Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग ३७

श्रीकृष्णनीती भाग ३७
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

धर्म या संकल्पनेबद्दल विस्ताराने जाणून घेतल्यानंतर अधर्म काय हे कळायला खरतर अवघड नाही. जे धर्माविरुद्ध आहे, तो अधर्म. धर्म म्हणजे फक्त ईश्वरो पासना वा अध्यात्म आणि ततसंबंधी ज्ञानार्चन नव्हे, तर प्रत्येकाचं आपलं जीवन जगताना व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि मातृभूमीप्रती असलेली कर्तव्य म्हणजेच व्यापक अर्थाने धर्म. यातील कशातही केलेली चूक वा कर्तव्यमूढता हा अधर्म नसला तरी धर्म पालनात केलेली चूकच.

परंतु यातील कोणत्याही गोष्टींबाबत केलेला अक्षम्य गुन्हा वा प्रतारणा वा प्रमाद म्हणजे अधर्म. अधर्म हा आपण स्वतः केला किंवा अधर्म करत असलेल्या व्यक्तीला जाणूनबुजून वा अजाणतेपणी केलेले सहाय्य. मुळात अधर्म हा पूर्वापार असुरांचा धर्म होता. त्यांच्या साठी धर्म पालन न करणं म्हणजेच धर्म. हे त्यांच्या बुद्धीनुसार वा विवेकाच्या अभावाने, अहंकाराच्या प्रभावाने, तामसीपणा मुळे, काम क्रोध यांच्याकडे मनाच्या असलेल्या नैसर्गिक ओढीतून व वाईट तेच चांगलं या बुद्धीच्या धारणेतून मना तील विकारांचा झालेला उत्पात म्हणजे अधर्म. आता मानवातील या असुरांची संख्या वाढत आहे.

असुरांचा हा धर्म म्हणजेच देव व मानव यांच्यासाठी अधर्म. असुरांच्या या धर्मात मुख्य मित्र हे काम, क्रोध, लोभ, मत्सर, असूया, अहंकार, दंभ, गर्व, सत्वप्रवृत्त लोकांना त्रास दिल्याचा असुरी आनंद, सात्विकतेचा व तात्विकतेचा अभाव, अनीती, अनाचार, मूल्यहीनता, स्वार्थ, तामस या गोष्टी प्रामुख्याने अध्याहृत असतात. म्हणजेच जिथे स्वहित हे सामूहिक, राष्ट्रीय व धार्मिक हितापेक्षा श्रेष्ठ असतं, तिथे असुर वृत्ती आहे, हे सरसकट समजावं. 

त्रेतायुगाच्या अंतापर्यँत जी असुरी वृत्ती प्रामुख्याने असुरां च्यात आढळत होतीती त्या काळापर्यंत मानवाच्या अंगात पूर्णपणे भिनली होती. ज्या कारणांसाठी कृष्णाने जन्म घेतला होता. त्याची उदाहरणासह प्रात्यक्षिकं करून दाखवण्याची तीच योग्य वेळ होती. अर्थात सर्वशक्तिमान परम ईश्वर म्हणून हे श्रीकृष्णाला ज्ञात होतं कि, सर्व एका ठराविक मर्यादे पर्यंत आपण करून आदर्श घालून दिले तरी, त्या आदर्शांचा मानवाने कसा अवलंब करावा वा अमलात आणावे, हे प्रत्यक्ष युद्धात योग्य प्रकारे दाखवून देणं गरजेचं आहे. 

हे जाणूनच श्रीकृष्णाने निश्चित महाभारत युद्धात शस्त्र हाती न घेता, अर्जुन रूपातून मानवाला धर्माशी धर्म आणि अधर्माशी अधर्म हि योग्य शिकवण दिली. आणि एक प्रकारे हेच दाखवून दिलं कि, येणाऱ्या कलियुगात हेच तत्व जीवनाचा भाग असुदे. परंतु संपूर्ण अर्वाचीन, प्राचीन आणि सांप्रत इतिहासात फार थोड्या व्यक्ती अश्या होऊन गेल्या ज्यांनी, श्रीकृष्णाला जे अभिप्रेत होतं, त्याप्रकारे श्रीकृष्णाची शिकवण अमलात आणली. ज्यांनी ज्यांनी अमलात आणली ते नक्कीच यशस्वी झाले. 

