Skip to main content

अध्यात्म विराम ४५

अध्यात्म विराम ४५

प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने अनेक गुणांनी सिद्ध करूनच या विश्वात देहप्रप्ती करण्यासाठी पाठवलेलं असतं. पण या जगतात आणि पंचमहाभूत रूप देहात आल्यावर, देहाचे विकार, माया यांनी तो जीव बद्ध होतो आणि शुद्ध आत्मा हळूहळू अशुद्धित होत जातो. एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा सर्वांना कळेल.एखादा द्रविभुत साबण अर्थातliquid hand wash हा काही ठराविक प्रकारच्या विषाणू अर्थात virus विरुद्ध प्रभावी असतो, असं आपण जाहिरातींमधून पाहतो. 

पण जर त्याला आपण अस्वच्छ भांड्यात काढलं, तर हळूहळू त्याची विषाणू नष्ट करण्याच्या क्षमतेत घट होऊन, अंती तो पूर्ण दूषित व अशुद्ध होईल. त्याच तर्काने, वास्तविक पणे एका शुद्ध देहात पाठवलेला आत्मा, देहातील विकार रूप शत्रूंच्या संगतीत, आपली मूळ शुद्धता गमावून, अशुद्ध होत जातो. श्रवण कीर्तन व ईश्वर स्मरणाने, ही अशुद्धता हळूहळू निवळायला सुरुवात होते. पण तरीही पूर्ण शुद्धता प्राप्त करण्यासाठी जीवाला, इश्वरापुढे संपूर्ण शरणागती आवश्यक आहे. 

कारण वृत्तीचा अहंकार, दंभ, स्व आणि मनातला गर्व हे अवगुण जोपर्यंत पूर्ण जात नाहीत, तोपर्यंत स्मरण खऱ्या अर्थाने सार्थ होत नाहीत. मूलतः देहाबरोबर आलेले हे अवगुण, खरतर देहासोबत, आपलं घर समजून राहतात आणि त्यांच्या सहवासाने, मन बुद्धी, जाणीवा, इंद्रिय इत्यादी वाहावत जातात. चुकीची कर्मे होत जातात आणि या जन्मात व पुढील प्रत्येक जन्मात आत्मा देहाच्या माध्यमातून, नित्य, त्या कर्मांची फलं भोगत राहतो.

खरतर हे चक्र ईश्वरी नाम स्मरणात तुटलं पाहिजे. पण माणूस हे ईश्वर नामस्मरण सुद्धा योग्य रित्या करत नाही. किंवा ते करत असतानाच, देहाच्या बाबतीत जास्त आकृष्ट होत असतो. किंवा देहाच्या व प्रपंचाच्यां गरजा अधिक प्राणपणाने जपतो. म्हणूनही ईश्वरी स्मरण पूर्ण कार्य करत नाही.

यावरही दयाळू ईश्वराने भक्ती मार्गाच्या श्रेणीत अजून एक पायरी निर्माण करून, भक्तीच्या मार्गात सहजतेने वावरणाऱ्या सामान्य जनांना उपकृत केलं आहे. श्रवणात आलेलं ईश्वरी नाम, अधिक दृढ व्हावं आणि त्याचा नित्य अभ्यास आणि गोडी लागावी म्हणून, सामुदायिक प्रयत्ना तून, काही साध्य होईल,या उद्देशाने,कीर्तन, भजन प्रवचन इत्यादी मार्गांचा आदर्श स्वतः ईश्वराने घालून दिला आहे. 

श्रवण केलेलं आणि कीर्तन, भजन या मार्गाने दृढ झालेलं ईश्वरी नाम, सतत आत्म्याला आनंद देत रहावे म्हणून, त्या निर्गुण निराकार ईश्वराच्या नामाचं स्मरण करत, ते आपल्या मनावर, बुद्धीवर आणि हृदयात विराजित केलं पाहिजे.म्हणून नित्य स्मरण या तिसऱ्या मार्गाची व्यवस्था ईश्वराने घालून दिली. पण तरीही ते नाम आतून येत नाही कारण दंभ, मान, अभिमान आणि अहंकार या चार पायऱ्या माणसाला पुढे जाऊन देत नाहीत. यावर उपाय म्हणून ईश्वराने पुढील पायरीची व्यवस्था निर्माण केली. 

ती कोणती गे पुढील भागात पाहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...