Skip to main content

मुरली - १७

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - १७

यावर दादांनी कृष्णाची पाठ कौतुकाने थोपटली आणि म्हणाले

"कृष्णा असा वागलास आणि बोललास कि, मला कधी कधी वैषम्य वाटत. "

"कशाचं दादा आणि का "

वैषम्य याच कि इतका तू भारावून टाकतोस तुझ्या बोलण्याने, अगदी मंत्रमुग्ध करतोस, आसपासच्या समस्ताना त्यामुळे कधी कधी वाटत कि, मी उगाच तुला बोलतो कि काय. अगदी वाईट वाटत कि, कधी तू इतका घनगंभीर असतोस अगदी चराचराच्या पार असलेल्या सर्व गोष्टी जाणतोस. असं भासतं,  जणू अवघ विश्व कवेत असलेल्या जगदीश्वरासारखा. त्यामुळे मी उगाच माझ मोठेपण गाजवतो असं वाटत. "

कृष्णाने पटकन दादाच्या ओठान्वर हात ठेऊन त्यांचं बोलणं मधेच थांबवत म्हटलं

"नाही असं अजिबात वाटून घेऊ नका. कारण तुम्ही माझे आहात याची साक्ष म्हणजेच तुमचे हे बोल, हे रागे भरणं, ठणकावून सांगणं, यामुळे मी धाकटा आहे याचा एक विलक्षण आनंद मनाला मिळतो. तो हिरावून घेऊ नका. तुम्ही तुमचं काम करत रहा बोलण्याचं ......"

"आणि मी माझं न ऐकण्याचं .... काय बरोबर ना. ?"

बलरामाच्या या प्रत्युत्तरावर दोघेही बंधू अगदी मनमुराद हसले. पण ते हसणं मधेच थांबवून दादा म्हणाले.

"आता शेवटचा पदर उलगडा आणि बघा काय आहे या सुगंधित वेष्टनात. "

यावर कृष्णाने त्वरेने शेवटचा पदर उलगडला आणि समोर पाहिलं कि एकवीस, वेलबुट्टीदार नक्षीकाम केलेल्या, विविध आकाराच्या, रंगाच्या, रत्नजडित गोफ लावलेल्या, मनमोहक,  गावातील कसबी कलाकारांनी अत्यंत उत्साहात आणि कष्टाने घडवून आणलेल्या, "मुरली". कृष्णाला जी प्राणाहुनही प्रिय आणि जीचा संबंध अर्थातच राधेशी निकटचा आहे अशी एक एक मुरली पाहून कृष्ण भान हरपून गेला. आणि अनायासे मुखातून शब्द आले

"वाह वा . मन प्रसन्न झाल आणि गावात थांबल्याचा अलौकिक आनंद मिळाला. "

स्वतः महानारायण म्हणतात

"धन्य ते जन ज्यांनी मेहनतीने या बासऱ्या, ज्या माझ्या हृदयातून स्वरलहरी घेऊन येतात आणि स्वर्गसुखाचा दिव्य अनुभव प्रत्यक्ष भूतलावर  मला देतात, घडवल्या. "

इतकं म्हणून कृष्णाने एक सुंदरशी दिसणारी मोठ्या आकाराची मुरली  ओठावर लावली आणि त्यातून यमनाचे स्वर्गीय सूर सुरु झाले. बलराम , सारथी, रेवतीदेवी, रुक्मिणीदेवी, सत्यभामादेवी यांसह सर्व राण्या आणि बरोबरीचे सर्वजण जणू मुरलीच्या त्या स्वरांनी जाग आणि जग विसरून हरवून गेले. घोडे व इतर प्राणीमात्रसुद्धा डोळे मिटून फक्त ऐकत होते. त्यांना चालवण्याचं कार्य करणारा एकमेव अर्थात पालनहार स्वतः त्यांच्या सोबत होता आणि त्यानेच सर्वांना वेड लावलं होत,  त्यामुळे बासरीच्या धुंदीचा आणि स्वरांचा कैफ जणू त्रिलोकी पोहोचला. प्रत्यक्ष ब्रह्मांडातून समस्त इंद्रादी देव , देवी ,  नारद, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा, अवकाशात प्रकटून त्या अनुपम्य स्वरांचा आस्वाद घेत होत्या.

अवघ विश्व वयापून उरलेल्या जगदीश्वराच्या सुरांची अलौकिक जादू त्या स्थानापासून कोसो दूर असलेल्या गोकुळात आधी राधेच्या हृदयात पोहोचली आणि मग कानांना जाणवली, भासली मात्र राधा मंत्रमुग्ध होऊन त्या स्वरलहरींवर देहभान हरपून उत्तम पदलालित्याने नृत्य सुरु करती झाली. तिचा आणि मनमोहनाचा तसा करार होता म्हणा किंवा त्या अलौकिक दिव्य प्रेमाची जादू असेल , पण जिथे कुठेही आणि केंव्हाही कृष्णाने मुरली सुरु केली कि, तो आवाज वायुलहरींनाही पार करून थेट राधेच्या हृदयात पोहोचत असे.

मम चित्ती स्वर तुझ्या मुरलीचे आले
मज मोहून, व्यापून तुजप्रत घेऊन गेले
कुठे  कल्पिले कुठेही स्फुरले हृदयाने 
तरीही ते स्वर मुरलीचे मजपाशी आले

उदास वेडी निशा भासली, प्रभात झाली
राधेला या तुज भेटीची आस लागली
अवचित तव हृदयी मम साद पोचली
मंत्रमुग्ध राधा जणू विश्वा हरवून गेली

किती निर्मिसी पथ विरही तू कृष्णा
जाणुनी माझे मन तू आठवसी  ना
स्वये निर्मूनी स्थिती स्वये घडवी ना
का रे निर्दयी प्रीती राधेला भेटसी ना

त्या दिव्य स्वरांची अनुभूती घेणारे ते कृष्ण, बलराम समस्त राण्या त्या सुमधुर स्वरांच्या सिंचनात न्हाऊन निघाले. कृष्णाने त्या सर्व मुरली एक एक करून वाजवून पाहिल्या. एक मुरली ठेवून दुसरी मुरली घेण्यातला काळाचा पट सुद्धा आजूबाजूच्या कोणालाही जाणवला नाही. अगदी बलरामाला सुद्धा. इतकं ते समस्त विश्व मुरलीमय होऊन स्वरधारानी ओलेतं झालं.

आणि इकडे राधा त्या स्वरात न्हाऊन सुद्धा विरहात शुष्क भासत होती. विश्वनियंत्याचा अजब खेळ सुरु होता. प्रेमाचा आणि विरहाच्या परीक्षेचा. त्याची आच फक्त दोघेच जाणत होते. कृष्ण आणि राधा, राधा आणि कृष्ण, कृष्ण राधा , राधा कृष्ण , म्हणजेच  फक्त कृष्ण राधामय आणि राधा कृष्णमय.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...