याच कारणाने हे जाणलं पाहिजे कि, स्वःताला जे बुडवायला तयार असतात, त्यांना देशाशी धर्माशी काही देणंघेणं नसतं. त्यांना मातृभूमीचं सुद्धा काहीही देणंघेणं नसतं. त्यांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा, लागेबांधे यांच्याशी ते बांधील असतात. याच कारणास्तव मुघलांपासून ते अगदी स्वातंत्र्या नंतरसुद्धा एक पद्धतशीर प्रयत्न केला गेला कि, या भूमीच्या उच्च संस्कृतीचा, धर्माच्या लढाऊ वृत्तीचा ऱ्हास जितका होईल तितका केला जावा. नव्हे तसे पद्धतशीर प्रयत्न देखील केले गेले. 

याच कारणास्तव आपला अत्यंत उज्वल इतिहास जो इतका अत्युच्च दर्जाचा आहे कि, फक्त वाचताच छाती अभिमानाने भरून येते. परंतु डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या व्यवस्थेने तो आपल्यापर्यंत पोचणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊन, हे कायम आपल्या मनावर बिंबवले कि, गेली हजार वर्ष आपण गुलामीत आहोत. जे पूर्णतः चुकीचे आहे. जर गेल्या फक्त २२७२ वर्षांचा इतिहास जरी बघितला, तरी त्यातील फक्त ६८० वर्ष परकीय सत्ता या देशात होत्या आणि जवळजवळ १५९२ वर्ष इथे हिंदू साम्र्याज्याची सत्ता होती. फक्त ती आपण टिकवू शकलो नाही. 

त्याची कारणं हि येथील रक्तात असलेली फितुरी वा आपल्या देश धर्म याप्रती प्रेमाचा अभाव, व्यक्तिगत अहंकार व महत्वाकांक्षा यांचं प्राबल्य. दोन मुख्य उदाहरणं दिली जातात ती म्हणजे राजा अंभी याने सम्राट पोरस विरुद्ध सिकंदराच्या सैन्याला केलेली मदत. परंतु याचा परिणाम फार काळ टिकला नाही. पण दुसरी , जी राजा जयचंद याने फक्त व्यक्तिगत आकस व वैमनस्यां पोटी, पृथ्वीराज चौहान याच्याविरुद्ध, पराजित झालेल्या मोहम्मद घोरीला बोलावून आणि आपल्या संपूर्ण सैन्याचं त्याला सहाय्य देऊन गद्दारी केली, त्याने या देशाचं केलेलं नुकसान अपरिमित होतं. आज आपण फक्त हिंदु सम्राट आणि त्यासमोर परकिय साम्राज्य यांची तुलना पाहुया. 

