Skip to main content

अध्यात्म विराम २६

अध्यात्म विराम २६

श्रवण म्हणजे फक्त कानावर पडलेलं, ऐकून, त्याप्रमाणे कृती करणं, हा शुद्ध व्यावहारिक अर्थ आहे आणि व्यवहारात ते अभिप्रेत सुद्धा आहे. पण ज्ञान या दृष्टीने पाहिलं तर, एखादी गोष्ट, ध्वनी, आवाज, sound कानावर पडल्यावर, त्याचा कर्णपटलापेक्षा मनःपटलावर परिणाम होऊन, तो चेतनारुपात आत्म्यापर्यंत जाऊन, त्याचं चिरस्थायी अस्तित्व, मनावर आणि आम्यावर होऊन, त्यातून चिंतन रुपात प्रगती होणं, हे खरं ज्ञान अर्जन केल्याचं द्योतक आहे.

खरं श्रवण हे ज्ञान वृद्धी करून, आत्मउन्नती साधण्या साठी ईश्वराने दिलेलं वरदान आहे. श्रवण हे कर्ण या इंद्रियाला, आत्मिक उन्नतीपर ध्वनी शब्द, नाद, स्वर, सुर इत्यादी ऐकवून, त्याद्वारे भक्तिरस निष्पत्ती करण्यास प्रवृत्त करण्याची बुद्धि होणं, ही खरी श्रवण भक्ती होय. मुळात एक गोष्ट ध्यानात घ्या की, ईश्वराने या इंद्रियांची निर्मिती गर्भात करून, त्याचं कार्य तिथेच म्हणजे जन्माआधी सुरू करून देण्याचं प्रयोजन तेच आहे.

जेणेकरून जन्माला येणारा जीव, गर्भात असल्यापासून, आपली आत्मशुद्धि व आत्मोन्नती साधण्यास सुरुवात करेल. गर्भात असतानाच बाह्य जगतातील ध्वनी लहरी गर्भापर्यंत पोचण्याची व्यवस्था करणारा ईश्वर, नक्कीच किती वैज्ञानिक दृष्टीचा असला पाहिजे, याची कल्पना, आपल्याला, श्रवण या एकाच क्रियेमध्ये ध्यानात येईल. 

इतकं सर्व प्रदीर्घ विवेचन, श्रवण या प्रथम भक्ती मार्गा बद्दल केल्यावर आता मुख्य विषयाकडे वळूया. ध्वनी लहरी आणि प्रकाश लहरी यावर आपण काही भागात चिंतन केलेलं आहे. या दोन गोष्टी सृष्टीत रचून, ईश्वराने,या जगताच्या उन्नतीची गुरुकिल्ली मानवाच्या हातात दिलेली आहे. त्यामुळे याचं महत्व अनन्यसाधारण आहे.

श्रवण हे कोणत्या ध्वनीचं करावं, हा एक प्रश्न कायम मनात येतो. मुळात आपण संसार व प्रपंच यासाठी अनेक प्रकारचं सत्वयुक्त व सत्वहीन दोन्ही प्रकारचं श्रवण करतो. त्यातील सत्वहीन आपण टाकून दिलं पाहिजे, जेणेकरून फक्त आणि फक्त सत्वयुक्त श्रवण हे मन व आत्मा यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. 

सत्वयुक्त आणि सत्वहीन श्रवण म्हणजे नक्की काय आणि ते कसं साध्य करायचं, यावर उद्याच्या भागात, विचार करूया. तोपर्यंत आपण ईश्वराच्या या अद्भुत देणगीचा विचार व त्याचंच मनन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...