Skip to main content

Posts

Showing posts with the label श्रीकृष्णनीती

श्रीकृष्णनीती भाग ३८

श्रीकृष्णनीती भाग ३८ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! श्रीकृष्णाच्या काळापासून,अर्वाचीन भारतातील सांस्कृतिक, वैचारिक, आर्थिक, सामाजिक अशी सर्वच स्तरावर सुबत्ता अनुभवून उपभोगणारा जगातला एकमेव देश म्हणजे भारतवर्ष. इतर देश वा संस्कृती या चाचपडत देखील नव्हत्या, त्यावेळी येथे सर्व बाबतीत संपन्नता नांदत होती. खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात सोन्याचा धूर निघत होता. कदाचित याचं आकर्षण वाटून, यांच्या लोभापायी हे वैभव लूटण्याकरता येथे अश्या मुलखातून टोळ्या आल्या, ज्यांनी या वैभवाचा एक शतांश देखील, कधी अनुभवाला नव्हता.  प्रथम येऊन गेलेले या बद्दल या देशाबाहेर जितकं जास्त सांगत गेले असतील, त्या वर्णनानुसार येथील अमाप संपत्तीचा, वैभवाचा उपभोग घेऊन, यातील जास्तीत जास्त लुटून नेण्याकरिता, अजून अजून टोळ्या येत गेल्या. सुरवातीला कदाचित इथली संपन्नता इतकी होती कि, लुटून नेलेलं ऐश्वर्य हे गुंजभर भासत असल्यामुळे, येथील राजे आणि प्रजा दुर्लक्ष करत गेले. त्याचा परिणाम म्हणून अजून लूट नेण्यासाठी, टोळ्या येत गेल्या.  अगणित संपत्ती असल्यामुळे असलेली बेफिकिरी, हि घातक ...

श्रीकृष्णनीती भाग ३९

श्रीकृष्णनीती भाग ३९ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! स्वातंत्र्याच्या सुमारास आणि त्या नंतर सत्तेला वा सत्ता धीशांना लागलेलं बेजबाबदारीचं ग्रहण हे त्याच सुमारास लागलं कि आधीपासूनच होतं, यासाठी स्वातंत्र्याच्या थोडं मागे जाऊ.मुळात काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्य मिळवण्या साठी झालीच नव्हती. ब्रिटीश सत्ताधाऱ्यांकडून, येथील सुशिक्षित जनतेसाठी जास्तीत जास्त सवलत मिळवता यावी, या हेतूने खरतर इंडियन नॅशनल काँग्रेस या संस्थेची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ रोजी ब्रिटिश निवृत्ती सनदी अधिकारी अॅलन ह्यूम नी केली.१८८५ ते १९०५ पर्यंत याच उद्देशाने चालणाऱ्या पक्षाच्या रक्तात लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा मंत्र प्रथम ओतला, हे निर्विवाद सत्य आहे. त्यानंतर त्याची री बाकीच्या सर्व नेत्यांनी ओढली आणि नंतर सत्तेची तूपरोटी चाखली. असो जवळजवळ १९२० पर्यंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपत राय, जिन्ना यासारखे जहाल नेते काँग्रेसच्या नेतृत्वात होते. यातील जिन्नानी १९१३ मध्ये लोकमान्य तुरुंगात असण्याच्या काळात, मुस्लिम लीग पक्षात प्रवेश केला आणि काँग्रेस सोडल...

श्रीकृष्णनीती भाग ३७

श्रीकृष्णनीती भाग ३७ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धर्म या संकल्पनेबद्दल विस्ताराने जाणून घेतल्यानंतर अधर्म काय हे कळायला खरतर अवघड नाही. जे धर्माविरुद्ध आहे, तो अधर्म. धर्म म्हणजे फक्त ईश्वरो पासना वा अध्यात्म आणि ततसंबंधी ज्ञानार्चन नव्हे, तर प्रत्येकाचं आपलं जीवन जगताना व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि मातृभूमीप्रती असलेली कर्तव्य म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म. यातील कशातही केलेली चूक वा कर्तव्यमूढता हा अधर्म नसला तरी धर्म पालनात केलेली चूकच. परंतु यातील कोणत्याही गोष्टींबाबत केलेला अक्षम्य गुन्हा वा प्रतारणा वा प्रमाद म्हणजे अधर्म. अधर्म हा आपण स्वतः केला किंवा अधर्म करत असलेल्या व्यक्तीला जाणूनबुजून वा अजाणतेपणी केलेले सहाय्य. मुळात अधर्म हा पूर्वापार असुरांचा धर्म होता. त्यांच्या साठी धर्म पालन न करणं म्हणजेच धर्म. हे त्यांच्या बुद्धीनुसार वा विवेकाच्या अभावाने, अहंकाराच्या प्रभावाने, तामसीपणा मुळे, काम क्रोध यांच्याकडे मनाच्या असलेल्या नैसर्गिक ओढीतून व वाईट तेच चांगलं या बुद्धीच्या धारणेतून मना तील विकारांचा झालेला उत्पात म्हणजे अधर्म. आता म...

