Skip to main content

अध्यात्म विराम ५४

अध्यात्म विराम ५४
  
अर्चन करताना अर्थात प्रार्थना, पूजा, करताना एक साहजिक नैसर्गिक कृती,जी सर्व माणसाकडून आपसूक पणे होते,ती म्हणजे हात जोडणे किंवा वंदन करणे. अर्चन भक्ती पश्चात सहावा भक्ती मार्ग जो ईश्वराने, शास्त्राच्या माध्यमातून,जगताला ज्ञात करवून दिलेला आहे तो म्हणजे, वंदन भक्ती. वंदन करणे म्हणजे एखाद्या समोर नतमस्तक होणे. 

अर्थात देहाने मान, (यात देहापेक्षा मन खाली झुकवणे जास्त इष्ट आणि अपेक्षित आहे), खाली झुकवून अर्थात आपल्या चरणांकडे नजर करून,दोन्ही कर जोडून, ज्यावेळी आपण लीन भावात, एखाद्या दैवता समोर, सद्गुरू समोर नुसते उभे राहिलो अथवा जमिनीवर नुसते लीन भावात बसून, त्या ईश्वर वा सद्गुरू यांना आपले सर्व भाव एकात्म करून, शून्य अवस्थेत समर्पित झालो की, वंदन भक्ती साध्य झाली. 

म्हणजे एका अर्थाने अर्चन भक्ती किंवा प्रार्थना, अर्थात अर्चना आणि वंदना या दोन्ही भक्ती, सखी आहेत म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण एखाद्याची अर्चना करणं आणि त्याला वंदन करणं, दोन्ही वास्तविक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हटलं तरी हरकत नाही. 

अर्चना भक्तीत उपासक, आपल्या ईश्वराला, (ईश्वर आणि सद्गुरू हे दोन्ही एकच आहेत, म्हणून इथून पुढे प्रत्येक वेळी दोन्ही शब्द वापरण्याऐवजी एकच शब्द वापरले तरीही, दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत, हे गृहीत धरावे), करुणामय, भक्तिमय, आनंदमय, ज्ञानमय, आत्ममय भावात आळवून, त्याला कृपादृष्टीची, कृपा प्रसादाची अपेक्षा करून, प्रार्थना करतो. अर्चना भक्तीत, इष्ट देवतेची, स्तुती, प्रशंसा करताना, मनात तसे भाव दृढ करण्याचा प्रयत्न करतो. 

तसे भाव मनात दृढ धरून, त्या इष्टाची, इष्ट अर्थात योग्य स्तुती, करून, आत्मकल्याणासाठी त्याला विनवतो. यात मनातून अर्चना, प्रार्थना केली जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तेच अपेक्षित सुद्धा आहे. अन्यथा मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव, तश्यातील गत व्हायची. म्हणजे अर्चना भक्तीत, आरती, प्रार्थना, प्रशंसा, स्तुती करताना, त्या अर्थाचे भाव मनात उत्पन्न होणं,जागृत होणं आणि होत जाऊन ते दृढ होणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. 

अन्यथा तो निव्वळ एक उपचार होईल आणि त्याचा ना देहाला काही लाभ व्हायचा ना मन व आत्मा यांना काही बोध व्हायचा. अर्चन भक्ती आणि वंदन भक्तीवर आपण अजूनही चिंतन सुरूच ठेवूया, पण ते उद्याच्या भागात. आज इथे थांबताना आपण श्रवण ते अर्चन इथपर्यंतचा भक्तिमार्ग आचरण्याचा यत्न करूया.  

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...