Skip to main content

संवाद भाग २

संवाद भाग २ ( पूर्ण शीर्षक ३ऱ्या भागात)

तो पुढे बोलत होता आणि मी फक्त ऐकत होतो.

"तू जेंव्हा कोणी नव्हतास , म्हणजे तुला ओळखही नव्हती अगदी स्वतःशी सुद्धा , खूप लहान होतास, समजण्याच्याही आधीच्या वयातला, तेंव्हा तुला मीच शिकवलं चालायला. मीच शिकवलं तुला बोलायला, तुझं निरागस हसणं , तेंव्हाचं , अजूनही आठवतंय मला,. भावतंय . दिसतंय अजूनही. तू हळू हळू मोठा होत गेलास. शिकत होतास, तेंव्हाही मी होतोच सोबत, तुझा साथीदार, मैतर.

तू थोडा अजून मोठा झालास. मित्र जमवलेस, त्यांच्या संगतीत देखील तू कित्येक आनंद साजरे केलेस. मी तेंव्हाही होतोच त्यात, तुझ्यासोबत. अजिबात एकदाही एकटं सोडलं नाही मी तुला. शिक्षण संपवून तू नोकरीला लागलास. जीवनात अजून उंच गेलास, प्रत्येक पावलागणिक चढत गेलास. मी सुखावत गेलो. तोपर्यंत मी तुझ्याशी बोलत होतो. तू माझ्या संवेदना समजत होतास. माझी साथ तुला हवी होती. किंबहुना तू माझ्याच विचाराने पुढे जात होतास.

पुढे पुढे तू खूप व्यस्त होत गेलास. जस जसा यशाची शिखर चढत गेलास तस तसा  दुरावत गेलास. तुझ्याच विश्वात तू रमत गेलास. मी हळू हळू मागे पडत गेलो. दुर होत गेलो.  तरीही मला आशा होती कि, तू जिथे चुकशील , दमशील, हतबुद्ध होशील, निराश होशील, तिथे तिथे , त्या त्या वेळी मी तुला मदतीचा हात देऊन सावरीन. तुला पुन्हा उभा करीन. पुन्हा नव्या दमाने तू पुढे जाशील. एकूणच तुझा आणि माझा संपर्क तुटत गेला."

मी विचार करत होतो हा अनोळखी, आगंतुक आणि आगाऊ वाटणारा सद्गृहस्थ इतक्या पोटतिडकीने बोलतोय. माझ्या हिताची व अहिताची चिंता वाहतोय. पण आहे तरी कोण. मेंदू काम करत नव्हता. आधीच मी डोकं सुन्न झालं म्हणून बसलो होतो, त्यात आता हा आला. पण त्याने आता माझा ताबाच घेतला होता. मी अविचल ऐकत होतो, त्याचा प्रत्येक शब्द आणि त्याचा गर्भितार्थ. मी त्याच्याकडे लक्ष दिल्यावर त्याने पुन्हा सुरू केलं.

" बोलू मी पुढे."

मी मानेनेच होकार दिला. तो पुढे म्हणाला.

" तरीही मी मध्ये मध्ये तुला सावरत होतो. तुला निराशेच्या गर्तेत जाऊ न देता. तुला कळत नकळत आधार देत होतो. तुझा कळत नकळत आधार होत होतो. कारण शेवटी मी तुझाच भाग होतो. नव्हे आहेच. तुला माहीत नव्हतं आणि मला कळत नव्हतं कि कस तुला कळवायचं, जाणवू द्यायचं. कस आहे ना कि,  कितीही झालं तरी मीच तुझा साथीदार होतो, साक्षीदार होतो, नव्हे आहेच आणि असेनही. तुझ्याच भाषेत सांगायचं तर, I am part and parcel of your life since the day you took first breath. तुझ्या पहिल्या श्वासापासून मी तुझाच होतो. हे जाणवलं नसेल तुला. मीच तुझी ऊर्जा , उत्साह , जोश , उमेद, जिद्द, शक्ती सर्व काही होतो.

पण तरीही मी तुला जाणवू देण्याचा , तुझ्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तू खूप गर्दीत असतोस तेंव्हा आणि तू एकटा असतोस तेंव्हाही , मी तुला निरखून बघत असायचो. तुझी प्रत्येक झेप, चाल, उडी, बघून मलाहि आनंद व्हायचा. तुला आनंद साजरा करताना मी आतल्या आत स्वतः अंतर्यामी सुखावून जायचो. तुझी उमेद वाढवण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करत असायचो. पण हळू हळू तू मला विसरत गेलास. आपल्यात अंतर पडत गेले. तू विचार करेनासा झालास. जीवनाच्या शर्यतीत स्वत:ला हरवत गेलास. शर्यतीचा हिस्सा झालास, प्याद झालास. माझा कधीही विचार सुद्धा नाही केलास. अरे, तुझाच असूनही मी, तुझाच राहिलो नाही. तरीही आस होती आज नाही तर उद्या हा येईल आपल्याकडे,  बोलेल आपल्याशी, विचारेल आपल्याला, हात मागेल आपला, स्वतःचा ego आणि attitude बाजूला ठेवून शिडी उतरून खाली येऊन बोलेल  माझ्याशी. माझ्या मताने चालेल. मला निदान विचारेल. मला जवळ करेल. पण तू माझा पार चोळा मोळा केलास. किंबहुना मला गणतीत धरलंच नाहीस. 

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
२८/०६/२०१८
०६.००

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...