण गोंधळून जातो. म्हणजे आज मी पैसे साठवून ठेवी बँकेत जमा केल्या आणि मागील कर्ज समोर येऊन, त्यासाठी या ठेवी मोडाव्या लागल्या.अर्थात हा सहज प्रकार अनेकांना माया, अज्ञान आणि भ्रम यामुळे, सहसा अनेक जन्मात लक्षात येत नाही. पण आपल्याच उत्तम कर्माच्या परिणामाने, ही संगती अनेक जन्म अशीच वागवत आपण फल आणि पुन्हा पुन्हा चुकीचं कर्म, याचं चक्रात राहतो.  चुकीची कर्म म्हणजे, आज मी उत्तम कर्म करताना मागील भोग ...

अध्यात्म विराम १८८

अध्यात्म विराम १८८ ज्ञान माणसाला सत्य आणि मिथ्या, योग्य व अयोग्य, अती आणि संयत, अनावर आणि नियंत्रण यातील फरक मुख्यतः जाणवून देतं. ज्ञानाने कृती किंवा कर्म योग्य पद्धतीने घडेल, ही शक्यता पूर्ण ठामपणे जरी सांगता आली नाही तरी, ज्ञानाने मनाचे चक्षु नक्कीच उघडतात आणि त्याने कार्य करण्याची, जग वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. अर्थात दृष्टी आली म्हणजे कार्य घडेल किंवा योग्य कृती होईल, याची शक्यता असेलच हे विश्वेश्वर सुद्धा सांगू शकणार नाही.  पण जाणिवेची केंद्र जागृत होतात. बरेच वेळा एखादी नवीन माहिती, आपल्याला मिळाल्यावर, आपण म्हणतो अरे हे तर माहीतच नव्हतं. अर्थात माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे इथे मुद्दाम स्पष्ट करू इच्छितो. तर माहिती म्हणजे फक्त ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. खरं ज्ञान हे ते जे मनाला, मनातील जाणीवेच्या केंद्रांना आणि त्याद्वारे मनःचक्षुंना योग्य आणि अयोग्य हा सारासार विचार करण्याची किल्ली मनाला प्राप्त करून देतं. असा सारासार विचार करायची दृष्टी मनाला प्राप्त झाली की, हळूहळू, त्या मार्गावर नियमित चालताना, विवेक जागृत होतो. विवेक हा सारासार विचार आणि योग्य दृष्टी य...

अध्यात्म विराम १८७

अध्यात्म विराम १८७ कालच्या विषयाला पुढे नेऊया. विवेक म्हणजे योग्य अयोग्य याची जाण आणि सारासार विचार. पण हा विवेक अनेक प्रकारचा असतो. व्यावहारिक विवेक हा व्यवहार ज्ञान,अनुभव इत्यादीं मुळे जागुत होतो व अभ्यासात, कार्यात असलेल्या व्यक्तींचा व्यावहारिक विवेक तोपर्यंत जागृत राहतो. म्हणजेच हा ज्ञान आणि अनुभव म्हणजे कर्म या दोन मार्गांनी जागृत करता येतो. व्यावहारिक अनुभव व्यक्तीला व्यावहारिक विवेक जागृत करून देतो. त्याच्या उपयोगाने मनुष्य उत्तम व्यवहारी होतो आणि असतो. खूप वेळा आपण काही व्यक्तींना खूप लहान वयात उत्तम व्यवहारी व्यक्ती म्हणून ओळखतो किंवा जाणतो.  पण या विवेकाचा फक्त व्यवहाराशी अर्थात जगताशी संबंध असतो. तो उत्तम धन, ऐश्वर्य व व्यावहारिक कीर्ती प्राप्त करून देऊ शकतो. अश्या व्यक्तीकडून अविवेकी वागणूक व्यवहारात सहसा होत नाही. पण हा एक विवेक झाला. या शिवाय नाते संबंध आणि व्यक्ती व्यक्ती मधील संबंध या बाबतचा विवेक सुद्धा असतो. अश्या व्यक्ती व्यवहार उत्तम करू शकतील की नाही ते सांगता येणार नाही. पण संबंध स्थापित करणं, त्याची जोपासना करणं आणि त्यांना कायमस्वरूपी सांभाळणं हे काम अश्या...