श्रीकृष्णनीती भाग ३६

श्रीकृष्णनीती भाग ३६ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) (आजचा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. योग्य टिपण्णी अपेक्षित आहे)  श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धर्म हि संकल्पना मुळातच जगण्याच्या संकल्पनेशी निगडित आहे. त्यावर त्या त्या धर्माची संस्कृती ठरते. रूढार्थाने खरतर सनातन धर्म हा मूळ आणि धर्म या व्याख्येत बसणारा, सर्वात जुना धर्म आहे. कारण बाकी बहुतेक सर्व धर्मांच्या स्थापनेबद्दल निश्चित तिथी माहीत आहे वा ज्ञात आहे. परंतु सनातन धर्म, ज्याला हिंदू धर्म म्हणूनही म्हटलं जातं, त्याच्या स्थापनेबद्दल वा मूळ तिथीबद्दल काहीही सांगता येणार नाही, इतका तो जुना आहे.  अर्थातच मूळ आणि सनातन असल्यामुळे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचा धर्म, हा सनातन धर्मच असतो. कारण तो जन्मतः धारण केला जातो. अर्थात पंचमहाभूत देहात आत्मा प्रवेशल्यानंतर सर्वप्रथम पुरुषार्थ जो आत्म्यातून देहात प्रवेशतो तो धर्म. सनातन धर्मात चार पुरुषार्थ स्वीकारले आहेत. ज्यामध्ये धर्म प्रमुख आहे. बाकी तीन पुरुषार्थ आहेत - अर्थ, काम और मोक्ष। गौतम ऋषि म्हणतात - 'यतो अभ्युदयनिश्रेयस सिद्धिः स धर्म।' (जे कर्म केल्याने अभ्युदय और निश्रे...

श्रीकृष्णनीती भाग ३४

श्रीकृष्णनीती भाग ३४ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! या भरतखंडाने जगाला संकृती, ज्ञान, विज्ञान, ऋषीमुनी, विद्वान, धर्मपरायण सत्पुरुष, महायोगी, संत महंत, द्वैत अद्वैत भेदाभेद, सगुण निर्गुण ज्ञान, अष्टांग योगायोग, नवविधा भक्ती, मोक्षमुक्तीचा बीजमंत्र , वसुधैवकुटुंबकम हा जगतोधारक मार्ग शिकवला. नुसता शिकवला नाही तर त्यावर लाखो वर्ष अनेक युगं चालून दाखवलं. येथील सत्पुरुषांनी राजे महाराजे यांनी अमाप संपत्ती , वैभव, ऐश्वर्य, सुबत्ता, समृद्धी स्वबळावर प्राप्त केली, येथील व्यापाऱ्यांनीसुद्धा हाच वारसा जपत संपन्नता प्राप्त केली.  राजेरजवाडे, महाराजे, धनिक, ऐश्वर्यसंपन्न लोकोत्तर पुरुषांनी येथेच दानधर्म, श्रीमंत असलेल्यानी त्या संपत्तीचा एक तृतीयांश हिस्सा देवब्राम्हणांना, एक तृतीयांश हिस्सा दानधर्मासाठी खर्च करून उरलेल्या एक तृतीयांश हिश्श्याचा स्वतःसाठी विनियोग करावा, हा अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालवणारा मूलमंत्र, नुसता दिलाच नाही तर, तो मंत्र अनेक युगं, सूत्रबद्ध पद्धतीने कार्यांवित करून, भरतखंडातील समस्त जनतेला या ऐश्वर्याचा लाभ कसा मिळेल हे पाहिले. खऱ्य...

