श्रीरुक्मिणी स्वयंवर ९५ (कथासमाप्ती) llश्रीगणेशाय नमःll llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll llश्रीएकनाथ महाराज कि जय ll संपूर्ण द्वारकेला आपल्या नवपरिणीत वधूला प्रदक्षिणा करवून आणि जनसामान्यांना संतोष देववून, श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणी प्रसादात परतले. यथावकाश देवी रुक्मिणी द्वारकेच्या प्रसादाशी आणि द्वारकेसह द्वारकावासियासी समरस झाल्या. मूळ राजरूधीर असल्यामुळे द्वारकेतील रीतिरिवाज, चालीरीती, कुलधर्म, कुलाचार शिकून घेण्यास आणि ते आत्मसात करण्यास देवी रुक्मिणी यांना फार त्रास झाला नाही. पण मुख्य बाब अर्थातच कृष्णाचा स्वभाव. त्याचा वेध घेण्यात मात्र देवी रुक्मिणींना खूप त्रास झाला, तोदेखील आयुष्यभर. अर्थात त्यातही प्रेमाचा ओलावा असल्यामुळे देवींना कृष्णाच्या नटखट स्वभाव देखील भावला. त्या आपल्या संसारी रममाण झाल्या. श्रीव्यासमुनींनी जे कथन केले श्रीमहाभारतात त्यातील श्रीरुक्मिणीहरण अर्थात श्रीरुक्मिणीस्वयंवर हा रोचक कथाभाग श्रीरुक्मिणीला कृष्णाची , कथा कीर्तनकार बुवांक...