अध्यात्म विराम १८५

अध्यात्म विराम १८५ म्हणजेच माया प्रत्येक घडलेल्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्या साठी, योग्य ते कर्म घडवून ईश्वराच्या कर्मफल न्यायाला कार्यरत ठेवून, एकप्रकारे ईश्वराचं निर्मितीचं, पालनकर्त्याचं आणि लयकर्त्याचं कार्य अविरत सुरू ठेवते. म्हणजे यातून थोडासा गोंधळ किंवा गुंता मनात व विचारात होऊ शकतो. तो असा की,जर माया आपल्याला कर्म प्रवृत्त करून कर्म घडवून घेत असेल तर, आपण काय करतो आणि आपणच ते का भोगतो. इथे एक एक मुद्दा विचारात घेऊन पुढे जाऊ, म्हणजे हा विचारांचा तिढा सैल होईल आणि विषय ध्यानात येईल.  माया ही अनेक अंगांनी अनेक गोष्टी घडवत जाते. त्या एकेक पाहूया. मुळात माया जीवाला कर्मबद्ध करते, कर्मात गुंतवून ठेवते. त्यासाठी परिस्थिती, मती व मनः स्थिती यांचा उपयोग भ्रम निर्माण होण्यासाठी करते. किंबहुना आपण बघितल असेल की ज्यावेळी पडता काळ येतो,त्यावेळी विपत्ती आणि आपत्ती अनेक मार्गांनी येतात. मती कुंठीत करून, चुकीचे निर्णय व कर्म घडवून घेऊन, पुन्हा त्याची फलरुप निष्पत्ती भोगायला भाग पाडते. आता यांमधे मायेचा उपद्व्याप किती आणि आपली कर्मगती किती, हे अवघड गणित सोडवणं महाकर्मकठीण काम आहे.  आ...

अध्यात्म विराम १८६

अध्यात्म विराम १८६ माया काय करते हे आपण पाहिलं. आता आपण या सर्वात काय करतो याचा विचार करूया. मुळात माया फक्त कार्यकारण भाव आणि कर्ता यांना जवळ आणते. मनात भाव निर्माण झाला की माणसाला एखादी वस्तू, वास्तू, व्यक्ती किंवा गोष्ट हवी अशी इच्छा जागृत होते. त्यानंतर मन बुद्धीला, बुद्धी देहाला आणि देह इंद्रिय व अवयव यांना कार्याला जुंपतात. जुंपणं यासाठी म्हटलं की, एकदा एखादी वासना निर्माण झाली की ती इच्छेच्या केंद्रांना उद्दिपित करते. मग माणूस कर्मरत होतो. कर्म करतो किंवा करून चुकतो आणि मग फलाची बीजं पेरली जातात. आता यातील मायेचा खेळ इतकाच की ती फक्त वासना, इच्छा, ओढ, आकस, मत्सर, द्वेष, क्रोध, काम इत्यादी मनातील सुप्त भाव भावना जागृत करण्याचं काम करते. यात फक्त हा शब्द यासाठी वापरला की, इतर प्राणी आणि मनुष्य यामधे जो मूलभूत भेद, ईश्वराने निर्माण करून ठेवला आहे, तो म्हणजे माणसाला बुद्धी, मन आणि मनात इतर भावांप्रमाणे सुप्त असलेला विवेक, ही अतुलनीय ईश्वरी देणगी दिलेली आहे. म्हणजेच मायेचा खेळ हा तुमच्या मनात जागृत भावातील, योग्य कोणते आणि अयोग्य कोणते, हे मनातील विवेक ठरवू शकतो. हा विवेक मनाला स्तब्...