Skip to main content

अध्यात्म विराम २८

अध्यात्म विराम २८

आता या संसारातून मार्ग काढून, मूळ उद्देशानुसार आपल्या आत्म्याला, ईश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे नेण हे, अनेक जन्माच्या कर्मगतीमुळे, दुष्प्राप्य असत. कारण नुसतं इश्वरावर व ईश्वरी व्यवस्थेवर विश्वास ठेवायला सुद्धा ईश्वरी कृपा लागते. ती ज्यांच्या लेखी किंवा भाग्यात लिहिलेली नसते,त्यांना देव, ईश्वर, श्रद्धा, भक्ती, विश्वास या सर्व गोष्टी, अशक्य, अबोध आणि कपोल कल्पित भासतात. 

यामधे त्यांच्या कर्मासंगतीचाच दोष आहे. कारण बुद्धी तशी होणं, मनाला ते पटणं आणि मन बुद्धी, देह यांचा समन्वय साधून, त्यासाठीची कृती वा कर्म आपल्या हातून घडणं, हे पूर्णपणे आपल्याच कर्माधीन आहे. कारण ईश्वरी कृपा प्राप्ती, ही सुद्धा, आपल्याच कर्माधीन आहे. कर्माने आपल्या लेखी आपण थोडीफार सद्बुद्धी, सद्वृत्ती आणि सदाचार लिहून ठेवला असेल, तरच ईश्वरीकृपेने, त्या पुण्याचा तो भाग योग्यवेळी आपल्याच कार्याला आणि उपयोगी येतो. 

पण हा योग जुळून यायला, आपल्या भाग्यात वा कर्मात आपण तो जोडून ठेवणं महत्वाचं आहे. हे घडण्यासाठी काहीही मार्ग उपलब्ध नसेल तर, प्राणी विचार कसा करू शकेल किंवा हे कसं जमेल.कारण बुद्धी होणं,योग जुळण हे पुन्हा कर्माधींन आहे,असं विधीच विधान आहे म्हणजे सृष्टी कर्त्याचा नियम आहे. नियमाबाहेर तो ईश्वर स्वतःही जात नाही. 

पण त्याच ईश्वराने, श्रवण भक्ती हा एक अत्यंत सुलभ सहजसाध्य राजमार्ग आखून दिला. इतके भाग याबद्दल प्रदीर्घ चिंतन करून झाल्यावर,आता याच भक्ती मार्गाचा विस्ताराने विचार करूया. एखादा ध्वनी कानी पडल्यावर त्याचा स्वर, शब्द, नाद यांचा बोध आधी बुद्धीला, नंतर मनाला होतो. माणसाच्या किंवा प्राण्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार व पात्रतेनुसार त्याला त्याचा बोध होणार.

याची जाण किंवा समज, थोड्या फार प्रमाणात, सर्व प्राणिमात्रांच्या ठायी, ईश्वराने भरून ठेवलेली आहे. उदाहरणार्थ एखादा श्र्वानासम प्राणी, आपल्या मालकाच्या किंवा सर्वसाधारण कोणत्याही परिचयातील व्यक्तीच्या नित्याच्या आवाजावरून, त्याच्या आज्ञा ओळखून व जाणून, त्यानुसार कृती करतो. म्हणजे तशी बुद्धी आणि तेवढी जाण त्याला, त्याचं ईश्वराने, जन्मतः प्रदान केलेली आहे. 

म्हणजेच आपल्या बुद्धीने, मनाने व जाणीवेने, व्यावहारिक पातळीवर, श्रवणाचा लाभ वा उपयोग प्रत्येक प्राणी करून घेतो. याचाच अर्थ, व्यवहारात मनुष्य नावाचा प्राणी, सांसारिक व प्रापंचिक गोष्टीत या श्रवण ज्ञानाचा जो उपयोग करून घेतो, ते जगण्यासाठी आवश्यक एक प्राण्यासम कर्म आहे, याहून फार त्याला महत्व आहे किंवा दिलं जावं असं वाटतं नाही. पण याचा ईश्वराला अपेक्षित उपयोग व लाभ कशाप्रकारे, मानवाने करून घ्यावा, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...