Skip to main content

अध्यात्म विराम १३६

अध्यात्म विराम १३६

ज्ञानाचे ढोबळ दोन प्रकार होऊ शकतात. एक विश्वाचं आणि दुसरं विधात्याबाबतच. विश्वाचं ज्ञान हे या जगता तील अनेक गोष्टींबाबत गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण ते इतकं विपुल आहे की, बहुतेक जण आपल्या गरजा व जगण्याच्या आपल्या स्थितीनुसार ते ज्ञान अर्जन करून, त्यावर आपली गुजराण करण्याचा प्रयत्न करतो. पण हे ज्ञान, प्राप्त परिस्थितीचा विचार करून घडलेलं व घडवलेलं असतं. अर्थातच जशी परिस्थिती, काळ, स्थळ, गरजा व स्थिती बदलते, त्याप्रमाणे त्याची आवश्यकता बदलत जाते आणि नवनवीन ज्ञानाच्या प्राप्तीची पुन्हा पुन्हा आवश्यकता भासत जाते.

पण जगतातील सर्वच या ज्ञानाला प्राप्त करू शकतील असं नाही. उदाहरणार्थ एखाद्या वय झालेल्या आणि त्यामुळे जुन्या पठडीत, व्यवस्थेत शिकलेल्या व्यक्तीला, आवश्यक असूनही, वयामुळे निवृत्ती स्वीकारून जीवन जगण्याच्या शर्यतीत मागे पडावं लागतं. काही त्यावर मात करून, नवनवीन कल्पना, कला, कर्तृत्व, कसब, ज्ञान प्राप्त करून टिकून राहण्यात यशस्वी असतात. यात तुमची बुद्धी, शारीरिक क्षमता, वय, मनाची घडी यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. तश्या त्या अनेक गोष्टी बाबत या सर्व गोष्टींवरअवलंबून असतातच. 

पण जीवन जगण्याची शर्यंत मोठी विचित्र आहे. तिथे शरीर आणि मन यांचा कणखरपणा हा खूप उपयोगी आहे. मनाने अशक्त व अक्षम असलेले जीव, कमी प्रमाणात ज्ञानप्राप्ती करून, अत्यंत कष्टप्रद व खडतर जीवन जगतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात साथसंगत तशीच लाभली तर, पूर्ण आयुष्य त्यातच जाऊन, सरते शेवटी या जीवनाची इतिश्री मध्यम स्थितीत आणि बेताच्या पुण्यकर्म प्राप्तीची होऊ शकतो. पण अनुभव असा आहे की, या स्थितीत जगणाऱ्या जीवांना सांसारिक उन्नती जरी फार उत्तम मिळाली नाही तरीही, पारमार्थिक प्रगती साधता येऊ शकते.

याला कारण अश्या परिस्थितीत असणारे जीव, जगण्याच्या या वाटेवर, प्रपंचाबाबत उदासीन असतात किंवा होत जातात. त्यामुळे त्यांना या परिस्थितीच्या उदासीनते मुळे, एक प्रकारची उपरती येऊ शकते. याचं दुसरं कारण म्हणजे मला माझ्या संसारात किती कष्ट आहेत, किती भोग आहेत व त्याप्रमाणात किती उपभोग आहेत, याचं कोणतंही सूत्र, विधात्याने न दिलेलं असल्या मुळे, प्रत्येकजण त्याबाबत अशाश्वत आहे, अनभिज्ञ आहे आणि अज्ञानी आहे. कष्टदायक परिस्थितीत असलेला माणूस अजूनच दुःखी वा उदास असू शकतो.

आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. मध्यम व सामान्य परिस्थितीत आयुष्य काढलेल्या व काढणाऱ्या जीवांना, जीवनाकडून फार अपेक्षा नसतात.त्यामुळे त्यांचं औदासिन्य बरेचवेळा मनाचा ओढा अध्यात्म चिंतन याकडे घेऊन जातं. किंवा फार मोह माया यांच्या फंदात असे जीव पडत नाहीत. पण इथे एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की, अश्या जीवांना त्यांच्या कर्म फलांच्या आधारे, विशिष्ट जीवनपद्धती प्राप्त झालेली असते. 

कदाचित ईश्वराकडे जाण्याच्या मार्गाकडे वळण्यासाठी बरेचदा भोगांची लांबलचक मालिका, विशिष्ट परिस्थितीत जन्माला घालून ईश्वर किंवा सद्गुरू साधतात की काय, अशी शंका काही जीवांचा जीवनप्रवास पाहिला की वाटतं. कारण इतके भोग त्यांच्या आयुष्यात आलेले पाहायला मिळतात की, त्या योगे हे ईश्वरी वा सद्गुरू संकेत असतात की काय हे कळत नाही. हे संकेत म्हणजे काय यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...