Skip to main content

अध्यात्म विराम ४८

अध्यात्म विराम ४८

अविरत फिरत असलेल्या मनाला नियंत्रित करण्याचे दोनच उपाय आहेत. एक त्याला शांत करत करत स्थिर करत, योगातून, त्या मनाला एकाग्र करत जाऊन, त्याला जड जगतापासून दूर करण्याचा खडतर अभ्यास करत जाणं. पण हे सर्वांना शक्य होईलच असं नाही. पण मग सर्वसामान्य माणसांना, अर्थात जगतातील बहुतांश जनांना, मनाच्या अस्थिरतेला नियंत्रित करता येणं शक्य नाही का.

तर त्याचं उत्तर आहे, शक्य आहे. ज्यासाठी ईश्वराने, भक्तीच्या मार्गातील, चतुर्थ पायरी म्हणजे पादसेवन, ही अनोखी पायरी निर्माण करून, विश्वावर अनंत उपकार केले आहेत. पादसेवन याचा सर्वात प्राथमिक अर्थ, भगवंताच्या चरणी लीन होऊन, त्याला पूर्ण शरणागत होणं. मनाला पूर्ण एका ईश्वराच्या चरणी वाहून, आपल मन त्या स्थानी स्थिर करणं, म्हणजे पादसेवन. शब्दशः याचा अर्थ, एका ईश्वराच्या चरणी नतमस्तक होत, त्या पावलांची सेवा करून, त्याची कृपा प्राप्त करणं. 
 
आता याच्या सखोल अर्थाचा मागोवा घेऊया. मन हे असं इंद्रिय आहे की, जे कधीही एका जागी स्थिर रहात नाही आणि तसं करू गेल्यास अजूनच उसळी मारून, अशांत व अस्थिर होतं. पण त्याच मनाचा एक गुण आहे, त्याला एखाद्या स्थानी लीन वा अर्पण किंवा शरण किंवा शून्य केल्यास, तेच मन एका उन्मनी अवस्थेला पोचतं. अश्या अवस्थेत मन, इतर प्रलोभन,मोह,लोभ,माया यासारखे षडरिपु, यांच्या पाषात अडकत नाही. त्यासाठी ही पूर्ण शरणागती अत्यंत आवश्यक आहे. 

याचं मुख्य सूत्र, जे मनाला समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे, ही शरणागती, लीनता, नम्रता, संपूर्ण समर्पण हे मनाच्या आतल्या म्हणजे सुप्त कप्प्यातून हे असावं. कारण मनाच्या या स्थिरते नुसार बुद्धी, वाचा, देह यांच्या स्थिती नियंत्रित होतील. काया, वाचा, बुद्धी व मन या चारही अक्षांना एकत्रित बांधून स्थिर करणं, हाच ईश्वरी उद्देश, साध्य आणि तेच जिवाचं ध्येय आहे. 

अजून एका तर्काला मनात स्थिर केल्यास, पादसेवन या ईश्वरी उद्देशाला प्राप्त करता येईल. पाद अर्थात चरण आणि सेवन म्हणजे त्यांच्या सेवेचा लाभ प्राप्त करणं. मनाला आपल्याहून श्रेष्ठ अश्या शक्तीपुढे, लीन होण, समर्पित होणं, हे त्या मनाला शांत करतं. कारण सर्व चराचराचा नियंता जो ईश्वर, तोच या मनाच्या कर्ता आणि स्थिरतेचा बिंदू आहे. त्या बिंदूवर मन तेंव्हाच स्थिर होईल, जेंव्हा ते मन त्या सर्वश्रेष्ठ बिंदूला आपला ग, स्व, दुराभिमान, दंभ, दुराग्रह, दुस्थिती, दुर्मती यांना पूर्ण समर्पित करेल. 

समर्पणाच्या या मार्गावर काय काय करावे लागते किंवा त्याची काय काय वैशिष्ट्ये आहेत आणि ते साध्य कसं करावं, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत, सर्वेसर्वा ईश्वर, याच्या विचारांचं श्रवण व स्मरण करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...