श्रीकृष्णनीती भाग ३३

श्रीकृष्णनीती भाग ३३ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! संस्कृती, ऐश्वर्य, सुबत्ता यांच्या मुबलकतेमुळे असेल कदाचित, पण त्याचं महत्व वाटत नाही. किंवा रामायण काळापासून येथे असलेली अमर्याद संपत्ती, समृद्धी यांच्यामुळे एक प्रकारची सूज बुद्धीला आली असू शकते. ज्याला आपण एखादी गोष्ट गृहीत धरणं म्हणतो, त्याच न्यायाने समस्त भारतवर्ष, जे अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश पर्यंत पसरलेलं होतं, परंतु वेगवेगळ्या राज्यात विभाग लेलं होतं, त्यात मुख्य राजे वा सम्राट असलेल्या काही घराण्यांनी संस्कृती, धर्म यांचं संरक्षण करण्याची जबाब दारी नक्कीच धीराने आणि निष्ठेने पार पाडली. प्रसंगी प्राण अर्पण करून, पुढील पिढ्यांना प्रेरणासुद्धा दिली.  पण आज जो मुद्दा मी मांडणार आहे, तो या निष्ठेला पायदळी तुडवून, परकीय शक्तींना मदत करून, वेळप्रसंगी त्यांना येथे, इथल्याच निष्ठावान राजाला पराभूत करण्यासाठी, पाचारण करणारे अस्तनीतले निखारे या भूमीने पोसले. त्यांना कोणतीही शिक्षा न करून, पुढील जयचंदांच्या वारसांना धडा घालून दिला नाही. त्यांना साथ देणाऱ्यांचा बंदोबस्त केला नाही. ज्यामुळे ही विष...

श्रीकृष्णनीती भाग ३२

श्रीकृष्णनीती भाग ३२ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! कालच्याच मुद्द्यावर पुढे विचार करताना, एक महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भारतीय संस्कृती आणि तिची महती जेंव्हा गायली जाते, तेंव्हा प्रत्येक वेळी त्याचा अर्थ तसाच घ्यायला हवा असं नाही. म्हणजेच ज्यावेळी एखादा आक्रमक सेनानी विशेषतः परकीय मुलखातील एखादा आक्रमक इथे येऊन हरल्यानंतर, जेंव्हा एखाद्या राजाचं गुणगान करतो आणि त्याला भारतीय संस्कृती, दया क्षमा आणि शांती यांचं स्मरण करून देतो, तेंव्हा तो एक हरलेला सेनानी आहे, हे त्या जेत्या राजाने लक्षात ठेवलंच पाहिजे. अन्यथा जी चूक पृथ्वीराज चौहान, रामदेवराय यादव वा तत्कालीन अनेक हिंदू राजांनी केली, तशी ते जर न करते तर भारतखंडाचा इतिहास वेगळा लिहिला असता.  मुळात तुम्ही राज्यावर आहात, तेंव्हा संपूर्ण प्रजेचं उत्तरदायित्व तुमच्या हातात आहे. म्हणजेच तुमची एखादी चूक संपूर्ण राज्याला आणि पर्यायाने राज्यातील प्रत्येक नागरिकाला दुःख, दैन्य, अशांती, अंधकारमय भविष्य देऊ शकतं . इथे खूप मोठा घोळ जो त्या त्या राजानी, जिंकल्यानंतरसुद्धा शत्रूला क्षमा करताना, घ...

श्रीकृष्णनीती भाग ३१

श्रीकृष्णनीती भाग ३१ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! श्रीकृष्णांनी संपूर्ण आयुष्यात अजून एका गोष्टीची स्थापना केली ती म्हणजे धर्म या शब्दाचा सुयोग्य अर्थ प्रस्थापित केला. मुळात धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य हा आहे. एखाद्या व्यक्तीचं एखादी गोष्ट करण्यातील कर्तव्य, हा त्या व्यक्तीचा धर्म झाला. याचा उचित अर्थ त्या त्या परिस्थितीनुसार कसा लावायचा आणि यात राजाचं वा एका क्षत्रियाचं काय कर्तव्य आहे वा धर्म आहे, हे गीतेतील तत्त्वज्ञानाने नीट उलगडून सांगितले. राजाने पाळावायचा धर्म, हा राजधर्म अर्थात राजाची कर्तव्य राजाने पाळली पाहिजेत, हे स्वतः सुयोग्य पद्धतीने राज्य करून, प्रजेला सर्व सुख सोयी सुविधा देऊन, आपले कर्तव्य पूर्ण करून सिद्ध केलं.  आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य अनेक रूपाने जसं द्रौपदीचं शीलरक्षण करून,नरकासुर वधानंतर त्याच्या कैदेत असलेल्या १६१०० राजकन्यांना स्वीकारून आपलं नाव दिलं. पण आपलं नाव दिलं याचा मतितार्थ त्या काळच्या रुढीनुसार एखाद्या खल पुरुषाच्या कैदेतून सुटून आलेल्या स्त्रीला, समाज स्वीकारत नसे. स्वतः जेंव्हा भगवंतांनी त्यांचा स्...

