Skip to main content

मुरली  - ३६

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ३६
 

"बर मग "  देवी सत्यभामा यांनी विचारलं

नारद म्हणाले 

"त्यावर भगवान उद्गारले की, तसच काही नाही , पण आठवण तर येईलच. मग त्यांना सहज पृच्छा केली की , मग तस पुनर्भेटीच वचन आपण दिलंच असेल त्यांना सर्वांना वा कोणालातरी. "

" मग काय म्हणाले यावर मुरलीमनोहर "

" याच गोष्टीवर अचानक रुष्ट झाले आणि म्हणाले की, तस काही वचन कोणाला दिल नाही मी आणि दिल असेलच तरी सध्यातरी त्यावर अंमलबजावणी करता येणं दुरापास्त आहे, नारदा. तद्ववत आपण या बाबत व्यर्थ चिंता करू नये. आपण यावे आता. अस म्हणून जवळ जवळ मला हाकलून दिलं. तरीही मला त्याच विशेष काही वाटत नाही. ते श्रेष्ठ आहेत, काही चिंता, विवंचना असू शकतात जेणेकरून त्यांनी एखाद्या विवषतेचा राग माझ्यावर काढलाही असेल. मला त्याच विशेष नाही. परंतु देवी मला चिंता ही आहे की, देव अश्या कोणत्या काळजीत वा विवंचनेत आहेत, ज्यामुळे त्यांच चित्त थाऱ्यावर नसावं. म्हणून म्हटलं तुमच्याजवळ बोलावं. आपल्याला यदुनाथाची काळजी आणि प्रीती जास्त आहे, असा माझा कयास आहे. तेंव्हा आपण ह्याचा छडा लावाल वा त्याच्या खोलात शिरून ते युक्ती प्रयुक्तीने जाणून घेण्याचा यत्न कराल याबद्दल शाश्वती वाटली म्हणून आलो, इतकंच." 

देवर्षी नारदाच्या वक्तव्याने चिंताग्रस्त झालेला देवी सत्यभामा यांचा चेहरा , नारदांच्या विश्वासपूर्ण बोलण्याने सुखावला खरा पण नारदांनी सांगितलेलं श्रीकृष्णांच्या चिंतेचा सकारण खुलासा झाल्याशिवाय मन स्वस्थ बसणार नाही हेही त्यांनी जाणलं. त्या देवर्षीना म्हणाल्या

" देवर्षी आपण ही बाब मजपर्यंत पोहोचवून आपली चिंता व्यक्त केलीत , हे खूप बर केलंत. अन्यथा आम्हाला कळलं सुद्धा नसतं की यदुवीर काही चिंतेत वा काळजीत आहेत."

"ते सर्व ठीक आहे देवी, फक्त एक उपयुक्त सल्ला म्हणून बोलू का "

" हो हो अवश्य बोलावं देवर्षी "

" ही सवंगडयाना दिलेल्या वचनाची शक्यता हा आमचा कयास आहे.  पण आपण सर्वांगाने विचार करावा आणि तदपश्चात पृच्छा करावी, तीसुद्धा युक्तिपूर्ण पद्धतीने, हे देवींना सांगणे न लगे. तसच आमचा कुठेही उल्लेख झाला तर महाअनर्थ हाऊ शकेल. कदाचित भगवंत अजूनच  रुष्ट होऊन आमचं येणं पण बंद करतील.  ( नम्रपणे हात जोडून) त्यामुळे जरा बेतानच ."

" नाही युक्तीनेच करीन हे सर्व आणि आपला नामोल्लेख तर सोडाच पण साधा संशयसुद्धा येणार नाही यादवराजाना, याची पूर्ण काळजी घेऊ आम्ही, निश्चिन्त असा आपण. उलट आम्हीच आपले ऋणी आहोत हे सांगितल्याबद्दल. आपण हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचवून आम्हास उपकृत केलं आहेत. त्यामुळे आपल्या पर्यंत यदुवीर जाणार सुदधा नाहीत याची खात्री बाळगावी आपण." 

" मग हरकत नाही. नृपाधिपतींच्या काळजीपोटी वाटतं, म्हणून आलो आपल्या पर्यंत. काळजी घ्या स्वामींची आणि स्वतःची सुद्धा. येतो आम्ही , आज्ञा असावी, देवी या   दासाला."

" यावं आपण, काही गरज लागली तर मी आपली आठवण काढीनचं" 

" हो हो. अवश्य अवश्य. आम्हीही दृष्टी ठेवून आहोतच , भगवंतावर , काळजीमुळे. नारायण नारायण " 

इतकं बोलून नारद अंतर्धान पावतात. पण तरीही त्यांना खात्री नाही की, देवी हे कार्य लीलया व युक्तिपूर्ण पद्धतीने करू शकतील याची. विवंचना कायमच आहे त्यांच्या मनात. बघूया काही इतर उपाय सुद्धा योजता येतात का.  याचं विचारचक्र त्यांच्या डोक्यात फिरत आहे अजूनही.  त्याच चिंतेत ते अंतरीक्षातून यावर नजर ठेवण्यासाठी लुप्त होतात.

"नारायण , नारायण.

यदुनाथा व्यर्थ टाकले चिंतेत मजला
तरी हरीविण दुजा कोणी न मजला " 

वचन दिले त्वा राधेला हरी
चिंता राहिली तुमच्या हृदयी 
राधा विरही जळे एकटी 
पाहू शके ना तीज एकाकी
म्हणुनी सांगण्या आलो  तुम्हाला 
यदुनाथा व्यर्थ ............

देवा सोडवी दोघांनाही
राधे विरही, मज चिंतेतूनी
आस धरली तव भक्तांनी  
आपुल्या सोडवी वाचनातुनी
बघ राधा व्याकुळ हरिबाधेला 
यदुनाथा व्यर्थ .......

राधा या परमपावन, निर्व्याजी प्रेमाचं सात्विक स्वरूप असलेल्या हरिभक्तासाठी देवर्षीनचा आत्मा तीळ तीळ तुटत होता. अर्थात हरी आणि राधेची अंतर्मनामध्ये काय अवस्था होती हे ही जाणून घेऊया .

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...