Skip to main content

मनाचा आणि आपला मनाशी संवाद भाग ३

मनाचा आपल्याशी आणि आपला मनाशी संवाद  भाग ३

किती वेळा तू निराश होत होतास, किती वेळा मला आशा होती कि, तू येशील, मला विचारशील , मी तुला तुझ्या निराशेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. मी अजूनही आशावादी आहेच. पण मला येऊन बोलावं लागलं. अर्थात मला त्याच वाईट वाटत नाहीये, कि, मला यावं लागलं, वाईट याच वाटलं कि, मी तुझ्या अगदी जवळ असून , तुझाच हिस्सा असून, तुझ्यातच असूनसुद्धा तुला जाणवलं नाही, कळलं नाही , उमगलं नाही. "

तो शांतपणे बोलत होता, पण मनापासून बोलत होता. त्याच्या प्रत्येक वाक्याचा, अगदी प्रत्येक शब्दाचा  मी विचार करत होतो. तो एवढं सर्व बोलत असूनही तितकाच शांत , निग्रही आणि संयमी वाटत होता. आता डोक्यात चक्र सुरु झाल होत कि, हा कोण आहे. याला माझ्याबद्दल इतकी माहिती आणि माहितीपेक्षाही आस्था का आहे. हे विचार एकीकडे चालू असतानाच, त्याच्या बोलण्याचासुद्धा मी विचार करत होतो. त्याचवेळी त्याच बोलणं ऐकत सुद्धा ऐकत होतो. त्याच्या वाक्यांचा  अर्थ लावण्याचा प्रयत्न सुद्धा करत होतो. हा मात्र प्रत्येक गोष्ट विस्तारपूर्वक मांडून, काय घडलं , काय घडलं नाही, काय चुकलं या सर्वांचा हिशोब अर्थात गोळाबेरीज मांडत होता. मला विचार करताना पाहून तो बोलता बोलता जरा थांबला. माझं त्याच्या कडे लक्ष गेलं आणि मला म्हणाला.

"तू  माझ्या बोलण्याचा विचार करतो  आहेस  हे चांगलं लक्षण आहे. माझ्या आत कुठेतरी , काहीतरी जळतंय हे तुझ्या  पर्यंत पोहोचवणं, हा मुख्य हेतू घेऊन मी तुझ्याशी  बोलायला आलो होतो. कदाचित माझ बोलणं तुला एखाद्या मुद्द्यावर पटलं नसेल, एखाद्या गोष्टीच वाईट वाटलं असेल, एखादी गोष्ट खटकली असेल. त्याबद्दल खरच मी दिलगिरी व्यक्त करतो. पण माझं म्हणणं  तुझ्या पर्यंत पोचवून त्यावर तुला विचार करायला लावणं, हाच मुख्य उद्देश घेऊन मी वेळ काढून, तुझा वेळ पाहून, तुला एकटा बसलेला पाहून आलो. त्यामुळे माझा उद्देश सफल झाला. आता माझं बोलून झालाय आणि मला तुला ऐकायचंय "

यावर मी विचार करत होतो. त्याच्या बोलण्यातून एक जाणवलं कि, तो जे इतकं पोटतिडिकीने बोलतोय, त्यामागे त्याचा स्वार्थ काही जाणवला नाही. तस वाटलं नाही. पण तो बोलला त्यावर विचार केल्यानंतर मी बोलणं गरजेचं होत.  कारण तोच त्याचा मुख्य उद्देश होता. संवाद. आमचा संवाद  आणि संवादात दोघांनीही बोलणं गरजेचं असतं , किंवा तशी अपेक्षा असते  संवादाची. अर्थात हे बोलणं प्रत्युत्तर असेल, किंवा प्रतिक्रिया असेल. पण ती देणं किंवा बोलणं अपेक्षित होत. मी सुद्धा शांतपणे सुरु केलं. असा मी कधी बोलल्याचं स्मरत नाहीये. पण घडल खरं.

"सर्वात प्रथम तू जे बोललास त्यातलं अक्षर अन अक्षर खर आहे. हि सर्व स्थित्यंतरं माझ्यात होत असताना मी नकळत त्या गर्तेत अडकत गेलो. व्यवाहारिक दृष्ट्या मी माझ्या व्यापत गुरफटत होतो आणि मी कधी या व्यापाचा हिस्सा झालो, ते, माझं मलाच कळलं नाही. गुंता इतका माझा मीच केला कि, आता त्यातून बाहेर पडणं किंवा त्यावेगळं स्वतःला करणं जमेल असं वाटलं नाही. त्यामुळे माझ्यातला माझाच आवाज मी हरवून बसलो. एक यंत्रवत , कृत्रिम आयुष्य आणि व्याप यांचा कोष बनवून जगत आलो. हे खरं आहे. पण तरीही मला एक प्रश्न पडलाय कि, तू कोण आहेस. मला इतकी वर्ष का सापडला नाहीस, या आधी कुठे होतास. आजच का आलास. "

"सांगतो. मी तुझाच आतला आवाज तुझं मन , तुझ्यातला मी, तुझा अंतरात्म्याचा आवाज. खूप जवळ असून सुद्धा कधीही तू मला ऐकलं नाहीस. मी तुला नेहमीच साद घालायचो, तुला सूचना करायचो, तुझी मदत करायचो, तुला वेळोवेळी सावरायचो. अरे तुझाच हिस्सा आहे मी. फार पूर्वीपर्यंत तू माझं ऐकायचास, लहान असताना. मीच तुला हात धरून उभा केलं, पाळायला शिकवलं, विचार करायला शिकवलं. तुझं धैर्य मीच, तुझी ऊर्जा मीच आणि  तुझी शक्तीहि  मीच. नन्तर तू मोठा होत गेलास, शिक्षणाने , वयाने आणि तुझा आधार असलेल्या मला हळू हळू विसरत गेलास. चक्रव्युहात गेलास पण बाहेर कस पडायच ते माहीत नव्हतं तुला, अगदी अभिमन्यूसारखच. उमजत नव्हतं तुला आणि उपजत विचारशक्ती, स्रोत असलेला मी तुझ्या सोबत असून सुद्धा तू मला विसरला होतास. आज खूप प्रयत्नाने तुला गाठला आणि जे बोलणं गरजेचं होत ते बोललो. वाईट वाटून घेऊ नकोस. पण आज तुला निराश आणि विमनस्क स्थितीत पाहिलं आणि राहवलं नाही. म्हटलं याने आपला आतला आवाज हरवला आहे. विसरून गेलाय हा आपल्याच अंतराम्याच्या आवाजाला , तर आज आपणच याला जागा करावा. तुझ्याशी संवाद साधावा. म्हणून आलो होतो  मी."

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
२९/०६/२०१८
०५.३०

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...