श्रीकृष्णनीती भाग ३०

श्रीकृष्णनीती भाग ३० (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! गीतेच्या तत्वज्ञानात एक तत्व सांगताना श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक श्लोक सांगितला अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैव च ll या संवादाचा विस्तृत अर्थ आपण पाहू. जेणेकरून भगवंतांना काय म्हणायचं आहे, ते आपल्या आकलनात येईल. खरतर ज्यावेळी भगवंतानी वैदिक तत्वज्ञान, पुराण, यांची निर्मिती केली, त्यावेळी अपेक्षित हेतू हा होता की, सर्व प्राणीमात्र सद्हेतुने वर्तन करून, एकमेकांच्या नैसर्गिक कर्तव्याआड न येता, सर्वांचं अस्तित्व मान्य करून, त्यानुसार आपलं आचरण ठरवतील आणि वर्तन करतील. हाच हेतू मनात धरून हे तत्वज्ञान धर्माच्या माध्यमातून मांडून, जनसामान्यांना सुखी आणि शांत जीवन व्यतीत करता येऊन, त्याद्वारे परम ईश्वराच्या कृपेने मोक्षाप्रत पोचून आत्मसंयोग यात्रा पूर्ण व्हावी.  या धारणेतून व या प्रेरणेने मानवी उन्नत्तीसाठी हा सर्व प्रपंच भगवंतानी आरंभला. पंचमहाभूत देहात, मनात असलेल्या सहा शत्रूच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे नऊ मार्ग सिद्ध करून भगवंतानी मानवाच्या हाती सुपूर्द केले. तरीही मानवाला या सर्वाचा पडत असलेला ...

श्रीकृष्णनीती भाग २९

श्रीकृष्णनीती भाग २९ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! कालचाच विषय पुढे नेताना निष्ठा आणि निष्ठेबाबत अजून काही उदाहरणं घेऊन पुढे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी श्रीकृष्ण चरित्रावरून घेतलेला बोध, आत्मसात केला आणि माणसांना धर्माच्या, स्वराज्याच्या पायाशी निष्ठा आणि प्राण कसे वाहायचे, याचा सत्शील मार्ग दाखवला. नव्हे महाराजांनी, या माणसांच्या रुपात निष्ठेच्या नवनवीन व्याख्या त्यांच्याच कर्तृत्वाने लिहून घेतल्या. मला वाटतं श्रीकृष्णाला इतकं परिपूर्ण कोणीही आत्मसात केलं नाही.  चुकीच्या पायावर निष्ठा वाहिलेल्या कित्येक माणसांना स्वराज्याचा मंत्र देऊन धर्माच्या रक्षणार्थ प्रवृत्त केलं. प्रसंगी यातील अनेकांनी लढता लढता, जीवाची बाजी लावून धर्माच्या स्थापनेसाठी, देहाचं मोल मोजलं. हीच निष्ठेची अपेक्षा वा संकल्पना श्रीकृष्णांनी गीतेतून आणि महाभारतातील स्वचारित्रातून जनसामान्यांना शिकवण स्वरूपात दिली की, निष्ठा ही धर्माप्रति असावी. तीच खरी धर्मनिष्ठा.  श्रीकृष्णाच्या माध्यमातून अजून एक गोष्ट जी प्रखरपणे जाणवते ती म्हणजे दांभिक अहिंसा व सत्य यांचा कोणी...

