Skip to main content

मनाचा आणि आपला मनाशी संवाद भाग ४

मनाचा आपल्याशी आणि आपला मनाशी संवाद  भाग ४

"आता कस वाटतय तुला. "

त्याने मला विचारलं.

"खूप हलकं हलकं वाटतय, हे नक्कीच. अनेक शंका आहेत."

"काय? जे असेल ते मोकळेपणी मांड. शब्द नसतील तर नुसत्या भावना मांड , मला तुझी कोणतीही भाषा समजू शकेल. पण व्यक्त हो. कारण व्यक्त झालास तर मोकळा होशील आणि नाही झालास तर सुप्त मनात राहील आणि त्रास देईल, तुला आणि मलाही. "

"अरे हो हे सुप्त मन आणि जागृत मन ही काय भानगड आहे , जरा सांगशील का ? समजावून."

तू एकदम चौथ्या मजल्यावर नको जाऊस. सांगिन सर्व काही, फक्त पायरी पायरीने चढू, म्हणजे धडपडणार नाहीस. काय ? "

"मुळात तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मला."
"बर . माझी रचना सृष्टिकर्त्याने तुझ्या रचनेबरोबरच केली. तू जन्माला आलास कि, मी आलोच तुझ्यासोबत. इतकं सहज आहे ते. तू जे विचार करतोस ,त्याद्वारे जे कार्य करतोस, कर्म करतोस, त्या सर्वांचा मुख्य सूत्रधार तुमचा मेंदू असतो. मेंदूच कार्य हे कृतीत आणण्यासाठी अनेक इंद्रिय आहेत. इंद्रियांचं शारीरिकदृष्ट्या नियंत्रण मेंदूकडे असतं. हे सर्व शरीर शास्त्रात तू शिकला असशील. हे मी खूप संक्षिप्त स्वरूपात तुला सांगितलं . पण जिथे जिथे कळणार नाही, तिथे तिथे निःसंकोच विचार. तर हे सर्व शरीरात मेंदू मुखत्वे नियंत्रित करतो. परंतु जी मुख्य ऊर्जाशक्ती आहे , जो ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे, तो आहे तुझे विचार. ते कुठून येतात हे अजून शास्त्राला शोधता आलेल नाही. असो सध्या तो आपला विषय नाही. तर, तुझी विचारशक्ती म्हणजे मी. तुझा एकप्रकारे आधार म्हणजेच मी. अशी कल्पना कर कि तू एखाद चित्र पाहत आहेस ते पाहण्यापर्यंतची क्रिया शरीर करत. नन्तर ते पाहून जे विचार येतात ते तुझं मन असत. हे सर्व तरंग लहरींवर चालत. किंबहुना संपूर्ण विश्वच कार्य हे तरंग लहरींवर म्हणजेच vibrations वर चालतं. जे विचार येतात ते मन करत आणि ते शरीराला त्यानुसार कामाला लावतं. म्हणजे एकप्रकारे नियंत्रण आणि सूत्रसंचालन करतं म्हणालास तरी चालेल. "

"amazing आहे."

"हो खूप गहन आहे. पण समजलं तर खूप सोप्प जाईल तुला. अजून एक उदाहरण देतो. समज तेच चित्र नसून तो एखादा नदी किनारा आहे. वाहणारं पाणी आहे, मस्त गार वारा सुटलाय, अगदी आल्हाददायक वातावरण आहे. अश्या रम्य वातावरणात त्या ठिकाणी काही काळ उभं राहणं अथवा बसणं हा निर्णय जो घेतला जातो. त्यामागे तुझं प्रसन्न मन आणि त्या वातावरणाचा भारलेपणा या गोष्टी विशेषतत्वाने कारणीभूत असतात. तो निर्णय तांत्रिक दृष्ट्या तू घेतलास, पण हा तू जो आहेस , ते तुझं शरीर  आणि मन किंवा आतला आवाज यांनी मिळून घेतलेला  असतो. अश्या वेळी जर तुला एखाद महत्वाच काम करायचं असेल आणि तू ते विसरून गेलास. याचा अर्थ तू अलर्ट म्हणजेच सतर्क नव्हतास असा घेतला जाईल. . हा  सतर्कपणा म्हणजेच, माझं अस्तित्व तुझ्यात पूर्णपणे कार्यमग्न आहे, असा होतो. अथवा तुझी काम करतानाची त्या कामातील एकाग्रता आणि त्याच वेळी इतर गोष्टी लक्षात ठेवून त्यादेखील नियंत्रित करण्याची क्षमता हे तुझं तुझ्यावर व तुझ्यासह माझ्यावर कस नियंत्रण आहे यावर अवलंबून असत. ज्या वेळी तू मला पुरेसा वेळ देतोस किंवा माझ्याकडे पुरेस लक्ष देतोस, त्यावेळी मी पूर्ण क्षमतेने काम करत असतो. तुमच्या मनावर कोणत्या भावाचा प्रभाव जास्त आहे किंवा कोणत्या भावाचा अभाव आहे, त्यावर मनाची कोणती शक्ती कार्यरत आहे हे ठरत. "

"म्हणजे मी तुला नियंत्रित न करता तुझ्या मताने वागलो आणि त्या त्यावेळी तु मला  पुरेस महत्व दिलस  व तुझी एकाग्रता जोपासलीस . तर तू सर्व गोष्टी जश्या घडायला हव्या आहेत तश्या घडवतोस. बरोबर "

"नाही मी काहीच घडवत नाही. घडवतोस तूच, म्हणजे तुझा देह. कारण कर्म तो करतो. पण तुला ते करण्यासाठी असलेली ऊर्जा (शारीरिक उर्जे व्यतिरिक्त असलेली शक्ती) हि तुला माझ्याकडून मिळते. तू खूप वेळा असं ऐकलं असशील कि, एखाद्याने शारीरिक क्षमते पेक्षाही अचाट व अफाट काम करून दाखवलं. ती माझी शक्ती. तो मी. "

"तुझी ताकद इतकी अचाट आणि अफाट आहे. "

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
३०/०६/२०१८
१३.००

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...