मौर्य/ हर्षवर्धन ई.स.पुर्व २२७२ ते ११७२ - ११०० वर्षे संपुर्ण हिंदुस्थान

गुप्त/ सातवाहन            
             
विजयनगर ई.स. १३३६ ते १६४६ -३१० वर्षे कर्नाटका - आंध्रा
             
देवगिरी ई.स. ८६० ते १३१७ -४५७वर्ष देवगिरि
             
पल्लव ई.स. २७५ ते ८९७ -६२२वर्षे तामिळ्नाडु
             
काकटिय ई.स. ११६३ ते १३२३- १६०वर्षे तेलंगणा-आंध्रा
             
कारकोट ई.स. ६२५ ते ८८५ - २६०वर्षे श्रीनगर- काश्मिर
             
लोहार ई.स. १००३ ते १३२० - ३१७वर्षे श्रीनगर- काश्मिर
             
चालुक्य ई.स. ५४३ ते ७५३ - २१०वर्षे कर्नाटका
             
पाल ई.स. ८०० ते १२०० - ४००वर्षे उत्तरप्रदेश - बांग्लादेश
             
परमार ई.स. ९७२ ते १३०५ - ३३३वर्ष मध्यप्रदेश
             
गुर्जर-प्रतिहार ई.स. ७७६ ते १०३६ - २६०वर्षे उत्तरप्रदेश
             
अहोम ई.स. १२२८ ते १८२६ - ५९८वर्ष आसाम
             
मुघल ई.स. १२०६ ते १७५७ - ५५१वर्षे दिल्ली
             
मराठा ई.स. १६७४ ते १८१८ - १४४वर्षे महाराष्ट्र ते दिल्ली
             
ब्रिटिश ई.स. १८१८ ते १९४७ - १२९वर्ष संपुर्ण भारत
             
             
हिंदु राजे एकूण १५९२वर्षे    
             
परकिय एकूण ६८०वर्षे    
             
एकुण ई.स.पुर्व २२७२ १९४७ एकूण २२७२वर्षे    

या इतका बलशाली आणि पराक्रमाची शानदार परंपरा असलेला इतिहास पहिल्यानंतर, खरतर आपल्याला शिकवलेल्या इतिहासाचा खोटेपणा जाणवतो. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या या अद्भुत , वैभवशाली इतिहासाचा विसर पडावा, याच उद्देशाने मुघल, ब्रिटिश आणि त्यानंतरच्या राज्यकर्त्यानी पद्धतशीर प्रयत्न केले. 
कारण हि भूमी इतिहासातून शिकून फिनिक्स पक्ष्या प्रमाणे पुन्हा आकाशात झेप घेण्यासाठी, गरुडाची जिद्द ठेवणारी आहे. 

म्हणूनच या इतिहासाचं शक्य तितकं खच्चीकरण करणं हाच उद्देश गेल्या सातशे ते आठशे वर्षात झाला आणि होतोय. म्हणून तो धर्म, ती नीती, ते ज्ञान तो आत्मसम्मान, ते वैभव या भूमीला पुन्हा प्राप्त व्हावा या हेतूने अनेक लोक कार्यरत आहेत आणि राहतील. कारण जशी हि भूमी वीरांची आहे, तशीच ती धर्माची सत्ता पुनर्स्थापित करणाऱ्या आर्य चाणक्यांची देखील आहे. 

म्हणूनच दुर्दैवाचे दशावतार दाखवणारी सहिष्णुता, शत्रू वर दया दाखवणारी, आत्मघातकी क्षमाशीलता, संस्कृती, धर्म यांना स्मशानाच्या दारापर्यंत नेणारी शांतता आणि अनंताचं वैभव मातीमोल करणारी अहिंसा या सद्गुण विकृतींचा (वीर सावरकरांचा शब्द) त्याग केला तर अयोग्य व्यक्तींना व राष्ट्रांना त्यांच्या त्यांच्या जागा दाखवणं शक्य होईल आणि याच संस्कृतीचे गोडवे गाऊन त्याच संस्कृतीचे लचके तोडणारे जयचंदाच्या वंशजांचा बंदोबस्त करता येईल.  

तरच श्रीकृष्णनीती नक्कीच आपण आत्मसात केली असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल. प्रत्येकाला राज्य करून निर्णय घेता येणार नाहीत हे नक्की. परंतु योग्य त्या व्यक्तीला त्या स्थानी नेमून, आपल्या धर्माच्या रक्षणाचं आपलं उत्तरदायित्व नक्की पार पाडता येईल आणि त्यावर सतत लक्ष ठेवून जागरूक राहून, या उच्च सांस्कृतिक सनातन धर्माची ध्वजा हिमालयात उज्वल ठेवता येईल. अन्यथा एकेकाळी इराण पासून ब्रह्मदेशा पर्यंत पसरलेली हि संपदा, जशी आपल्याच चुकांमुळे, दुर्लक्ष करण्यामुळे, उदासीनतेमुळे आणि नाकर्तेपणामुळे आक्रसत गेली, तशीच ती अजून अजून आक्रसत जाऊन एक दिवस लयाला जाईल. म्हणूनच वेळीच जागे होऊया. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
२५/०६/२०२०
भाग सदतीसावा समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...