श्रीकृष्णनीती भाग २८

श्रीकृष्णनीती भाग २८ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आज श्रीकृष्णाच्या चरित्राचा विशेषत्वाने महाभारत युद्धा संदर्भात अभ्यास करताना एक गोष्ट जाणवते. जी अत्यंत चुकीच्या समजुतीत कायम वापरली गेली ती म्हणजे निष्ठा. अश्या भ्रामक कल्पनेत, आपल्याच धर्माची आपल्याच बांधवांनी किती हानी केली आहे, याची शेकड्यानी उदाहरणं इतिहासात सापडतील, महाभारता आधीसुद्धा आणि नन्तरदेखील. निष्ठेची चुकीची व्याख्या आणि त्याला धर्माचं अधिष्ठान असल्याच्या चुकीच्या कल्पना, यांना खरतर छेद देणारं तत्वज्ञान गीतेत मांडून आणि कर्माने ते घडवून वा दाखवून देखील, आम्ही हिंदू धर्मीय त्याबाबत कधीही जागरूकतेने विचार केलाच नाही वा ते तितकं गांभीर्याने घ्यावं,असं फार कोणाला वाटलं नाही.  कारण निष्ठेच्या संदर्भात वा ती योग्य जागी असण्यासंदर्भात फार भ्रामक कल्पनेत आपण वावरलो वा वावरत आहोत. हे खेदाने म्हणावं लागतं. जरी श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षांपूर्वी यावर योग्य तो प्रकाश टाकून, ते उदाहरणाने दाखवून दिलं असलं तरीहि, आपण काहीही बोध घेतला नाही. याचं कारण आपण कृष्ण राम यांचा फक्त अध्यात्मिक दृष्टीन...

श्रीकृष्णनीती भाग २७

श्रीकृष्णनीती भाग २७ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! महाभारताचा पूर्ण सारीपाट पहिला तर त्यात सुरवाती पासून कुरु वंशीयांची मुख्य कथा सापडते. यात मुख्यत्वे श्रीकृष्णाचा वावर इतर व्यक्तित्वाच्या तुलनेत संपूर्ण महाभारत भारून टाकतो. श्रीकृष्णाव्यतिरिक्त भीष्म हे एकच महायोद्धे आहेत जे दीर्घ काळ परिघावर वावरत आपली छाप पडतात. मुळात हि फक्त कथा नसून, एका घडलेल्या महानाटयाचं वास्तविक साद्यन्त वार्तांकन जे महर्षी व्यासांनी इथम्बुत लिहून घेतलं आणि आज मागील पाच हजार वर्ष आणि पुढेही कित्येक युगं हे मानवी मनाला आकर्षित करेल.  मुळात यातील अगणित पात्रं, प्रत्येकाचं स्वतःचा परीघ आणि त्यायोगे कथानकातील त्याचं योगदान, या सर्वांचा एकत्रित विचार करणं हे एक मोठं आव्हान आहे. इतकं दीर्घ कथानक, इतक्या दीर्घ पद्धतीने मांडणं, हेच मुळात दैवी आहे. या कथानकाच्या आधारावर कित्येक उप कथानकं वा लेख इत्यादी आतापर्यंत लिहिले गेले असतील. "व्यासोच्छिष्ट जगत सर्वं" या उक्तीप्रमाणे, जे महाभारतात नाही ते जगात अस्तित्वात असू शकत नाही. याचा प्रत्यय अनेक वेळा आणि अनेक प्रकारे येतो....

श्रीकृष्णनीती भाग २६

श्रीकृष्णनीती भाग २६ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! पांडवांवर झालेल्या अन्यायाने संतप्त झालेले आणि त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले,त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं महत्व व स्थान जाणणारे सर्व पांडवांच्या बाजूने होते आणि ज्यावेळी युद्धस्थितीपर्यंत गोष्टी गेली, त्यावेळी प्रत्येक राजाने याचा निर्णय सहज केला. कारण तोपर्यंत हि ध्रुवीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. यात दोनच घटना घडल्या. एक म्हणजे मद्रनरेश शल्य जे नात्याने माद्रीचे बंधू अर्थात नकुल आणि सहदेव यांचे सख्खे मामा,यांना कपटाने आपल्याकडे वळवून वास्तविक नियम भंगाची खरी सुरवात, कौरवांनी तिथेच केली आणि धृतराष्ट्राचा दासीपुत्र युयुत्सु जो युद्धापूर्वी पांडवांच्या बाजूने आला.  त्याहीआधी द्वारकेला जाऊन कृष्णाची मदत मागण्यास गेलेल्या दुर्योधन आणि अर्जुन यांच्यात पहिला अधिकार कृष्णाने अर्जुनाला दिला. अर्थातच अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून, सैन्य मागण्यासाठी आलेल्या दुर्योधनाला सैन्य देऊन, श्रीकृष्णाचं महत्व विषद केलं. परंतु बाह्य गुण धर्माला आणि सैन्य संख्या यांना महत्व देणाऱ्या दुर्योधनाला, श्रीकृष्णाचं म...

