Skip to main content

अध्यात्म विराम २१

अध्यात्म विराम २१

श्रवण हे असं माध्यम आहे जे कर्ण, मस्तिष्क अर्थात मेंदू, मज्जासंस्था,मन, हृदय, धमन्या, रक्त आणि प्रसंगी देह चेतावण्याची शक्ती आहे. एखाद्या माणसाच्या नुसत्या अपशब्दाने माणूस क्रोधित होऊ शकतो किंवा वेळप्रसंगी त्या माणसावर धावून जाऊ शकतो किंवा त्याला इजा सुद्धा करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या आवाजात इतकी जादू असू शकते की, प्रसंगी त्या व्यक्तीसाठी जीव देणारी माणसं असतात.म्हणजेच त्या व्यक्तीच्या एका शब्दा खातर काहीही होऊ शकतं.

म्हणजेच आवाज आणि शब्द यामधे इतकी ऊर्जा, शक्ती किंवा चेतना असते की, पूर्ण देहाला बदलून टाकण्याची त्या शब्दांची पात्रता असते. अर्थात ही प्रक्रिया एकट्या श्रवण या क्रियेने घडून येऊ शकते. एखाद्या मानसोपचार तज्ञाच्या बोलण्याने हिंस्त्र वा क्रोधायमान माणूस हळूहळू शांत होऊन, विचार करायला लागतो. हे अर्थात त्या मानसोपचार तज्ञाचं कसब वा कौशल्य आहे. 

पण त्या तज्ञाचे, योग्य पद्धतीने मांडलेले वा ऐकवलेले शब्द वा विचार कर्ण, मस्तिष्क इथून, विचाररुपात 
मनात जाऊन, तिथे त्यांनी योग्य ते बीज रुजवलं आणि त्याला योग्य विचारांची मशागत केल्यानंतर, त्याला सद्विचार व विवेक रूप पीक येऊ शकतं. हे इतकं सर्व श्रवण या एका क्रियेद्वारे घडून येऊ शकतं. म्हणून श्रवण या प्रक्रियेचं महत्व अनन्यसाधारण आहे.

हा मानसोपचार तज्ञाचा दाखला फक्त वानगीदाखल घेतला. पण अश्या कितीतरी गोष्टी, क्षेत्र, विषय आहेत, जिथे श्रवण आपल्याला कार्य करताना दिसेल. पण ही श्रवण क्रिया ज्यावेळी ईश्वरी नामाचा महिमा, ईश्वराचं नाम, इत्यादींसाठी वापरली जाते त्यावेळी तिला भक्तिरुप ऊर्जा, शक्ती प्राप्त होते. 

एखादा शब्द सतत, नीट, सातत्याने, दीर्घकाळ पर्यंत ऐकला किंवा श्रवण केला तर, त्या शब्दांची ऊर्जा व शक्ती, यांची अफाट चेतना आपल्या कार्यार्था उपयोगी येते. सातत्य हे नियमित आणि सतत असायला पाहिजे. 
अर्थात हे श्रवण ठराविक नादात, लयीत आणि ठराविक ध्वनित असेल तर त्याचा परिणाम हा सहजसुलभ व साध्य असतो. 

याचं कारण म्हणजे ध्वनी आणि त्या ध्वनीचा लयबद्ध नाद हा कानावाटे, देहातील ठराविक भागावर परिणाम करून, त्यांना उद्दिपित करतो. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ अर्थात ऋषीमुनी यांनी या ठराविक शब्द, स्वर, व्यंजन इत्यादींचा नादमय परिणाम, यांचा अभ्यास करूनच, माणसाच्या मानवी देहातील ऊर्जा, चेतना जागवणाऱ्या, निर्माण करणाऱ्या, विशिष्ट पेशी वा विशिष्ट भाग यांच्या माध्यमातून विचार नियंत्रित करून व विकार नष्ट करून, मनाला शांत करून एकाग्र करून, विश्वाबाहेरील आनंद प्राप्त करून देईल. 

याच मार्गावरून पुढे याच ध्वनीच्या, नादाच्या, विशिष्ट शब्दांच्या नादाची मनाला नादमय सवय जडवून ह्यान, धारणा, समाधी यामधे अग्रेशीत होता येईल, हे देखील त्यांनी शोधून जगापुढे मांडलं. यावर अजूनही सखोल जाऊन, विचार करूया, उद्याच्या भागात. तोपर्यंत या नादाचा अनुभव घेऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...