Skip to main content

मुरली - ३२

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ३२

सैन्याच व सैनिकांच एक विशेष असत की, शांततेच्या काळात त्यांना जर कार्यक्षम ठेवायच असेल तर त्यांना सतत कार्यरत ठेवून फिरत ठेवण गरजेचं असतं. म्हणूनच या सुरक्षा व्यवस्थेतील सैनिकांच्या दलाला ठराविक काळा नन्तर दिशा व स्थान बदलून सतत फिरत ठेवण्यात येत असे. म्हणजे पूर्व दिशेला सुरक्षा व्यवस्थेत असलेलं सैन्यदल हे काही काळाने उत्तर दिशेला, उत्तर दिशेचे ईशान्येला , इशान्येचे दक्षिणेला असे फिरवण्यात येई.  याचा परिणाम सैन्याच्या मनोबलावर सकारात्मक होत असे आणि हाच या सर्वांचा उद्देश होता.,

या सर्व सुरक्षाव्यवस्थेपुढे एक पोलादाची सुरक्षा तटबंदी होती. जी वज्रालासुद्धा अभेद्य होती. त्या तटबंदीपलीकडे सुरू होत होता , राजप्रसादाचा विस्तीर्ण परिसर. यात सर्वात आधी राजवाड्यातील, राजगृहातील सेवकवर्ग यांना राहण्याचे छोटेसे ग्राम होते. ज्याची पुन्हा एक उत्तम बांधकाम व्यवस्था होती. सर्व सेवाकवर्ग जवळच असण्याचं कारण हेच की त्यांना कामावर जाणं येणं सोयीचं पडावं. हाच मूळ उद्देश

यानंतर सर्व प्रथम कृष्ण व बलराम यांच्या व्यक्तिगत सुरक्षेसाठी असलेलं खास प्रशिक्षित सैन्यबल होत. त्यात त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था. यातनंतर  राजाचे गुप्तहेर पथक व त्यांचे प्रमुख ह्यांची व्यवस्था करण्यात आली होती. याच खूप महत्वाच कारण हे की , त्यांना महत्वाच्या बातम्या, अत्यन्त गुप्त समाचार त्वरेने, अत्यन्त गुप्तपणे खास फक्त कृष्ण व बलराम यांच्या पर्यंत पोहोचवता यावा. त्यांना थेट कृष्ण बलरामा पर्यंत  पोहोचण्याची अनुमती होती. त्यासाठी त्यांना विशेषतः गुप्तहेर प्रमुखांना तस अधिकारपत्र देण्यात आलं होतं.

या सर्वांनंतर उत्कृष्ठ बांधकाम , कलाकौशल्य , कारागिरी, उत्तम नक्षीकाम , अत्युच्च सजावट यांनी युक्त, वैविध्यपूर्ण वृक्षलता , फुलझाड, शोभिवंत कलाकाम यांचा उत्तम नमुना असलेली उद्याने, बागबगीचे यांनी सुशोभित केलेले राजप्रासाद अर्थात राजवाडे होते. प्रत्येक राजप्रासादाला बाहेरून व आतून उत्तम सजावट व वेगवेगळे रंग असलेलं  रंगकाम होत ज्यावरून हे प्रासाद कोणा कोणाचे आहेत हे बाह्य सजावट व रंगकाम यावरून समजत असे, अर्थात ते खास निकटच्या माणसांनाच समजत असे.

प्रत्येक राजप्रासाद हा दिमाखदार आणि अनेक वैशिष्टयानी युक्त होता.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...