श्रीकृष्णनीती भाग २५

श्रीकृष्णनीती भाग २५ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आतापर्यंत आपण महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा, विशेषतः नकारात्मक, विस्ताराने पाहिल्या. त्या व्यक्तींचा आलेख , मानसिकता, काहींची अपरिहार्यता, काहींची दंभ, द्वेष याने भरलेली मानसिकता, काहींची उद्दाम वृत्ती आणि सत्तालोलुपता, महत्त्वाकांक्षा या सर्वांचा आपण अभ्यास केला.  आता हे चित्र सार्वत्रिक स्तरावर कसं होतं आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम काय आणि कसा कसा होत गेला, त्याप्रमाणे हे युद्ध व्हायला कोणाची मानसिकता विशेषत्वाने कारणीभूत झाली याचा विचार करू. मुळात त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी दोन स्तरात विभागता येईल. एक म्हणजे धृतराष्ट्राच्या आधीचा काळ आणि धृतराष्ट्राचा काळ.  धृतराष्ट्राच्या आधीचा काळ मुख्यता जरासंध , कंस, नरकासुर या असुर शक्तींनी व्यापलेला काळ होता. त्यातील बऱ्याचश्या शक्ती श्रीकृष्णाने नष्ट केल्या वा करवून घेतल्या. त्याच काळातील भीष्मांच्या सारख्या महारथींनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय व अत्याचार कधी केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळ्या आदराने पाहिलं जातं होतं. त्यातही कुरु वंश...

श्रीकृष्णनीती भाग २५

श्रीकृष्णनीती भाग २५ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आतापर्यंत आपण महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा, विशेषतः नकारात्मक, विस्ताराने पाहिल्या. त्या व्यक्तींचा आलेख , मानसिकता, काहींची अपरिहार्यता, काहींची दंभ, द्वेष याने भरलेली मानसिकता, काहींची उद्दाम वृत्ती आणि सत्तालोलुपता, महत्त्वाकांक्षा या सर्वांचा आपण अभ्यास केला.  आता हे चित्र सार्वत्रिक स्तरावर कसं होतं आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम काय आणि कसा कसा होत गेला, त्याप्रमाणे हे युद्ध व्हायला कोणाची मानसिकता विशेषत्वाने कारणीभूत झाली याचा विचार करू. मुळात त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी दोन स्तरात विभागता येईल. एक म्हणजे धृतराष्ट्राच्या आधीचा काळ आणि धृतराष्ट्राचा काळ.  धृतराष्ट्राच्या आधीचा काळ मुख्यता जरासंध , कंस, नरकासुर या असुर शक्तींनी व्यापलेला काळ होता. त्यातील बऱ्याचश्या शक्ती श्रीकृष्णाने नष्ट केल्या वा करवून घेतल्या. त्याच काळातील भीष्मांच्या सारख्या महारथींनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय व अत्याचार कधी केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळ्या आदराने पाहिलं जातं होतं. त्यातही कुरु वंश...

श्रीकृष्णनीती भाग २२

श्रीकृष्णनीती भाग २२ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धृतराष्ट्राकडे वळण्याआधी थोडी पार्श्वभूमी बघू. कृष्णाने कंस, नरकासुर यांसह जरासंध (भीमामार्फत) , कालयवन या व अश्या मायावी शत्रूंचा निःपात करून असुरी,मायावी शक्ती संपवल्या. खरतर असुरी शक्तींचा विनाश झाला की, सर्व स्थिर स्थावर होणं क्रमप्राप्त होतं. परंतु असं झालं नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे हा द्वापार युगाचा अंत:काळ होता. कारण कृष्णा वतार द्वापार युगाच्या अंताला झाला आहे.  यातून कलियुगाचा संदेश, जो श्रीकृष्णांनी महर्षी व्यास यांच्यामार्फत जगाला कलियुगाच्या अंतापर्यंतच्या काळा साठी दिला आहे, तो म्हणजे इथून पुढे असुरांचं अस्तित्व हे प्रत्यक्षात नसेल, आता त्यांना वा उरलेल्या असुरांना मी नष्ट केलंय . परंतु आता ते अस्तित्व रूप बदलून अहंकार, गर्व, क्रोध, दंभ, द्वेष, मत्सर, काम, मोह, लोभ, अनीती, कुसंस्कार अश्या रिपूंच्या माध्यमातून मनात घर करून असतील.  म्हणूनच त्यांचा सामना करणं हे रोजचं, नव्हे क्षणाक्षणांचं महाभारत असेल.जे प्रत्येक व्यक्तीला सामान्य, असामान्य अश्या सर्वांनाच लढावं लागेल. य...