Skip to main content

मुरली  - ४३

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ४३
 
 
" पण प्रेम भक्ती म्हणजे नक्की काय जरा विस्तारपूर्वक सांगू शकाल का देवर्षी." 

"अवश्य देवी.  विश्वनियंत्याने मानवनिर्मिती केल्यानन्तर प्रथम त्याच्यात आत्मा स्थापित करतानाच देह आणि आत्मा यांना सांधणारा दुवा म्हणून मन निर्माण केलं. त्यात निर्लेप प्रेम आणि भावपूर्ण भक्ती या दोन भावना सर्वप्रथम प्रस्थापित केल्या. त्यामागचा मूळ उद्देश हाच होता की त्याद्वारे, यांचा आधार घेऊन, मानवदेहातील आत्मा पंचमहाभूतरुप अश्या या देहाचा उपयोग करून, उपयुक्त योग साधून, परमात्म भेटीचा अपूर्व योग साध्य करू जाणलं. याचसाठी या प्रेमरूप भक्तीचा सदुपयोग करण्याची मनीषा मानवाने धरावी. 

ही प्रक्रिया इतकी उपजत असते की ती शिकवावी लागत नाही. जस मातेला आपल्या अपत्यावर प्रेम करणं शिकवावं लागत नाही. तद्वत मनुष्यरुप आत्म्याला हे शिकवावं लागत नाही  की भक्ती कशी करावी. भक्ती आणि प्रेम हे प्राकृतिकपणे आत्म्यास अवगत असते. मन यात त्याची साथ देते त्यावेळेस तो देहसुद्धा सात्विक संवेदनांची अनुभूती घेतो. भक्ती ही एका विशिष्ट परिभाषेत मांडण कठीण आहे.  

पण जेव्हा एखाद्या आत्म्याला परम तत्वाची आवड निर्माण होऊन त्याप्रति निर्व्याज प्रेम जाणवत आणि मन त्यात आकंठ बुडून जातं , जेणेकरून ज्या परम तत्वाला तो साध्य करण्याची इच्छा धरून असतो , त्या परम तत्वाला देखील त्यात रममाण होणं भाग पडत. किंबहुना भक्ती ही भगवंताला भक्ताप्रत खेचून नेते. भक्ती ही परमेश्वराप्रति आत्म्याची उपजत ओढ आहे.  ही जाणता घडेल वा अजाणता सुद्धा घडून येईल. हा एक योग आहे, ज्यावर मी नन्तर भाष्य करीन.  ही ओढ जन्मतः सर्वच प्राणीमात्रात असतेच असते. ही स्वभावतः आत्म्यास असलेली ओढ जडदेही विरळ होते. ती मुद्दाम जोपासून दृढ करावी लागते.  ते फक्त मनुष्यदेहातच शक्य आहे. कारण मनुष्य देह वगळता इतर सर्व देह हे फक्त भोग भोगण्यासाठी आहेत. 

परंतु जेव्हा जडदेही प्राणी देहव्यापात व ततपश्चात काम क्रोधादी रिपूंच्या हवाली स्वतःला करतो, इच्छेने वा अनिच्छेने, जाणतेपणी वा अजाणता, तेंव्हा त्या आत्म्यावर विकाराचे संस्काररूपी आवरण चढत जाते. मुळात सर्व व्यवस्था विधात्याने कर्म तत्वात बद्ध केली असल्यामुळे आणि कर्मफल भोगूनच प्राणी मोक्ष पदास प्राप्त होत असल्यामुळे, ही शृंखला प्राणीमात्राला अनेक जन्म मृत्यूच्या अशक्यप्राय शृंखलेत जखडून टाकते." 

देवी रेवती विचारतात 

"पण भक्त पल्हादासारख्या भक्तांना हे तत्व लागू होत नाही काय ? वा असे जीव जडदेहाच्या नियमा पलीकडे कसे काय असतात ?  हे जरा विस्ताराने सांगावे देवर्षी."

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...