Skip to main content

संवाद भाग १

संवाद भाग १ ( पूर्ण शीर्षक ३ऱ्या भागात)

तो बाजूला येऊन उभा होता. आधी दखल घेतली नाही. लक्ष दिलं नाही. काहीही न बोलता नुसता उभा राहून मला निरखत होता. थोडं विचित्र वाटत होतं. होतच चं ना अस , जर कोणीतरी बाजूला येऊन उभा राहिला, तुम्हाला निरखत असेल  तर आणि आपण बेसावध आहोत. त्या माणसाची अचानक चाहूल लागली की, थोडं कसातरी होत. तसच झालं.

सहज बघितलं, एकदम अनोळखी असून बरा वाटला. हसला बघून. मी देखील हसलो. बसू का विचारल्यावर मी आपसूक हो म्हणालो. प्रश्न पडला की, या सार्वजनिक बाकड्यावर बसायला माझी का बुवा परवानगी. असुदे विचारून बसला म्हणजे सभ्य असेल.  थोडा वेळ काही न बोलता नुसताच बसून होता. मला नीट निरखत होता.

उगाच सलगी करेल वा ओळख काढेल अस वाटलं , म्हणून मी सहज जरा त्रासिक चेहऱ्याने बघितलं, तर हसला तो.  ओळख वाढवण्याचा विचार दिसतोय, अस वाटून मी विचारणार  होतो
की आपली ओळख आहे का ? पण तो स्वतःच बोलता झाला.

" ओळखलं का मला ? "

म्हटलं " नाही. कुठे पाहिल्याचं आठवत नाहीये. तुम्हाला आठवतंय का? काही संदर्भ द्याल तर बरं होईल."

मुद्दाम थोडं जोरात म्हणालो मी. अशी उगाच ओळखी वाढवणारी लोकं आवडत नाहीत , काय उद्देश असेल सांगता येत नाही. एक विचार चाटून गेला.

" नाही लागत संदर्भ. बर मीच सांगतो. मी सतत तुमच्या सोबत असतो. कायम अष्टौप्रहर."

तरीही लक्षात येत नाहीये हे त्याने ताडल. स्वतःच म्हणाला.

"बर मीच ओळख करून देतो. पण आधी बोलतो थोडं मग सांगतो."

"ठीक आहे, जरा लवकर कारण मी बोलण्याच्या स्थितीत नाहीये. डोकं जड झालंय"

" माहीत आहे म्हणूनच आलोय मी, अगदी न बोलावता , आगंतुकासारखा."

भलताच आगाऊ दिसतोय मी विचार करत होतोच तितक्यात.

" आगाऊ नाहीये मी . पण यावं लागलं मला मुद्दाम. गेले कित्येक दिवस बघत होतो, किंबहुना कित्येक वर्ष मी वाट पहात होतो कधीतरी तू मला विचारशील, माझं ऐकशील, मला तुझं दुःख, काळज्या, चिंता याबरोबरच तुझा आनंद, उत्साह यामध्येसुद्धा सामील करून घेशील. पण वाट पाहून पाहून दमलो. तू एकटाच लढत असतोस तुझ्या संकटांबरोबर, काळज्या , चिंता, प्रश्न याबरोबर. कधीही तुला मी दिसलोच नाही. कधी तुला मी सापडलोच नाही.

कधीच तू माझ्या वाट्याला आलाच नाहीस. सतत धावतोयस जीवनात, अगदी विद्यार्थी दशेपासून. कधीही उसंत न घेता, स्वतःला न देखता, न पूजता , फक्त धावतोयस."

आता माझी सटकत चालली होती. कोण हा , कुठून आलाय, काहीही न सांगता बोलत सुटलाय. पण तो थांबला नाही. आज मी त्याच्या तावडीत नेमका सापडलो, एकटा. जवळपास कोणीसुद्धा दिसत नव्हतं. बघू काय काय बोलतोय ते. तो बोलतच राहिला

" तुला असं लढताना , उत्साहित होताना बघून आनंद व्हायचा. वाटायचं यात आपण असावं तुझ्या सोबत. वाटलं होतं कुठेतरी मी तुला दिसेन, सापडेन, भेटेन. पण तू तेंव्हा मला बघितलंच नाहीस. बर ते जाऊदे. पण निदान दुःखाच्या क्षणी तरी मला बोलावशील, माझी साथ मागशील आणि मी ती आनंदाने देईन. अशी आशा धरून होतो.  पण तिथेसुद्धा तू निराशच केलंस. अर्थात तसा निराश होऊन हरणाऱ्यामधला मी नाही. खूप लवचिक, खूप ताकदवान, खूप धीरोदात्त आहे मी. "

आता वाटायला लागलं की हा कोणीतरी वेगळा आहे. आगंतुक वाटला तरी हितचिंतक वाटतोय. म्हणून जरा रस घेऊन ऐकू लागलो. खरतर माझ्या चुकाच दाखवतोय. पण भाषा आणि शब्द आपुलकीचे वाटले, म्हणून तिरका होतो तो जरा त्याच्याकडे तोंड करून बसलो. तो पुढे बोलत होता आणि मी फक्त ऐकत होतो.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
२७/०६/२०१८
०८:२९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...