Skip to main content

मुरली - २२

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - २२

अर्थातच आकाशस्थ ब्रम्हर्षी नारद नारायणाच्या चिंतेत चिंताग्रस्त होते आणि अगतिक.  प्रभू आज्ञा नसल्यामुळे काहीही करू शकत नव्हते.

"नारायण नारायण नारायण "

मोठ्या अनुत्साहात ब्रम्हर्षी नारद म्हणाले आणि हताशपणे विचारमग्न स्थितीत पहुडलेल्या श्रीकृष्णाकडे पहात पुन्हा वदले

"एखाद्याला वचन देण , त्यावर नन्तर विचार करत निद्रानाश ओढवून घेण आणि यावर पुनः या बद्धतेत आनंद मानणं. कस काय लिलाधराना आवडतंय, हे तेच जाणोत. कदाचित ते म्हणाले तस , पंचमहाभूतयुक्त मानवी देहात गेल्यावर या गोष्टी अनुभवण्याची गोडी अवीट असावी. पण मला चिंता या गोष्टीची लागल्ये की ह्यातून ते स्वये बाहेर पडणार की मलाच काही करावं लागेल."

हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि एक कल्पना त्यांच्या  मनास स्पर्शून गेली. त्यांनी विचार केला की, आता या क्षणी राधाराणीला काय वाटतय, की हे फक्त इकडूनच आहे, जरा खात्री करून घेऊया. यास तर परम ईश्वर नारायणांची  मनाई असू नये , बहुदा. अस म्हणून ब्रम्हर्षी अंतर्धान पावतात.

राधा बिचारी कृष्णाच्या विरहात बिचारी उदास मनःस्थितीत,  भेटही नाही आणि त्या चिंतेत निद्राही  नाही, अश्या विचित्र स्थितीत एकटीच विचार करत बसलेली आहे. घरातील  तिच्या कोठीत विरहिणी राधा कान्हा  , गोविंद, गिरीधर नटनागरचा जाप करत बसलेली आहे. पण तिन्हीसांजेला अश्या उदासवाण्या मनःस्थितीत घरात बसणं योग्य नाही असं तिला घरातले सांगतात. त्यामुळे घरातून आपल्या कोठीतून  उठून, राधा  बाहेरील अंगणातील बगिच्यात बांधलेल्या झुल्यावर येऊन हलकेच बसते. तिला त्या झोक्याच झुलण सुद्धा सहन होत नसत, म्हणून ती झोक्याची हालचाल न करता बसते .

तितक्यात तिला कोणीतरी आल्याची चाहूल लागते. कोण आलंय हे बघायला घरातून कोणीतरी येईल असं वाटून राधा आधी उठत  नाही., पण कोणीही येत नाही हे पाहून स्वतः उठते आणि दिंडी काढून दार उघडते. बाहेर एक साधू संन्याशी उभे होते, भगवे वस्त्र परिधान केलेले, डोक्याला भगवा फेटा, एका हातात कमंडलू, दुसऱ्या हातात भिक्षापात्र, खांद्याला भगवी झोळी, मोठा तेजपुंज चेहरा, तपश्चर्येची प्रभा जाणवत होती. मुखात एकच घोष " जय जगदीश्वर , जय जगदीश्वर " राधेला पाहून साधू म्हणतात

" माते , ओम्  भवती भिक्षांदेही . माते काही भिक्षा असेल तर दे. पण "

" पण काय साधुमहाराज"

" आमचं नाव नारायणदास आहे . पण अश्या उदास चेहऱ्याने आम्ही भिक्षा घेत नसतो. कोणी दुसरं घरात  आनंदी आणि उल्हसित असेल तर त्यांना पाठव माते.  अन्यथा आम्ही पुढील गृही निघतो."

" नारायणदास महाराज मी उदास नाहीये. आनंदात आहे. कोणतीही  समस्या, विवंचना, चिंता , काळजी काहीही नाही."

" बर मग नारायणाच नाव घेऊन पुन्हा हेच सांगा की तुला  काळजी,  चिंता विरह काहीही नाही."

" नाही महाराज तस काहीही नाही नारायणदास महाराज"

"नाव दासाच नाही माझ्या स्वामींच घे माते."

" पण खरंच महाराज त्याची काही आवश्यकता नाहीये. मला मनापासून वाटतय तुम्ही विश्वास ठेवा. एक विचारू का"

" अवश्य विचार माते , निःशंक मनाने दिलेलं दानच लाभत दोघांनाही. दाता आणि स्वीकारता. "

" महाराज आपण महान आहात. आपण त्रिकालज्ञानी आहात. माझ्या प्रश्नाआधीच त्याच उत्तर दिलंत आपण. धन्य आहात आपण. खर आहे मी कृष्णाच्या भेटीसाठी आतुर आहे आणि त्याच्या विरहात उदास जीण जगते आहे."

"मग मी तुझ्याकडून भिक्षा स्वीकारू शकत नाही. अजून एकच गृही मी भिक्षा मागू शकतो, अन्यथा....."

"अन्यथा काय नारायणदास महाराज"

यावर साधू उत्तरतात

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...